कविता माझी सांगते...
Poem says mine
कविता माझी सांगते
अन्यायाच्या कथा,
वेळप्रसंगी फाेडताे
कवितेव्दारे वाचा...
कविता माझी सांगते
अंतरंगातून संदेश,
कधी कधी ती साेडते
मनापासून आदेश...
कविता माझी सांगते
सहजसाेपं जगणं,
जमेल तर बदला
तुम्ही तुमचं वागणं...
कविता माझी सांगते
वाचाल तर वाचाल,
घाईगडबडीच्या जगात
नित्य अडखळून पडाल...
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment