दिपावलीचा सण,उटण्याचा सुगंध...
The fragrance of Diwali festival
दिपावलीचा सण
उटण्याचा सुगंध,
दिपावलीचा सण
मोती साबणाचा गंध
दिपावलीचा सण
लक्ष्मीपूजनाची आरास,
दिपावलीचा सण
फटाक्यांची रास
दिपावलीचा सण
दिव्यांच्या रोषणाईचा थाट,
दिपावलीचा सण
अभ्यंगस्नानाची पहाट
दिपावलीचा सण
फराळांची मेजवानी,
दिपावलीचा सण
पहाट पाडव्याची गाणी
दिपावलीचा सण
नवे आकर्षक पेहराव,
दिपावलीचा सण
चमचमते शहर नी गांव
दिपावलीचा सण
प्रत्येकाचे आनंदते मन,
दिपावलीचा सण
व्हावे आनंदी मनोमिलन
। । दीपावली शुभेच्छा ।।
© दीपक केदू अहिरे, नासिक
No comments:
Post a Comment