name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): अंगणामध्ये जाेडी बैलाची (Bull in the yard)

अंगणामध्ये जाेडी बैलाची (Bull in the yard)

अंगणामध्ये जाेडी बैलाची...
Bull in the yard

Bull in the yard

Bull in the yard



अंगणामध्ये जाेडी बैलाची 
आवर्जून बैलपोळ्याला यायची, 
दाखवायचाे नैवेद्य पुरणपोळी  
आई साजूक तूप वाढायची...

अंगणामध्ये जाेडी बैलाची
नाविन्यतेने आम्ही सजवायचाे,
या  सर्जाराजाला आम्ही
मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायचाे...

अंगणामध्ये जाेडी बैलाची
झूल आम्ही चढवायचाे,
गळ्यात माळा, हार, फुगे
तुलनेने त्यांना सजवायचाे....

अंगणामध्ये जाेडी बैलाची
कृतज्ञता आम्ही दाखवायचाे,
वर्षभर राब राब राबायचे
बैलपोळा खास रंगवायचाे....

© दीपक अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...