अनुभवाचा ठेवा
Keep the experience
अनुभवाचा ठेवा,
वाटून ताे घ्यावा
ज्येष्ठांनी सांगावा,
तरुणांसाठी....
अनुभवाचा ठेवा,
त्यामुळे ताे तरावा
करी तुमचा धावा,
अनुभवांसाठी....
अनुभवाचा ठेवा,
कर्तव्याचा मेवा
ही अनमोल सेवा,
सर्वांसाठी...
अनुभवाचा ठेवा,
सुंदर ताे भावा
अनुभव ताे लिहावा,
आपल्यांसाठी...
अनुभवाचा ठेवा,
हुशार ताे व्हावा
चुकलं तर सावरावा,
प्रयत्नांसाठी...
अनुभवाचा ठेवा,
जाे- ताे नहावा
पवित्र असा व्हावा,
संघर्षासाठी...
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment