बोर लागवड ते प्रक्रिया उद्योग
Ber cultivation to processing industry
शेतात बोर शेतकरी बिनघोर!
Ber in the fields, farmers are not afraid!
किफायतशीर शेती करण्यासाठी शेत पिकांबरोबर शेतात उत्पादित होणाऱ्या पिकांपासून उपपदार्थ तयार केल्यास त्याद्वारे मूल्यवृद्धीचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो. यासाठी बोर हे पीक चांगले आहे.
बोरात असणारे भरपूर अन्नघटकRich in nutrients found in ber
शरीर पोषणासाठी आवश्यक असणारी खनिजद्रव्ये व जीवनसत्त्वे फळांपासून आपणास मिळतात म्हणून आहारामध्ये फळांना फार महत्त्वाचे स्थान आहे. बोरात असणाऱ्या अन्नघटकांचे प्रमाण सफरचंदातील असणाऱ्या अन्न घटकाच्या प्रमाणाशी मिळतेजुळते असून क जीवनसत्त्वाचे प्रमाण सफरचंदापेक्षा जास्त आहे. या देशात बोराची लागवड अतिप्राचीन काळापासून होत आली आहे. बोरात अनेक प्रकार असून स्थानिक तसेच उन्नत जातीही मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या आहेत. सफरचंदासारखे अॅपल बोरही आजच्या घडीला विकसित झाले असून त्याची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे.
लोकप्रिय फळ
Popular fruit
बोराची अभिवृद्धी डोळे भरून रोपे तयार केली जातात. बोर फळ पिकांत उमरान, कडाका, मेहरून आदी जातीची लागवड मोठ्या प्रमाणात दिसून येते. कोरडवाहू फळ शेतीतील बोर हे सर्वात लोकप्रिय फळ आहे. हे फळझाड अतिशय चिवट व कणखर व दुष्काळी परिस्थितीत चांगले वाढते, शिवाय उत्पादनही मोठ्या प्रमाणात देते.
शास्त्रशुद्ध लागवडScientifically pure cultivation
बोराची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केल्यास पडीत जमिनीतसुद्धा चांगले उत्पादन मिळते. बोराची लागवड कोणत्याही हवामानात केली तरी चालते. बोराची लागवड करताना कमीत कमी १ मीटर खोल खाली मुरमाचा थर असणारी जमीन पाहिजे. जमिनीचा सामू ६ ते ८ च्या दरम्यान असावा. जमीन मध्यम प्रतीची, पोयट्याची चांगला निचरा होणारी जमीन बोर पिकासाठी चांगली समजली जाते. साधारणतः पावसाळ्यात लागवड करतात. लागवडीची पद्धत व झाडामधील अंतर निश्चित केल्यावर खड्डे खोदून बोर रोपाची लागवड करावी.
मोठ्या प्रमाणात लागवडLarge-scale cultivation
बोराचे उगमस्थान दक्षिण आशिया किंवा मलाया येथील आहे कोरडवाहू क्षेत्रात अत्यंत हलक्या व डोंगर उताराच्या जमिनीत अन्नधान्याची पिके चांगल्या प्रकारे उत्पादन देत नाही अशा ठिकाणी बोराची लागवड केली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, पुणे, जळगांव, नाशिक, धुळे या जिल्ह्यांत बोरीची मोठ्या प्रमाणात लागवड आढळून येते. महाराष्ट्र शासनाच्या फलोद्यान कार्यक्रमामुळे बोर लागवडीचे क्षेत्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
सर्व प्रकारच्या जमिनीत येणारे पीक
Crops that grow in all types of soil
बोराची झाडे ही उष्ण हवामान सहन करू शकतात. उष्ण आणि कोरड्या हवामानात बोरीच्या झाडांची वाढ आणि फळांचे चांगले उत्पादन येते. हवेत जास्त आर्द्रता असलेल्या भागात बोरीच्या झाडांवर रोग किडीचा मोठया प्रमाणावर उपद्रव होतो. कडक उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी झाडाची पानगळ होऊन बोरीची झाडे उन्हाळ्याच्या सुरुवातीला सुप्तावस्थेत जातात. बोरीचे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. अत्यंत हलक्या मुरमाड जमिनीपासून ते भारी जमिनीत बोरीचे पीक चांगले येते.
सुधारीत जातींची लागवडCultivation of improved varieties
बोरीची अभिवृद्धी बियांपासून अथवा डोळे भरून करतात. बियांपासून अभिवृद्धी केल्यास फळे उशिरा लागतात. बियांपासून तयार केलेल्या झाडांचे गुणधर्म मातृवृक्षाप्रमाणे असतील याची खात्री नसते. म्हणून बोरीची अभिवृद्धी नेहमी डोळा भरून करावी. त्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवडीसाठी निवडलेल्या जागी योग्य त्या अंतरावर खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्यात एक जोमदार बोरीचे रोप लावावे. महाराष्ट्रात प्रामुख्याने उमराण, कडाका, सन्नुर-२, सन्नुर-६, चुहारा, मुक्ता, गोला, इलायची, मेहरूण या जातींची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.
बोरीची वळण आणि छाटणी
Sack twisting and pruning
बोरीच्या नवीन झाडांना सुरुवातीपासून योग्य वळण देणे आवश्यक आहे. डोळा फुटल्यानंतर खुट रोपावर येणारी नवीन फूट वेळच्या वेळी काढून टाकून डोळ्यातून येणारी नवीन फूट जोमदार वाढू द्यावी, नवीन फुटींना बांबू काठीचा आधार द्यावा. नवीन फुटीवर ६० सें. मी. पर्यंत येणाऱ्या फांद्या काढून टाकून त्यापुढे ३ ते ४ फांद्या चारी बाजूस समान विभागल्या जातील अशा बेताने दोन फांद्यात १५ ते २० सें. मी. अंतर ठेवून वाढू द्याव्यात. मुख्य खोड आणि ३ ते ४ फांद्या आणि त्यावरील उपफांद्याचा मजबूत सांगाडा तयार करून घ्यावे, वळण देण्याचे काम पहिल्या तीन वर्षात करून घ्यावे. बोरीचा बहर नवीन फुटीवर येत असल्याने अधिक उत्पादनासाठी त्यामुळे बोरीची छाटणी ही उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे.
खत व पाणी Fertilizer and water
बोरीच्या पूर्ण वाढ झालेल्या मोठ्या झाडास प्रत्येकी ४ ते ५ घमेले शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व २५० ग्रॅम पालाश द्यावे. पहिल्या पावसाबरोबर ४ ते ५ घमेली शेणखत, २५० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व २५० ग्रॅम पालाश द्यावे व दुसरा नत्राचा हप्ता २५० ग्रॅम फलधारणा होताच द्यावा. पावसाळ्यात बोरीला पाणी देण्याची गरज नसून जास्त काळ पाऊस लांबल्यास १ ते २ वेळा पाणी द्यावे. फळधारणा होताना पाणी देणे गरजेचे आहे. काळ्या व भारी जमिनीत दर ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे.
फळांची काढणी आणि उत्पादनFruit harvesting and production
महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे बोराच्या छाटणीनंतर पावसाळी हंगामात म्हणजे जुलै-ऑगस्ट महिन्यात बोराच्या झाडांना फुलोरा येतो आणि फळे नोव्हेंबरपासून काढणीस तयार होतात. बोराच्या फळांच्या काढणीचा हंगाम जानेवारीपर्यंत चालू राहतो. फळांची काढणी योग्य वेळीच करावी. फळांची काढणी अत्यंत लवकर किंवा उशिरा केल्यामुळे फळांची चव आणि प्रत बदलते. त्यामुळे अशा फळांना बाजारात किंमत कमी मिळते. जातीपरत्वे बोराच्या फळांचा गर्द हिरवा रंग नाहीसा होऊन त्यावर पिवळसर लाल झाक येते. परिपक्व झालेली फळे पूर्ण पिकण्याआधी तोडणे आवश्यक असते. काढणी सकाळीच करावी. देठ ठेवूनच बोराची फळे अलगद तोडावीत. बोराचे प्रति झाडापासून ७५ ते १०० किलो किंवा हेक्टरी १५ ते २० टन उत्पादन मिळते.
बोरांपासून विविध पदार्थ Various food from berries
बोरांपासून आपण विविध पदार्थ तयार करू शकतो. बोरांपासून सुकामेवा किंवा खजूर, रस काढून त्यापासून सरबत, स्क्वॅश, सिरप व वाईन (मद्य), दुटीफ्रुटी, सुकविलेली बोरे व बोराची पावडर असे विविध पदार्थ तयार करता येतात.
रसापासून पेये
Drinks from juice
बोरांच्या रसासाठी मोठ्या आकाराची व खाण्यास योग्य अशा पिवळसर जातीच्या बोरांची निवड करावी. एका मोठया पातेल्यात भरपूर पाणी घ्यावे त्यामध्ये बोरे टाकावीत किडकी व खराब बोरे पाण्यावर तरंगतात. पाण्यावर तरंगणारी बोरे काढून टाकावीत. पाण्याच्या तळाशी राहणारी बोरे स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर त्यांच्या बिया कोर्कबोरर मदतीने काढाव्यात. नंतर त्या बोरांचे सुरीने दोन भाग करून ज्यूसरमध्ये टाकून त्याचा लगदा काढावा. हा लगदा उभट भांड्यात थंड तापमानात (४ अंश से.) दोन तास ठेवल्यानंतर मळीचा भाग रसावर तरंगतो. तो भाग झाऱ्याच्या मदतीने वेगळा केल्यास खाली फक्त रस राहतो. तो रस नंतर चार पदरी मलमल कापडातून गाळून घ्यावा व शेवटी फिल्टर पेपरमधून गाळून घेतल्यास स्वच्छ व चांगल्या प्रतीचा रस मिळतो. एक किलो बोरापासून त्यांच्या जातीनुसार ४० ते ४५ टक्के रस मिळतो. या रसापासून सरबत, स्क्वॉश, सिरप तसेच वाईन (मद्य) ही पेये तयार करता येतात.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment