👉 आले लागवड 👈Ginger planting
करा आले लागवड
ताजे आले व सुंठासाठी,
उत्पादन मिळते वीस टन
प्रति हेक्टर गड्डयाकाठी...
जमीन मध्यम व हलकी
आले लागवडीला,
असतो विशिष्ट सुवास
स्वाद,तिखटपणा याला...
सुप्रभा,सुरुची,सुरभी
वरदा ह्या आल्याच्या जाती,
कमी पाण्यातही
जास्तीत जास्त उत्पन्न देती..
लागवडीचा हंगाम साधून
करा लागवड,
घ्या काळजी,
होणार नाही पिकाला सड...
लागवड करा सरी वरंबा,
सपाट वाफे पद्धतीने,
योग्य काळजी घ्या
कीड व रोग व्यवस्थापनाने..
लागवडीनंतर आल्याला
द्या हलके पाणी,
याने उगवतील रशरशीत
आल्याचे बेणी...
शिफारशीप्रमाणे द्या
नत्र, स्फुरद, पालाश,
बेणेप्रक्रियेने होतो
बुरशीजन्य रोगांचा नाश...
लागवडीसाठी दर हेक्टरी
पंधराशे किलो आले,
बाजारभावामुळे "रामराव",
मालामाल झाले...
तापमान, आद्रता नियंत्रणाने
करा साठवण,
आल्याला नेहमी तेजी,
असू द्या आठवण...
"दिपू" म्हणे करा लागवड
किफायतशीर आल्याची,
नाही भासणार वानवा
मुरंबा, कँडी नी सुंठाची...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com
https://ahiredeepak.blogspot.com/?m
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा