name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): पंखात बळ माझ्या...(My strength in the wings)

पंखात बळ माझ्या...(My strength in the wings)

पंखात बळ माझ्या
My strength in the wings

Pankhat bal Mazya


पंखात बळ माझ्या 
जन्मत:च तू भरले 
तुझ्या मार्गदर्शनाने 
मी आकाशी उडले


पंखात बळ माझ्या 
घेण्या ती भरारी
तू शिकवली आई
जगण्याची ही वारी 

पंखात बळ माझ्या 
ठासून तू असे भरले,
आत्मविश्वासाने जगाच्या 
प्रांगणात मी उतरले 

पंखात बळ माझ्या 
ज्ञान हेच बलस्थान 
कोणी चोरू शकत नाही 
तू दिलेले हे उगमस्थान 

© दीपक अहिरे, 
नाशिक
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

परोपजीवी मित्र किटक : ट्रायकोग्रामा | Parasitic Friendly Insect Trichogramma – जैविक किड नियंत्रणातील प्रभावी उपाय

🌱 परोपजीवी मित्र किटक : ट्रायकोग्रामा (Trichogramma)      परोपजीवी मित्रकिटकांपैकी ट्रायकोग्रामा हा एक अत्यंत महत्वाचा मित्रकिटक असून तो ...