नवीन वर्षाची सुरुवात
Beginning of New Year
नवीन वर्षात भिंतीवरची
कॅलेंडर बदलतात,
व्यक्ती वर्तन आणि सवयी
मात्र त्याच राहतात
नवीन वर्षाचे स्वतःसाठी
नियोजनपूर्वक कॅलेंडर बनवा,
वैयक्तिक आयुष्य,कुटुंब,आरोग्य
अर्थ व्यवस्थापनाचा मेळ साधावा...
दर महिन्याला करावी
नियमित आरोग्य तपासणी,
व्यायाम आणि योगासने
गुणगुणावे आनंद गाणी
निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी
प्लॅन करा सहलीचा,
नवीन गोष्टींचे कौशल्य शिकून
संकल्प नववर्षात प्रगती करण्याचा
अशा गोष्टींवर करा लक्ष केंद्रित
यशस्वी होण्यास करतात मदत,
आत्मपरीक्षणाने ओळखा उणिवा
विकास करून सतत राहा शिकत...
नवीन वर्षात करा तुम्ही
गुंतवणूक सुनिश्चित करण्याचे,
बचतीचा मूलमंत्र अंगिकारा
साध्य करा मोठे आर्थिक उद्दिष्ठाचे...
नव्या वर्षाच्या निमित्ताने
स्वतःपासून सुरुवात करा,
आयुष्यातील सकारात्मक बदलांची
आतापासूनच पायाभरणी करा...
© दीपक केदू अहिरे, नासिक
deepakahire1973@gmail.com
No comments:
Post a Comment