ब्लॅक फंगस
ब्लॅक फंगस म्हणजे आहे एक काळी बुरशी,
माती,पालापाचोळा अन् शेणात आढळते ती अशी...
तिचे बीज पसरते हवेतून वातावरणात,
श्वासाव्दारे ती पसरते माणसाच्या नाकात...
राेगप्रतिकारशक्ती ठेवा आपली निराेगी मजबूत,
तेव्हाच येतील आटोक्यात हे साथराेग काबूत...
मधुमेही रूग्णांमध्ये हाेते जास्त इन्फेक्शन,
झपाट्याने वाढते खूप येते रूग्णाला टेन्शन...
जितक्या लवकर हाेईल याचं सत्वर निदानावर,
नाहीतर लक्षणं दिसतील डाेळे, मान आणि नाकावर..
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्या औषध उपचार,
रक्त साखर माेजूनऑक्सीजन पातळी बघा वारंवार..
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा