नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक
Freedom fighters in Nashik district
दत्तात्रय शंकरशेट नवले (जन्म १९२३)
जन्मगाव सिन्नर (ता. सिन्नर, जि.नाशिक); शिक्षण मराठी ७ व्या इयत्तेपर्यंत; कळवण कचेरी व रेकॉर्ड ऑफिस जाळण्याचा प्रयत्न केला; शासनाकडून शैक्षणिक सवलती व सन्मानपत्र मिळाले.
नामदेव आबाजी दिक्षित (जन्म १९१४)
मुरलीधर आत्माराम घुलेकर (जन्म १८८५),
मूळगाव नाशिक (तालुका व जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी सातव्या इयत्तेपर्यंत; १९३० साली १०० स्वयंसेवकांसह बागलाण येथील जंगल सत्याग्रहात भाग घेतला. पण अटक करून सोडून देण्यात आले. लाठी चार्जमध्ये मार बसला; कला पथकात पोवाडयांच्याद्वारे सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्याचा प्रचार केला; तरुण वयात नामांकित पैलवान होते.
भिका ठमाजी देवरे
जन्मगाव उमराणे (तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक); शिक्षण बी.ए. पर्यंत; १९४२ साली चलेजाव चळवळीत भाग घेतला.
गणपत लक्ष्मण धोकटे (जन्म १८९८),
मूळगाव सिन्नर (तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी चौथ्या इयत्तेपर्यंत; १९४२ सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला त्याबद्दल सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली.
शामभाऊ गोविंदा धोंडगे (जन्म १९०७),
जन्मगाव अंबासन (तालुका बागलाण, जिल्हा नाशिक); शिक्षण प्राथमिकः १९३० साली मीठ सत्याग्रहात पावणेदोन महिने कारावास; शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळाले.
अनंत गोविंद दुर्वे (जन्म १९०७)
मूळगाव सिन्नर (तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक); शिक्षण वकिली; १९३२ साली जंगल सत्याग्रहात भाग घेतला म्हणून ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली; १९४१ साली चलेजावच्या चळवळीत भाग घेतला म्हणून ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली; १९४२ साली चलेजावच्या चळवळीत भाग घेतला म्हणून १० महिने स्थानबद्ध होते.
काशिनाथ सीताराम देवघरे (जन्म १९०९)
जन्मगाव कळवण (तालुका कळवण, जिल्हा नाशिक); शिक्षण ६व्या इयत्तेपर्यंत; १९३० साली जंगल सत्याग्रहात भाग घेतला, त्याबद्दल साधी कैद व २५ रुपये दंड अशी शिक्षा झाली; १९४२ साली चलेजावच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल अटक होऊन १ महिना ७ दिवस अंडर ट्रायलवर होते व येरवडा जेलमध्ये ५ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली; शासनाकडून सन्मानपत्र, आर्थिक सवलत व मुलांना शैक्षणिक सवलत मिळते.
सोमनाथ भगवंत दिक्षित (जन्म १९१२)
मूळगाव मुल्हेर (तालुका बागलाण, जिल्हा नाशिक); शिक्षण शिक्षक ट्रेनिंग २ रे वर्ष; १९४२ च्या चलेजावच्या चळवळीत भूमिगत कार्यात भाग घेतला; २ महिने स्थानबद्ध होते.
नरहरी उखाजी दिंडे (जन्म १९०१)
मूळगाव येवला (तालुका येवले, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी. ६ व्या इयत्तेपर्यंत; १९३० साली सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल ५ महिने व १९३२ साली पिकेटिंग केले त्याबद्दल ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली.
मुरलीधर शंकर दुमणे (जन्म १९०६)
जन्मगाव नागडे (तालुका येवले, जिल्हा नाशिक); शिक्षण २ ऱ्या इयत्तेपर्यंत; महात्मा गांधी समवेत दांडी यात्रेपासून प्रत्येक सत्याग्रहात यांनी भाग घेतला; भिंगार येथे दारु विरुद्ध निदर्शने केल्याबद्दल १ महिना १५ दिवसाची सक्त मजुरीची शिक्षा येरवडा जेलमध्ये झाली; शासनातर्फे सन्मानपत्र मिळाले.
धोंडू अंबादास दुसाने
जन्मगाव अचलगाव (तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी ६ व्या इयत्तेपर्यंत; १९२७ ते १९२९ मध्ये प्रचार कार्य व दारु निरोधन केल्याबद्दल २ महिने शिक्षा धुळे जेलमध्ये भोगली; जामदरी सत्याग्रहात ९ महिने सक्त मजुरीची शिक्षा धुळे जेलमध्ये भोगली; शासनाकडून शैक्षणिक सवलत, सम्मानपत्र व आर्थिक सहाय्य मिळाले.
बबनराव चिमणराव दुसाने
मूळगाव मौजे गिलाणे (तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी ५ व्या इयत्तेपर्यंत; १९३० साली मीठ सत्याग्रह केला व त्यात विध्वंसक कार्य केले; तसेच दारू गुत्त्यावर पिकेटींग केले, त्याबद्दल ३० रुपये दंड व तो न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा झाली; १९३२ साली कलकत्ता काँग्रेस बुलेटिन्स वाटप केल्याबद्दल सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा धुळे जेलमध्ये भोगली.
देवकर नारायण सावळीराम (जन्म १९१५)
जन्मगाव लखमापूर (तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक); शिक्षण प्राथमिक; स्वातंत्र्य लढचात भाग घेतला होता.
देवधर बिंदुताई केशव (जन्म १९२०)
वास्तव्य नाशिक; १९४२ साली चलेजावच्या चळवळीत भाग व त्यामुळे १ वर्ष स्थानबद्ध; शासनाकडून आर्थिक सहाय्य व सन्मानपत्र मिळाले.
देवघरे अंबादास रामचंद्र
मूळगाव कळवण (तालुका कळवण, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी ७ व्या इयत्तेपर्यंत; १९४२ मध्ये चलेजावच्या चळवळीत प्रभात फेरी काढली म्हणून ५ आठवडे सक्त मजुरी व ५० रुपये दंडाची शिक्षा झाली.
देवघरे गोपाळ नारायण (जन्म १८९२, मृत्यू १९५२),
मूळगाव कळवण (तालुका कळवण, जिल्हा नाशिक); शिक्षण ७ व्या इयत्तेपर्यंत; कळवण येथील सर्व चळवळीचे सूत्रधार व प्रवर्तक होते.
देवघरे पुंडलिक गोपाळ (जन्म १९२२)
मूळगाव कळवण (तालुका कळवण, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी ४ व्या इयत्तेपर्यंत; १९४२ च्या चलेजावच्या सत्याग्रहात भाग घेतला म्हणून अटक होऊन १ महिना सक्त मजुरीची शिक्षा झाली.
देवघरे माधव सीताराम (जन्म १९०२, मृत्यू १९७१)
जन्मगाव कळवण (तालुका कळवण, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी ७ व्या इयत्तेपर्यंत; १९३० व १९३७ साली स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्याबद्दल १ महिना सक्त मजुरीची शिक्षा झाली; मारहाण झाली.
देवघरे राधाबाई गोपाळ (जन्म १९१०, मुत्यू १९६०),
मूळगाव कळवण (तालुका कळवण, जिल्हा नाशिक); १९३० साली स्त्री वर्गात जागृती निर्माण करून जंगल सत्याग्रहाच्या प्रवर्तक होत्या.
देवघरे सोनु शिवराम (जन्म १९०६)
जन्मगाव कळवण (तालुका कठवण, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी ७ व्या इयत्तेपर्यंत; १९३० साली कायदेभंग व प्रचार कार्य, त्यामुळे ६ महिने सक्त मजुरी व ५० रु. दंड, शासनाकडून ताम्रपट व आर्थिक सहाय्य मिळाले.
देवघरे सोनू शिवराम (जन्म १९१०)
मूळगाव नाशिक (तालुका व जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी पाचव्या इयत्तेपर्यंत; १९३० साली कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला म्हणून ६ महिने सक्त मजुरी व ५० रुपये दंड झाला.
देवरे कमलाबाई शामराव (जन्म १९०९)
मूळगाव नाशिक (तालुका व जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी चौथ्या इयत्तेपर्यंत; १९३८ साली काँग्रेस महिला संघातर्फे विधायक कार्य; १९४२ साली अटक, भूमिगताना आश्रय दिला; १९४३ साली ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा.
देवरे माधवराव दगाजी (जन्म १९२३)
जन्मगाव उमराणे (तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक); शिक्षण मॅट्रिकपर्यंत; १९४२ साली शाळा बंद केल्याबद्दल ३ दिवस साधी कैद.
देवरे लक्ष्मण पुंडू (जन्म १९०२)
जन्मगाव मालेगाव (तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक); शिक्षण माध्यमिकः १९४२ साली स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याबद्दल १ वर्ष सश्रम कारावास धुळे तुरुंगात भोगला; शासनाकडून शिक्षण सवलत व २०० रुपये मासिक मानधन, सन्मानपत्र मिळाले.
देवरे शामराव सखाराम (जन्म १८९४, मृत्यू १९५५)
मूळगाव नाशिक (तालुका व जिल्हा नाशिक); शिक्षण मॅट्रिक; १९४२ साली भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना मदत, त्यामुळे २ महिने कारावास.
देवळे गोपाळ काशिराम
जन्मगाव येवला (तालुका येवले, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी चौथ्या इयत्तेपर्यंत; १९४२ मध्ये भूमिगत राहून कार्य केले; शासनाकडून शैक्षणिक सवलत व सन्मानपत्र मिळाले.
देवळे बाबुराव काशिराम (जन्म १९२१)
जन्मगाव येवला (तालुका येवले, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी ४ थ्या इयत्तेपर्यंत; १९४२ साली स्वातंत्र्य लढ्यात प्रभात फेऱ्या काढणे, तारा तोडणे, बुलेटिन वाटणे, रेल्वे रुळ उखडणे इत्यादी मध्ये भाग घेतल्याबद्दल ६ महिने सश्रम कारावास येरवडा तुरुंगात भोगला; शासनाकडून २०० रुपये मासिक मानधन, शिक्षण सवलत व सन्मानपत्र मिळाले.
देशपांडे गोविंद हरी उर्फ काकासाहेब (जन्म १९०३, मृत्यू १९६३)
मूळगाव नाशिक (तालुका व जिल्हा नाशिक); शिक्षण हायकोर्ट प्लीडर; १९३० साली सत्याग्रहात भाग घेतला म्हणून ९ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली; १९३२ साली वैयक्तिक कायदे- भंगाच्या चळवळीचे अध्यक्ष म्हणून अटक होऊन १।। वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली; १९३४ साली राजकीय चळवळीत हद्दपार (जिल्हयाच्या बाहेर); २ महिने स्थानबद्ध; महायुद्धविरोधी प्रचार २॥ वर्ष सक्त मजुरी; १९४२ साली चलेजावच्या चळवळीत भाग घेतला म्हणून स्थानबद्ध होते; १९२८ते १९३०, १९३८ते १९४२ पर्यंत महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे चिटणीस होते; १९३७ व १९४६ साली विधीमंडळावर काँग्रेस पक्षातर्फे निवडून आले होते; जिल्हयातील निरनिराळ्या रचनात्मक कार्यात भाग; पुढे लोकसभेवर खासदार म्हणून निवड.
देशपांडे गणेश बाळाजी (जन्म १८९७, मृत्यू १९६९),
जन्मगाव सिन्नर (तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी ५ व्या इयत्तेपर्यंत; १९३० साली जंगल सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल ६ महिने सश्रम कारावास व १९४२ साली ९ महिने स्थानबद्ध नाशिक तुरुंगात होते; शासनाकडून १५० रुपये मासिक मानधन व सन्मानपत्र मिळाले.
देशपांडे जगन्नाथ बळवंतराव (जन्म १९१५)
जन्मगाव सिन्नर (तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी ७ व्या इयत्तेपर्यंत; १९४२ साली प्रचार पथके काढणे, मिरवणुका काढणे याबद्दल १ वर्ष सश्रम कारावास धुळे व येरवडा तुरुंगात भोगला; शासनाकडून २५० रुपये मासिक मानधन व सन्मानपत्र मिळाले.
देशपांडे जगन्नाथ बळवंतराव (जन्म १९१५)
जन्मगाव बनसाळ (तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी ६ व्या इयत्तेपर्यंत; १९४२ साली चलेजावच्या चळवळीत भाग घेतला, म्हणून येरवडा तुरुंगात सक्त मजुरीची शिक्षा भोगली.
देशपांडे नरहर राजाराम (जन्म १९०४)
जन्मगाव मालेगांव (तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक); शिक्षण मॅट्रिक, बी. ए., बी. टी., कांदिवली फिजिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा सर्टिफिकेट कोर्स पदवीधर झाल्यावर राष्ट्र सेवादल कला मंडळ, विद्यार्थी संघटन, यामध्ये बौद्धिक, भाषणे, परिसंवाद, आदी चळवळीत भाग घेतला; १९४२ च्या भारत छोडो या चळवळीत भूमिगताना आश्रय देणे, बुलेटिन लिहून प्रसार करणे, इ. कार्य भूमिगत राहून केले; महाराष्ट्र शासनाने सन्मानपत्र व मुलांना शैक्षणिक सवलती दिल्या.
देशपांडे राधाबाई गोविंदराव (जन्म १९१७)
मूळगाव नाशिक (तालुका व जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी पाचव्या इयत्तेपर्यंत; १९४२ साली चलेजावच्या चळवळीत भाग घेतला, म्हणून ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली; त्यांनी इतर सर्व रचनात्मक कार्यातही भाग घेतला होता.
देशपांडे सदाशिव राजाराम (जन्म १९१०)
जन्मगाव नाशिक (तालुका व जिल्हा नाशिक); शिक्षण मॅट्रिक; १९३० ते १९३४ पर्यंत नगर जिल्हयात भूमिगत कार्य करीत असत; १९३३ च्या कलकत्ता काँग्रेसला डेलिगेट म्हणून गेले होते; सात दिवस शिक्षा भोगल्यावर परत आले; १९४३ मध्ये यांना अटक झाली; नाशिक व मेरवडा येथे २ वर्षे स्थानबद्ध ठेवले होते; शासनाकडून सन्मानपत्र व शिक्षण सवलत मिळते.
देशमुख अरूण यशवंत
जन्मगाव लखमापूर (तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक); शिक्षण नॉन मॅट्रिक; १९४२ साली चलेजावच्या चळवळीत मिरवणूक काढली, त्यामुळे ८ दिवस पोलीस कस्टडीत; १९४३ साली घरात गावठी बॉब सापडल्यामुळे ४ महिने अंडर ट्रायल कैदी; शासनाकडून सन्मानपत्र, शैक्षणिक सवलत व आर्थिक सहाय्य मिळाले.
देशमुख चिमणराव बाजीराव (जन्म १९०२)
जन्मगाव भगूर (तालुका व जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी ५ व्या इयत्तेपर्यंत; १९३० मध्ये मीठ सत्याग्रहात भाग घेतला होता; १९४२ साली ६ महिने सश्रम कारावास व ५० रुपये दंड झाला; शिक्षा नाशिक, धुळे व विसापूर तुरुंगात भोगली; शासनाकडून शैक्षणिक सवलती व ५० रुपये मानधन, सन्मानपत्र व ताम्रपट मिळाले.
देशमुख यशवंत जयवंत (जन्म १९१६, मृत्यू १९४५)
मूळगाव मुल्हेर (तालुका बागलाण, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी सहाव्या इयत्तेपर्यंत; १९४२ साली चलेजावच्या चळवळीत घेतला होता; भूमिगत राहून कार्य केले; महिने स्थानबद्ध होते.
देशमुख यशवंत भाऊराव (जन्म १८८९, मृत्यू १९६९)
मूळगाव पाळे (तालुका कळवण, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी ७ व्या इयत्तेपर्यंत; १९४२ साली चलेजावच्या चळवळीत कार्य, ११ महिने स्थानबद्ध.
देसाई एकनाथ बाळा (जन्म १९१९)
मूळगाव अभोणा (तालुका कळवण, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी सातव्या इयत्तेपर्यंत; १९४२ सालच्या चलेजावच्या चळवळीत गांधी जयंती साजरी करण्यात भाग घेतला, त्याबद्दल सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली.
देसाई ठाकोरभाई हरीभाई
मूळगाव येवला (तालुका येवले, जिल्हा नाशिक); शिक्षण ६ व्या इयत्तेपर्यंत; १९२९ साली साबरमती आश्रमात कार्य; १९४२ साली आंदोलनात माग.
देसाई निच्युभाई हरीभाई
मूळगाव नवसारी (सुरत गुजराथ) (तालुका व जिल्हा सुरत) सध्या वास्तव्य नाशिक; शिक्षण नॉन मॅट्रिक; १९३२ साली सत्याग्रहात भाग घेतला, त्याबद्दल ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली.
देसाई मगनलाल हरीभाई
मूळगाव नवसारी (तालुका सुरत गुजराथ) सध्या वास्तव्य नाशिक; शिक्षण मॅट्रिकपर्यंत; १९३० साली सत्याग्रहात भाग घेतला, त्याबद्दल ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली; १९३२ साली पिकेटिंग बद्दल ५ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली.
देसाई मगनलाल हरीभाई (जन्म १९००)
मूळगाव येवला (तालुका येवले, जिल्हा नाशिक); शिक्षण मॅट्रिक्युलेट; १९३० साली सभाबंदीचा कायदा मोडला, त्याबद्दल ५ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली.
देसाई रणछोडभाई मुरलीधर
जन्मगाव येवला (तालुका येवले, जिल्हा नाशिक); शिक्षण मॅट्रिकपर्यंत; १९४२ साली चळवळीत भाग घेतला त्याबद्दल २ महिन्याची शिक्षा भोगली.
देसाई वामन मुर्लीधर
मूळगाव येवला (तालुका येवले, जिल्हा नाशिक); शिक्षण मॅट्रिकपर्यंत; १९३२ साली सभाबंदीचा प्रचार केला त्याबद्दल ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली.
देसाई साहेबराव मोतीराम
जन्मगाव मालेगाव (तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक); १९५५ साली गोवा मुक्ति आंदोलनात होते.
दोंडगे शामभाऊ गोविंदा (जन्म १९१३)
मूळगाव टेंभे (तालुका बागलाण, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी ४ व्या इयत्तेपर्यंत; १९४२ साली भूमिगत राहून कार्य केले व भूमिगत कार्यकर्त्यांना आश्रय दिला.
धनगर नारायण बापू (जन्म १९०६)
जन्मगाव मालेगाव (तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक) १९३० साली जंगल सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल शिक्षा झाली.
धात्रक चिमण बाबूराव
जन्मगाव विंचूर (तालुका निफाड, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी ४ थ्या इयत्तेपर्यंत; १९४२ साली चलेजाव आंदोलनात भाग घेतल्याबद्दल २ महिने सश्रम कारावास येरवडा तुरुंगात भोगला; तुरुंगात लाठी चार्जमध्ये डावा हात निकामी झाला; शासनाकडून सन्मानपत्र व आर्थिक सहाय्य मिळाले.
धारणकर अण्णा (साहेब) सोनू
जन्मगाव नाशिक (तालुका व जिल्हा नाशिक); शिक्षण ५ व्या इयत्तेपर्यंत; १९४२ मध्ये मिरवणूक काढून ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रचार केल्यामुळे अटक झाली व २५ रु. दंड झाला; १९४३ मध्ये आगाखान पॅलेस मोर्चात भाग घेतल्यामुळे ३ महिने शिक्षा झाली; आंदोलन काळात विध्वंसक कार्यात भाग घेतल्यामुळे १॥ महिना शिक्षा झाली; शासनाकडून मानधन व सन्मानपत्र मिळाले.
धारणकर नारायण मुरलीधर (जन्म १९१५)
मूळगाव सिन्नर (तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक); शिक्षण इंग्रजी तिसऱ्या इयत्तेपर्यंत; विद्यार्थी दशेत असताना वानर सेनेतर्फे राष्ट्रीय शिक्षण मिळाले; दारू गुत्त्यावर पिकेटींग करणे, प्रभात फेऱ्या काढणे, परदेशी कापडावर बहिष्कार वगैरे कार्यात भाग घेतला होता; १९४२ सालच्या चलेजावच्या चळवळीत सिन्नर तालुक्याचे लढयाचे केंद्र यांच्याच घरात होते व यांनी भूमिगत राहून कार्य केले व इतर कार्यकर्त्यांना आश्रय दिला.
धावणे चिमण लक्ष्मण
मूळगाव येवला (तालुका येवले, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी सातव्या इयत्तेपर्यंत; १९३२ सालच्या चळवळीत दारुच्या गुत्त्यावर पिकेटींग केले त्याबद्दल ६ महिने स्थानबद्ध होते.
धोबी गणपत परशुराम
मूळगाव गिलाणे (तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक); १९३० साली जंगल सत्याग्रहात भाग घेतला म्हणून अटक होऊन ३ महिने सक्त मजुरी व २५ रुपये दंड अशी शिक्षा झाली.
धोबी मोतीराम मन्साराम (जन्म १९१०)
जन्मगाव गिलाणे (तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक); शिक्षण मराठी ३ऱ्या इयत्तेपर्यंत; १९३० साली जंगल सत्याग्रहात ३ महिने सश्रम कारावास व २५ रुपये दंड झाला; धुळे तुरुंगात शिक्षा भोगली.
संकलन
© दीपक केदू अहिरे
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment