शेकोटी कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य लक्ष्मण महाडिक
गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित आशिया खंडातील सलग ४८ तास चालणाऱ्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती प्रा. संदीप जगताप, रवींद्र मालुंजकर, संजय आहेर, विजयकुमार मिठे, प्राचार्य ज्ञानोबा ढगे यांनी दिली
नाशिक येथील भावबंधन मंगल कार्यालय येथे १० आणि ११ जानेवारी रोजी होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुमती पवार तर स्वागताध्यक्षपदी मविप्रचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांची निवड करण्यात आली असून, दरम्यान रात्री शेकोटी कवी संमेलनाचे अध्यक्षपदी प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांची निवड करण्यात आली.
कुणब्याच्या कविता, गावकुसाच्या कविता हे त्यांचे कवितासंग्रह असून धुक्यातले धुके, दिवस हे त्यांचे ललित लेखन आहे. कुणब्याची कुंडली हा त्यांचा कवितासंग्रह आहे. स्तंभलेखन, आकाशवाणी नाशिक केंद्रावरून व्याख्यान, श्रुतिका लेखन, विविध नियतकालिकातून साहित्य लेखन त्यांनी केले आहे.
विविध विद्यापीठांच्या बी.ए., बी.कॉम, एम.ए अभ्यासक्रमात त्यांच्या कवितासंग्रहाचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता दहावी आंतरभारती पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश असून, भारतीय साहित्य अकादमीच्या वतीने गोवा येथे महाराष्ट्र राज्यातून मराठी भाषेचे साहित्यविषयक प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रीय चर्चासत्रात त्यांची निवड करण्यात आली होती.
अजिंठा येथे झालेल्या राष्ट्र निती काव्य महोत्सवातील कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. कुणब्याची कविता काव्यसंग्रहाची राज्य शासनाच्या अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून निवड करण्यात आली आहे.
नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजन समितीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. इगतपुरी तालुका साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी नाशिक जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. सर्वोदय साहित्य संमेलनाच्या परिसंवादात त्यांचा मोठा सहभाग होता.
मराठी सेवा संघाच्या औरंगाबाद येथील राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाचे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. नाशिक जिल्हा परिवर्तन साहित्य संमेलन २०२३ च्या अध्यक्षपदासाठी त्यांची निवड करण्यात आली होती भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद व तिफन राज्यस्तरीय कविता महोत्सवांमध्ये ते अध्यक्ष होते,
उजगाव बेळगाव कर्नाटक साहित्य अकादमी आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा बहिणाबाई चौधरी राज्य पुरस्कार पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, कवयित्री इंदिरा संत राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, कविवर्य वसंत, ना.घ सावंत राज्य साहित्य पुरस्कार, साहित्य शिवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, अंकुर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, गिरणा गौरव प्रतिष्ठान, स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार, मुक्ताई राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जालना, नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा कवी गोविंद काव्य पुरस्कार, उत्तर महाराष्ट्राचा मानाचा गिरणा गौरव पुरस्कार, कराड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्य वाचनाचा प्रथम पुरस्कार अशा विविध पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
चिंतन आणि चर्चा समकालीन मराठी कविता आस्वाद ग्रामीण कविता १९८० नंतरच्या ग्रामीण कवितेतील बदलत्या वास्तवांचा शोध, शेतकरी संघटना मराठी साहित्याचा अनुबंध अशा विविध कवितेची त्यांनी समीक्षा केली आहे. गावकुसाच्या कविता या काव्यसंग्रहास त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
कविवर्य एकनाथ रेंदाळकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार कोल्हापूर, कविवर्य पद्मश्री नामदेव ढसाळ राज्य साहित्य पुरस्कार मंचर, भी.ग. रोहमारे प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कार, परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेचा परिवर्तन पुरस्कार, अक्षरबंध प्रतिष्ठानचा अक्षरबंध राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, श्री शब्द राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार कोल्हापूर, तिफन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार कन्नड, अशा विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.
© दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com
*******************************************
Telegram :
*******************************************
Facebook :
*******************************************
Instagram :
*******************************************
YouTube :
*******************************************
Quora :
*******************************************
Koo :
*******************************************
Pintrest:
*******************************************
Share chat :
*******************************************
Twitter :
@DeepakA86854129
*******************************************
Website :
******************************************
No comments:
Post a Comment