शेती (अहिराणी कविता)
sheti (Ahirani kavita)
नोकरीवालास्ना भलता हाल
शेतीमा चालत नही त्यासनी चाल,
सालदारास्ले पैसा देना पडतस मालामाल
पण गडी कुठे घालस पुरं साल...
अर्धा पैसा इकडून काढ
अर्धा पैसा तिकडून काढ,
आणखी वरतीन जेवण वाढ
जत्राले जावाना सेतंस लाड...
सालदार किंमत धरत नही
येळ, वकूत जाणी घेत नही,
उत्पन्न दमडीनं नही
पण पैसा घेवानी,भलतीच घाई...
फेडानं नाव काढत नही
अर्धी रातले पळी जाई,
त्यानाबरोबर जास बाई
नातेवाईकस्नी वळख त्याले नही...
या जमानामा मांगे उभं राह्यनं
त्यानी शेती राह्यनी,
सग्गासाई, भाऊबंदकी
लुबाडीत खात जाई...
दीपक के. अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com


No comments:
Post a Comment