name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): April 2023

सौर ऊर्जा : महत्त्व आणि वापर ( Solar Energy : Importance and Applications)

सौर ऊर्जा : महत्त्व आणि वापर 
Solar Energy : Importance and Applications

Solar Energy : Importance and Applications सूर्यापासून आपल्याला सौर ऊर्जा मिळते. सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा (Solar Energy) असे म्हणतात. सौर ऊर्जा हा अक्षय ऊर्जेचा मोलाचा स्रोत आहे. महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा वाढता वापर असून सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी भरपूर वाव आहे. विजेचा तुटवडा दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. येणाऱ्या काळात सौर ऊर्जा हाच एकमेव पर्याय असेल. 

Sour urja: mahtva aani vapar
औद्योगीक वापरासाठी सौरऊर्जा (industrial solar)

   सौर उपकरणे पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत. यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. बऱ्याच सौर ऊर्जा संयंत्राना अनुदानही (सबसिडी) उपलब्ध आहे.  आपण सौरऊर्जेचा वापर औद्योगीक वापरासाठी,घरासाठी तसेच ग्रामीण भागासाठी, शेतीसाठी कृषीपंप, गरम पाणी करण्यासाठी, रस्त्यांवरील पथ दिव्यांसाठी सौरऊर्जा वापरू शकतो. 

१. औद्योगीक वापरासाठी सौरऊर्जा (Solar energy for industrial use)

  • औद्योगिक वसाहतीत किंवा शहरी भाग, ग्रामीण भागात फॅक्टरी, शाळा, कॉलेजेस, वसतीगृह, दवाखाना, सरकारी कार्यालये, हॉटेल येथे आपण सोलर सिस्टीम बसवू शकतो.
  • याचबरोबर मंगल कार्यालय, फार्म हाऊस, कोल्ड स्टोरेज, प्ले ग्राउंड, गार्डन, धर्मशाळा, मंदिरे, गोशाळा, डेअरी फार्म, पोल्ट्री फार्म, शेत तलाव, पॉलीहाऊस, ग्लास हाऊस, रोपवाटिका इ. कुठेही आपण औद्योगीक वापरासाठी सौरऊर्जा वापरू शकतो

२. घरासाठी सौरऊर्जा (Solar energy for the home)

Sour urja: mahtva aani vapar
घरासाठी सौर ऊर्जा (solar for Home)

  • सौर पॅनलवर पडणाऱ्या सूर्यकिरणांच्या माध्यमातून विज निर्माण होते. 
  • तुमच्या घरावर सोलर बसवून कायमस्वरूपी दर महिन्याच्या वीज बिलापासून सुटका मिळवता येते.
  • गुंतवणूक 'वनटाईम' होते. परंतु फायदा 'लाईफटाईम' मिळतो. अशी ही फायदेशीर गुंतवणूक आहे.

३. ग्रामीण भागासाठी सौरऊर्जा (Solar Energy for Rural Areas)

  • ग्रामीण भागातील विजेचे लोडशेडींग आपल्याला माहीतच आहे. 
  • वेळोवेळी खंडित होणारी विज त्यामुळे बॅकअपसाठी असणाऱ्या जनरेटवर होणारा भरमसाठ खर्च व येणारे मोठ्या प्रमाणावरील लाईट बिल यावर एकच उपाय म्हणजे सूर्याच्या किरणांपासून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर करणे. 

४. शेतीसाठी कृषी पंप सौर ऊर्जा (Agricultural Pump Solar Energy for Farming)

Sour urja: mahtva aani vapar
कृषि पंप सौर ऊर्जा ( solar agricultural pump)

  • शेतात लाईट असो वा नसो. कधीही शेतातील पिकांना पाणी देणे सहज शक्य होते. 
  • सोलर कृषी पंपामुळे रात्री,बेरात्री शेतात पिकांना पाणी भरण्यापासून तुमची सुटका होऊ शकते. 

५. गरम पाणी करण्यासाठी सौर ऊर्जा (Solar energy for hot water)

  • सोलर वॉटर हिटरच्या सहाय्याने चोवीस तास गरम पाण्याचा पुरवठा होतो.  
  • नैसर्गिक पद्धतीने सूर्य किरणांपासून पाणी गरम होते. पूर्णपणे सुरक्षित आहे व अत्यल्प खर्चात देखभाल होते. 
  • महत्त्वाचे म्हणजे विजेची गरज नाही. प्रदुषणमुक्त, दीर्घायुषी अशी ही सिस्टिम आहे. 

६. पथदिव्यांसाठी सौरऊर्जा (Solar energy for street lights)

  • सोलर स्ट्रीट लाईट बसविल्यास वीज असो किंवा नसो, 
  • तुमच्या घरासमोर, गार्डनमध्ये, रस्त्यावर, फार्महाऊस, फॅक्टरी कायम प्रकाशमान असेल. 
  • कमी खर्चात, विना मेंटेनन्स, दीर्घकाळ प्रकाश मिळतो. 

 

Sour urja: mahtva aani vapar

    या सर्व सेवा-सुविधेत सोलर पॅनलची वॉरंटी पंचवीस वर्षाची असून बँक लोन सुविधाही मिळते. वारी, विक्रम, पॅनोसोनिक, श्रीराम, अदानी, गोल्डी,उषा, पोलिकॅब, ज्योतीटेक, रनोवसिस, कानेडियन व इतर कंपनीचे पॅनल मिळतात. सरकारी सबसिडीही मिळते. सोलरमध्ये एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर लाभ मिळतो.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


सेंद्रिय आणि जैविक तणनाशके Organic and biological herbicides

 सेंद्रिय आणि जैविक तणनाशके

Organic and biological herbicides

      रासायनिक तणनाशके विषारी असतात. रासायनिक तणनाशकाचे अवशेष जमिनीत राहिल्याने पुढील हंगामातील पिकाला त्याचा धोका संभवतो. सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक तणनाशके वापरता येत नाहीत. त्यामुळे तणाचे नियंत्रण करण्यासाठी सेंद्रिय व जैविक तणनाशके Organic and biological herbicides फायद्याची आहेत. 

Organic and biological herbicides
सेंद्रिय तणनाशक: उकळते पाणी 

सेंद्रिय तणनाशके

१) पाणी : 

  • साधे पाणी विषारी नाही तर उदासीन असते. उकळत्या पाण्याचा उपयोग तणांचा नायनाट करण्यासाठी करता येतो. 

  • आपण फुलझाडांची व भाज्यांची रोपे गदिवाफ्यावर किंवा नर्सरीतील सपाट वाफ्यात तयार करतो. 

  • कांदा व मिरची  या वाफ्यात तणाचे बी सुप्तावस्थेत असते. या वाफ्यात पिकांचे बी उगवले की त्यासोबत तणांचे बी देखील उगवते. आणि पिकांच्या रोपांशी स्पर्धा करते. 

  • या वाफ्यात बी पेरण्यापूर्वी किटलीत साधे पाणी उकळावे आणि वाफ्याच्या पृष्ठभागाच्या थरावर उकळते पाणी ओतून तो थर भिजवावा. 

  • त्यामुळे वाफ्यातील तणाचे बी, तणांचे अंकुर, रोगकारक सूक्ष्मजंतू व बुरशी मरते. त्यामुळे तेथे पुन्हा तण उगवत नाहीत. आणि बुरशीमुळे वाफ्यातील रोपे मरत नाहीत.

  • हा स्वस्त, सोपा व बिनविषारी उपाय आहे. 

  • अनेक ठिकाणी भिंतीवर वड व पिंपळाची रोपे उगवतात व वाढतात. त्यांच्या खोल मुळ्या भिंतीत शिरलेल्या असतात. ते मुळासह उपटता येत नाहीत. या झाडांच्या मुळांवर उकळते पाणी ओतल्याने ती करपून मरतात. 

२) मीठ :

  • आपण घरी खाण्यासाठी जे मीठ वापरतो. त्याची भुकटी तणांच्या पानावर टाकली तर पाने करपतात आणि सुकतात.

  • एक भाग मीठ दोन भाग पाण्यात विरघळून त्या द्रावणाची  तणावर फवारणी करावी. 

  • पिकांच्या पानावर द्रावण पडू देऊ नये. पडल्यास पिकांचीही पाने करपतात. 

  • मिठाच्या द्रावणाची फवारणी केल्याने गाजर गवताचे नियंत्रण  होते. 

  • मिठाच्या द्रावणाची फवारणी करताना ते जमिनीवर पडू देऊ नये. साडे चार लिटर व्हिनेगरमध्ये सव्वा कप मीठ मिसळावे. आणि द्रावणाची तणावर फवारणी केल्याने 2 ते 3 दिवसात तण वाळून मरते. 

Organic and biological herbicides
सेंद्रिय तणनाशक: लिंबाचा रस 

३) लिंबाचा रस : 

  • लिंबाच्या रसात सायट्रिक ऍसिड असते आणि त्याच्या फवारणीने तण करपून मरते.

  • पण त्यासाठी ज्या लिंबाचा रस वापरणे परवडत नाही. कागदी लिंबाच्या बागेत सतत फळगळ होत असते. आणि फळे वाया जातात. त्यांचा रस काढून तणावर फवारणी करता येते.

  • एक लिटर पांढऱ्या व्हिनेगारमध्ये १२० मी. ली. लिंबाचा रस मिसळून पाणी न मिसळता तणावर फवारणी करावी. त्यामुळे रुंद पानांच्या तणांचा नायनाट होतो. 

४) व्हिनेगर : 

  • कोणत्याही आम्लामुळे तणांची रोपे करपतात व मरतात.

  • व्हिनेगरमध्ये असेटीक असिड असते. लहान तणांच्या नियंत्रणासाठी ५ टक्के असेटीक असिड असलेल्या व्हिनेगारची फवारणी करावी.

  • ही फवारणी तणावर केल्यानंतर दोन दिवस पाऊस पडणार नाही  असा अंदाज पाहून फवारणी करावी. 

  • कोरड्या हवामानात दुपारी कडक उन्हात फवारणी केल्याने अधिक लवकर फायदा होतो.

  • दोन भाग उकळलेल्या पाण्यात एक भाग व्हिनेगार मिसळून त्या द्रावणाची तणावर फवारणी करतात. 

  • काटक तण मरण्यास पुन्हा फवारणी करावी लागते. 

५) डिटर्जंट: 

  • कपबशा व चिनी मातीची भांडी स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट वापरतात. 

  • एक भाग द्रव डिटर्जंट दहा भाग पाण्यात मिसळावे. आणि त्या द्रावणाची फवारणी करावी.

  • धुण्याच्या साबणाचे द्रावण फवारल्यानंतर रुंद पानाचे तण मरते. 

६) गोमूत्र : 

  • ताजे गोमूत्र गोळा करावे. हे ताजे गोमूत्र पाण्यात न मिसळता त्याची फवारणी तणावर केल्याने तण करपून मरते. 

७) मक्याचे पीठ : 

  • अंगणातील फरशीच्या फटीत वाढलेल्या तणावर मक्याचे पीठ टाकल्याने पिठातील ग्लूटेनमुळे तण वाढत नाहीत. 

८) मिश्रण : 

  • १.१ लिटर व्हिनेगर+ पाव कप मीठ+२ चमचे द्रव डिटर्जंट यांचे मिश्रण करावे. त्यानंतर तणावर फवारणी करावी. 

घ्यावयाची काळजी: 

  • वरील तणनाशकाच्या फवारणीने जसे तण मरते. तसेच पीकही मरण्याचा धोका असतो म्हणून शक्यतो ही फवारणी पीक शेतात नसताना करावी. 

  • पिकातील तणावर फवारणी करायची झाल्यास ही तणनाशके पिकावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.

  • पावसाचा अंदाज घेवून तणावर तणनाशकाची फवारणी करावी. कारण पावसाच्या माराने तणनाशके धुतली गेल्यास त्याचा परिणाम होत नाही.

  • तणनाशकांची फवारणी दिवसा दुपारी कोरड्या हवामानात केल्यास जास्त फायदा मिळतो.

  • ही तणनाशके जमिनीत मुरली असता शेजारच्या पिकांच्या मुळांवर त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणून काळजी घ्यावी. 

जैविक तणनाशके

१) किडीमुळे तणांचे नियंत्रण : 

Organic and biological herbicides
तण: गाजर गवत 


  • अमेरिकन गव्हामधून भारतात आयात केलेल्या बियाणापासून गाजर गवताचा संपूर्ण देशात प्रसार झाला आहे. 

  • या तणांचा नायनाट मेक्सिकन भुंगे करतात. एक अळी १० ते १५ हजार गवतांच्या झाडांची पाने खाते. त्यामुळे तणांची वाढ खुरटी होते. आणि बीजोत्पादन होत नाही.

  • निलगिरी तेलाची गाजर गवतावर फवारणी केल्यास १५ दिवसात हे तण मरते. 

  • पूर्वी नागफण या निवडुंगाची काटेरी झाडे शेताच्या कुंपणावर व रस्त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत होती. ऑस्ट्रेलियातून कोचीनील कीटक आणून त्या निवडुंगावर सोडले असता नागफणीचा संपूर्ण नायनाट झाला आहे. या किडीमुळे शेतातील पिकांचे नुकसान होत नाही. 

२) बुरशी रोगांमुळे तणांचे नियंत्रण: 

  • पक्सीनिया अंब्रप्टा या बुरशीमुळे गाजर गवताला तांबेरा रोग होतो. त्यामुळे ४२ ते ८५ टक्के  गाजर गवत मरते.

  • फोमोप्सिस या बुरशीमुळे बाथूआ व इतर अनेक महत्वाच्या तणांचा नाश होतो.

  • फायटोप्थोरा पालमीव्होरा या बुरशीने संत्र्याच्या बागेतील दुधी तणाचे नियंत्रण होते. 

  • पाठीवर ३ पट्टे असलेली खार गाजर गवताच्या फुलातील पराग खाते. त्यामुळे बीजोत्पादनास प्रतिबंध  होतो. 

  • गाजर गवताचे नियंत्रण केसिया सेरीसी या झाडामुळे होते. या झाडाच्या मुळातून पाझरणाऱ्या कावोलीनचा साठा जमिनीत होतो त्यामुळे तेथे गाजर गवत उगवत नाही. 

अशा पद्धतीने सेंद्रिय व जैविक तणनाशके वापरावीत. 


© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

रानवांगीची लागवड ते उत्पादन Cultivation to production of wild brinjal

रानवांगीची लागवड ते उत्पादन 
Cultivation to production of wild brinjal

        रानवांगी ही वनस्पती औषधांमध्ये वापरतात म्हणून महत्त्वाची आहे. या वनस्पतीची लागवड हळूहळू महाराष्ट्रात व भारतात निरनिराळ्या राज्यात सुरू झाली आहे. ही वनस्पती "स्टेरॉईड" समृद्ध आहे. 

Wild brinjal


वनस्पतीचा परिचय :  

  • रानवांगी ही सोलेनेसी या कुळातील असून सोलासोडीन स्टेरॉईडने समृद्ध असणारी महत्त्वाची वनस्पती आहे.

  • याचे शास्त्रीय नाव सोलेनम खाखियानम आहे. 

  • या पिकामध्ये शंभर प्रजाती आहेत. यामधील काही प्रजातीमध्ये ग्लायकोअल्कालाईड व सोलेसोडीन ही द्रव्ये आढळतात.      

  • रानवांगी ही झुडुपवर्गीय वनस्पती ०.७५ ते १.५० मीटर उंच वाढते.

  • हिची पाने नेहमीच्या वांग्याच्या पानांसारखीच असतात. पानांच्या बगलेत पांढऱ्या रंगाच्या फुलांचे गुच्छ येतात. 

  • पुनर्लागवडीनंतर साधारणतः ५५ ते ६५ दिवसांनी फुले येतात. 

  • फळे २ ते २.५ सें.मी. व्यासाची गोलाकार असतात. त्यांचा रंग हिरवट असतो व त्यावर पांढरे ठिपके असतात. 

  • फळे पिकल्यावर गर्द पिवळी होतात. फळे फोडल्यावर त्यातून चिकट बी निघते. 

औषधी गुणधर्म व उपयोग : 

  • या वनस्पतीमध्ये स्टिराइड जातीचे मूलद्रव्य असते. 

  • त्यापासून डी.पी.ए. नावाचे मूलभूत औषधी रसायन मिळते. त्यापासून कुटुंबनियोजनाची औषधे बनतात. 

हवामान : 

  • समशीतोष्ण व उष्ण हवामानात हे पीक चांगले उत्पन्न देते. 

  • २० ते ३५ अंश से. या हवामानात हे पीक चांगले येते. 

जमीन : 

  • मध्यम ते भारी काळी जमीन तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकास मानवते. व पीक चांगले येते. 

रोपे तयार करणे : 

  • साधारणत: एप्रिल व मे महिन्यात  रोपासाठी बी गादीवाफ्यावर ओळीत टाकावे 

  • दोन महिन्यात रोपे लागवडीसाठी तयार होतात. 

  • त्याची निगा इतर पिकाच्या रोपाप्रमाणे करावी.  त्याचप्रमाणे रासायनिक खत घालून रोपे तयार करावीत. 

लागवड : 

  • एक ते दोन पाऊस झाल्यावर नांगरट करावी. 

  • एक ते दोन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. 

  • हेक्टरी दहा ते वीस बैलगाड्या शेणखत घालावे. व लागवड सरीवरंब्यावर ७५ ते ९० × ४५ ते ६० सें.मी. अंतरावर करावी व लगेच पाणी द्यावे. 

खते

  • लागवडीच्या वेळी ५०:५०:५० किलो नत्र, स्फुरद व पालाश द्यावे 

  • लागवडीनंतर महिन्याने पीक फुलोऱ्यात असताना ६० किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.

  • लागवडीनंतर ८ ते १२ दिवसाचे अंतराने पाणी द्यावे. 

  • दोन खुरपण्या एक महिन्यानंतर पहिली व दोन महिन्यानंतर दुसरी खुरपणी करावी. 

रोग व कीड : 

  • या पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही परंतु भुरी, मर रोग, मावा, पाने खाणारी अळी केव्हा केव्हा दिसून येतात. 

  • मर हा रोग बुरशीपासून होतो. बियास ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. 

  • तसेच रोपवाटिकेत कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ग्रॅम १ लिटर पाणी या प्रमाणात झारीने टाकावे.

  • मावा व किडी खाणारी अळीच्या नियंत्रणासाठी नुवाक्रोन १० मिली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पिकाची काढणी : 

  • फळांचा रंग पिवळा होताच तोडणी करावी. पहिली तोडणी १८० दिवसांनी व दुसरी तोडणी त्यानंतर २ महिन्यांनी करावी. 

  • फळे खळ्यात पातळ थर् देऊन वाळवावीत. म्हणजे त्यास बुरशी लागणार नाही व फळे काळी पडणार नाहीत. 

उत्पादन : 

  • वाळलेल्या फळांचे उत्पादन प्रति हेक्टरी ६० ते ७० क्विंटल येथे. साधारणत: भाव ८०० ते १००० रु. प्रति क्विंटल मिळतो. 

  • हेक्टरी उत्पन्न ५० ते ६० हजार मिळते. लागवडीचा खर्च १५,००० होतो तर नफा ४० ते ५० हजारपर्यंत मिळतो.

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...