बचत समूहातील उत्पादनांची ऑनलाइन विक्री
Online sale of Bachat group productsजिल्ह्यातील पहिलाच प्रयोग :'गोदाव्हॅलीकार्ट'वर उपलब्धFirst experiment in the District : Available on 'Goda Valley Cart'
नाशिक : ग्रामीण भागातील महिला बचत समूहाकडून तब्बल तीनशे प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जात आहे. या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अभियान नाशिकच्या वतीने 'गोदा व्हॅली कार्ट' हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.
![]() |
Ashima mittal CEO zillha parishad |
जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांचे आवाहन
या संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेक गृहोपयोगी वस्तू याठिकाणी रास्त दरात खरेदी करता येतील. या संकेतस्थळाचा वापर करून वस्तू खरेदी कराव्यात असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे सर्वांगीण जीवनमान उंचवावे, आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम व्हाव्यात, यासाठी त्यांचे उद्योग सुरू करून त्यांना स्थानिक, शहरी बाजारपेठ मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
गोदा व्हॅली कार्ट' या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती
शासनाच्या वतीने विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, मोफत प्रशिक्षण देणे, उद्योग सुरू करण्यासाठी ग्रामसंघ-प्रभाग संघाकडून अत्यल्प दरात कर्ज उपलब्ध करून देणे, बँकेकडून कर्ज मिळवून देणे, तसेच त्यांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली 'गोदा व्हॅली कार्ट' या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे.
उत्पादित वस्तूंचा दर्जा व गुणवत्ता उत्तम
बचत गटांकडून उत्पादित करण्यात आलेल्या वस्तूंचा दर्जा व गुणवत्ता उत्तम असून, खाद्यपदार्थामध्ये उद्योग करणाऱ्या उद्योग समूहांची संख्या शंभराच्या वर आहे तर विविध प्रकारची पापड उद्योग करणाऱ्या समूहांची संख्या दोनशे पेक्षा जास्त आहे. या सर्व उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून ग्रामीण महिलांना त्यांच्या उद्योगवाढीस चालना मिळेल या उद्देशाने हे व्यावसायिक संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.
'तत्त्व' या ब्रँडअंतर्गत उत्पादित होणाऱ्या आकर्षक कलाकुसरीच्या साड्या, बेडशीट, लेडिज कुर्ता, दुपट्टा, पाटीलकी ब्रँडच्या माध्यमातून पैठणी, ज्वेलरी व पैठणी साड्या, मिक्स मास्टर अंतर्गत तब्बल ६९ प्रकारचे प्रिमिक्स, इटवायझली या ब्रँडखाली नागली कुकीज, नागली इडली, डोसा,उत्तप्पा, अप्पे, प्रीमिक्स, तर बाँडिंग स्टोरीज या ब्रँडच्या माध्यमातून चॉकलेट, राख्या, किचेन अशा अनेक ब्रँडेड वस्तू उपलब्ध आहे.
वेबसाइटवर खरेदी
ग्रामीण महिलांनी उत्पादित केलेल्या या वस्तू आपल्या उपयोगाच्या आहेत. त्या गोदा व्हॅली कार्ट https://godavalleykart.com या वेबसाइटवर खरेदी करता येणार आहे.
© दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com
Telegram : https://t.me/swakavyankur
Facebook :
Instagram :
YouTube
Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673
Share chat :
Twitter :
@DeepakA86854129
Website :
No comments:
Post a Comment