ध्येय सिध्दी
Goal Accomplishment
तुमची ध्येयसिध्दीच,
ठेवते मागे ओळख,
जगणं करावं संतुलित,
हीच ध्येयसिध्दीची मेख
ध्येयसिध्दीसाठी धावतात बेभान,
निसटतात अनमोल गोष्टी,
जिंकल्याचा नसतो आनंद,
नुसतं यंत्रवत झेपावण्याची सृष्टी
ध्येयसिध्दी प्राप्त करा,
सत्य व प्रामाणिकपणाच्या मार्गावर,
ध्येयसिध्दीचा अप्रामाणिकपणा,
पोखराल सततच्या चिंतेवर
तुमची ध्येयं कशी आहेत,
यावरून ओळख मागे राहते,
ध्येय गाठूनही काही,
पराभूत मानसिकतेने गाणे वाजवते
© दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment