नाताळची भेटवस्तू
Christmas gifts
नाताळची भेटवस्तू
भेटायच्या विविध रूपात,
प्रेम, माया मिळायचे
विविध वस्तूंच्या स्वरूपात...
नाताळची भेटवस्तू
आनंद खूप असायचा,
छोट्या छोट्या गोष्टींत
आमचा आनंद दडायचा...
नाताळची भेटवस्तू
असतं काय माहित नाही,
मोठेपणी कळू लागलं
सांताक्लॉज काही देत नाही...
नाताळची भेटवस्तू
साठवून ठेवतो हृदयात,
आपलेपणा, माणुसकी
जपून ठेवा तहहयात...
© दीपक केदू अहिरे, नासिक
No comments:
Post a Comment