name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): कृषिरत्न फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम l Krishiratna Foundation’s Noble Initiative

कृषिरत्न फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम l Krishiratna Foundation’s Noble Initiative


कृषिरत्न फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम: मालेगावात ६ जून रोजी गरजू शेतकरी कुटुंब व शहीद जवानांच्या कुटुंबियांना मोफत खते, बियाणे व साडी-चोळी वाटप!
Krishiratna Foundation’s Noble Initiative: Free Fertilizers, Seeds, and Saree-Choli Distribution to Needy Farmer Families and Families of Martyred Soldiers in Malegaon on June 6!

Krushiratna foundation


 "चला जपूया मातीला, नाती आता करूया आधुनिक शेती..." हा उदात्त संदेश घेऊन सामाजिक व कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कृषिरत्न फाउंडेशन (तळवाडे, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांच्या वतीने यावर्षीही दरवर्षीप्रमाणे एक अत्यंत कौतुकास्पद आणि दिलासादायक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

​ खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना शेतकरी बांधवांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी फाउंडेशन सरसावले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आत्महत्याग्रस्त व आकस्मिक मृत्यू झालेले शेतकरी कुटुंब, अपंग शेतकरी आणि देशासाठी प्राणांची आहुती देणारे शहीद जवान यांचे निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबियांना खरीप हंगामासाठी मोफत खते, बी-बियाणे व साडी चोळी वाटप केले जाणार आहे.

🗓️ कार्यक्रमाचे नियोजन आणि वेळ:

​  हा भव्य वाटप सोहळा ६ जून २०२६, शनिवार रोजी सकाळी ठीक ११:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या पूर्वसंध्येला मिळणारे हे मोफत कृषी साहित्य गरजू शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार देणारे ठरेल.

📍 कार्यक्रमाचे ठिकाण:

कृषिरत्न ॲग्रो मॉल शर्मा वस्ती, तळवाडे-ढवळेश्वर रोड, ता. मालेगाव (जि. नाशिक)

🤝 कसमादे भागातील नागरिकांना जाहीर आव्हान:

​  कृषिरत्न फाउंडेशनने कसमादे (कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा) भागातील सर्व सुजाण नागरिकांना, समाजसेवकांना आणि तरुणांना जाहीर आव्हान केले आहे की, आपल्या परिसरात असे कोणतेही गरजू, निराधार, अपंग शेतकरी किंवा शहीद जवानांचे कुटुंब असतील तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवावा, जेणेकरून या मदतीचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचू शकेल.

📞 संपर्क व अधिक माहितीसाठी:

​  या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता:

  • श्री. योगेश पवार — ९६५७७४५२५३ (9657745253)

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कार्बन क्रेडिट म्हणजे काय? | What is Carbon Credit? शेतकऱ्यांसाठी संधी, Carbon Market, Net Zero आणि ESG ची संपूर्ण माहिती

 कार्बन क्रेडिट म्हणजे काय?| Carbon Credit ची संपूर्ण माहिती, शेतकऱ्यांसाठी संधी आणि भारतातील Carbon Market कार्बन क्रेडिट म्हणजे काय?   हवा...