name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): विजय (victory)

विजय (victory)

विजय
victory

Victory

विजय मिळेपर्यंत

करा वापर शक्तीचा,

विजय मिळाल्यानंतर 

करू नका वापर शक्तिप्रदर्शनाचा...


विजयासाठी व्हा तुम्ही आक्रमक 

विजयानंतर राहा नम्र,

याने कळतं पुढे काय घडणार, 

श्रद्धा सबुरी ठेवून व्हा विनम्र...


यश टिकवायचं असेल तर

सुरूवात चुकीची झाली तरी चालते,

शेवट कुठे करायचा 

हे कळणंही महत्वाचे असते...


विजय मिळवल्यावर तुम्ही स्वतःला

इतरांपेक्षा वेगळे मानू नका,

कार्यकर्त्यांना कमी लेखून

स्वतः उंचीवर जाऊन बसू नका...


© दीपक केदू अहिरे, नाशिक

No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...