name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): तुझ्या असण्याचे धागे (Threads of your being)

तुझ्या असण्याचे धागे (Threads of your being)

तुझ्या असण्याचे धागे...
Threads of your being


Threads of your being


तुझ्या असण्याचे धागे 

जागाेजागी सापडतात मला,

शिकवली तू व्यासंगी 

जीवन जगण्याची कला...

तुझ्या असण्याचे धागे 

नसतात ते भाैतीक पुरावे,

कितीही व कुठेही करा 
तुझ्या नसण्याचे ते कावे...

तुझ्या असण्याचे धागे 

जुडल्या आहेत आठवणी,
माझ्या ह्दयात त्या 

पसरल्या आहेत पानाेपानी...

तुझ्या असण्याचे धागे 

सध्या मी करताे गाेळा,
नसेल जरी तू जीवंत 

आठवणींचा झाला साेहळा...

© दीपक अहिरे,नाशिक

No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...