"स्व-काव्यांकुर बहरला सचित्र माहितीनी, आस्वाद घ्यावा सुजाण वाचकांनी " Wise readers should enjoy Swa-kavyankur Bahar with illustrated information
दिपावलीचा सण उटण्याचा सुगंध (The fragrance of Diwali festival)
दिपावलीचा सण,उटण्याचा सुगंध...
The fragrance of Diwali festival
दिपावलीचा सण
उटण्याचा सुगंध,
दिपावलीचा सण
मोती साबणाचा गंध
दिपावलीचा सण
लक्ष्मीपूजनाची आरास,
दिपावलीचा सण
फटाक्यांची रास
दिपावलीचा सण
दिव्यांच्या रोषणाईचा थाट,
दिपावलीचा सण
अभ्यंगस्नानाची पहाट
दिपावलीचा सण
फराळांची मेजवानी,
दिपावलीचा सण
पहाट पाडव्याची गाणी
दिपावलीचा सण
नवे आकर्षक पेहराव,
दिपावलीचा सण
चमचमते शहर नी गांव
दिपावलीचा सण
प्रत्येकाचे आनंदते मन,
दिपावलीचा सण
व्हावे आनंदी मनोमिलन
। । दीपावली शुभेच्छा ।।
© दीपक केदू अहिरे, नासिक
आली आली दिवाळी आली (Diwali has come)
आली आली दिवाळी आली,
वसुबारसने सुरुवात झाली...
आज करा पूजा गाय वासराची,
जाणीव ठेवा मनात त्यांच्या कृतज्ञतेची...
आली आली दिवाळी आली,
धनत्रयोदशीने सुरुवात झाली...
आज करा तुम्ही यमदिपदान,
असतो आज धन्वंतरीला मान...
आली आली दिवाळी आली,
लक्ष्मीपूजनाने सुरुवात झाली...
असते मग नरक चतुर्दशी,
गोडधोड फराळ असतो या दिवशी...
आली आली दिवाळी आली,
अभ्यंगस्नानाने सुरुवात झाली...
या दिवशी असते गोवर्धन पूजन,
असतो मग महालय समाप्ती दिन...
आली आली दिवाळी आली,
भाऊबीजेने सांगता झाली...
या पर्वात येतो दिपावली पाडवा,
तुमच्या आमच्या जीवनात येऊ द्या गोडवा...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
चाहुल दिपावलीची (Chahul Dipawalichi)
चाहुल दिपावलीची...
Chahul Dipawalichi
चाहुल दिपावलीची
लागलीय आता,
झुंबड उडाली
आवश्यक खरेदीकरिता...
चाहुल दिपावलीची
उत्साह नाही बाजारपेठेत,
जो तो आत्ममग्न
आहे आपपल्या समवेत...
चाहुल दिपावलीची
खूप उशिरा आली,
करोना संकटकाळात
दिपावली लोप पावली...
चाहुल दिपावलीची
करू आत्मनिर्भर दिवाळी,
आपल्याबरोबर गरीबांचा
विचार करा या काळी...
। । दीपावली शुभेच्छा ।।
© दीपक केदू अहिरे, नासिक
गुलाबी थंडी....
गुलाबी थंडी
शरीराला स्पर्शते,
याने आपले
रोम रोम फुलते...
गुलाबी थंडी
बोचरी वाटते,
मनाला प्रसन्न
करून जाते...
गुलाबी थंडी
येते हुडहुडी,
मग आठवते
प्रेमाची गोधडी...
गुलाबी थंडी
मोसम व्यायामाचा,
सराव करा दररोज
थंडीत फिरण्याचा...
C दीपक अहिरे, नाशिक
Subscribe to:
Posts (Atom)
सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)
सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...

-
उपक्रमशील संशोधक शेतकरी : श्री. गणू दादा चौधरी Enterprising Researcher Farmer : Shri. Ganu Dada Chaudhary धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथी...
-
परोपजीवी मित्र किटक : ट्रायकोग्रामा Parasitic friendly insect: Trichogramma परोपजिवी मित्रकिटकांपैकी "ट्रायकोग्रामा" हा एक महत्...
-
सटाणा येथे रेसिड्यू फ्री कांद्याचे यशस्वी उत्पादन Successful production of residue free onion in Satana श्री.मधुकर मोरे यांनी साधली किमया M...