हे गणराया
Hey ganrayaa
हे गणराया...
सध्या झाला अनाचार,
दुबळ्यावर होतो अत्याचार
जो तो होतो सवार,
परजतो शस्त्राची धार
हे गणराया...
दुःखितांचे दुःख बघ,
अन्यायाला न्याय दे
शोषितांचे अश्रू पूस,
उजळू दे त्यांची कुस
हे गणराया...
नैसर्गिक आपत्ती देऊ नको,
स्वैराचार वाढवू देऊ नको
सत्याला आवाज द्या हो,
आंधळ्याचा पाठीराखा हो
हे गणराया...
मागणी खूप नाही अवास्तव,
तू समजून घे आमचं वास्तव
तुझ्या चरणी होतो मी लीन,
मी तुझा भक्त जसा आहे मीन
© दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment