मी नाताळ बाबा
Mi Natal Baba
मी नाताळ बाबा
येतो ख्रिसमसच्या दिवशी
सांताक्लॉजच्या वेषात
नातं आमचं येशू ख्रिस्ताशी
मी नाताळ बाबा
घेऊन येतो आनंद पर्वणी,
भेटवस्तूंची देवाण-घेवाण
जोडली आमच्या सणाशी
मी नाताळ बाबा
लहान मुलांची होते हौस
मध्यरात्री काहीतरी वस्तू
पडतो आनंदाचा पाऊस
मी नाताळ बाबा
सुट्टी घेवून येतो,
तुमच्या अंतरंगाचा आनंद
हा सांताक्लॉज जागवतो
© दीपक केदू अहिरे, नासिक
No comments:
Post a Comment