पाच,चार,सहाची कविता
कसे दु:ख सांगू माझ्या शेतकऱ्याचे,
पेरला मका, उगवली बोंड अळी,
कशी माझ्या शेतावर पडली छाया काळी
मी एवढा कुशल शेतकरी माळी,
पेरणीच्या अचूक वेळा पाळी,
अपेक्षित पाऊस झाला, भरली माझी शेततळी...
बोंड अळीने फस्त केलं मक्याचे रान,
कसे संकटाचं अस्मानी थैमान
संकटे कोसळतात, गावू कसे समाधानाचे गान,
असू द्या शेतकरी कितीही लहान
काळ्या आईसाठी लावतो प्राण,
उतरेल कधी जय जवान जय किसान...
@ दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment