माझ्या मनात आज
on my mind today
माझ्या मनात आज
विचाराचं काहूर उठलं,
असं कसं वादळ
अचानकच घडून आलं...
माझ्या मनात आज
काळजीचं सावट उमटलं,
कधी नाही ते एवढं
पोटात धस्स झालं...
माझ्या मनात आज
अनेक विचारांची पेरण,
उगवतील चांगले विचार
हेच माझं खरं धन...
माझ्या मनात आज
विचार फिरतात दाही दिशा,
मनाचे करतो मी व्यायाम
विचारच फिरवतील दशा...
©दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment