शेळीपालन
Goat farming
शेळी आहे
गरीबाची गाय,
हा धंदा आहे
दुधावरची साय
वेत तिचे
दोन, तीन जन्मतात,
तेही नुसते हातोहात
विक्री होतात
अल्पभूधारकांनी
करावे शेळीपालन,
या धंद्यामुळे मिळते
एकदम चलन
बंदिस्त पद्धतीने
करा शेळीपालन,
यासाठी हवे आहे
जाळीदार कुंपण
जात चांगली
जमनापरी, उस्मानाबादी,
अंथराल तुम्ही
पैशांची लादी
शेळीला हवा
स्वच्छ भरपूर चारा,
तो मिळवण्यावरच लक्ष केंद्रित करा
आता कमी झाले
आहे चराऊ कुरण,
हा धंदा म्हणजे आहे
एक चलनी नाणं
शेळीपालनात गव्हाणी
ठेवा साफ,
उगीच दवडू नका
तोंडाची वाफ
गाभण शेळ्या,
पिल्लांची घ्या काळजी,
पशुवैद्यक सल्ल्याची
बातमी घ्या ताजी
आरोग्य प्रजननाच्या
समस्येवर करा मात,
नका करू या भरवशाच्या
धंद्याचा घात
दिपू सांगतो लोकहो
करा शेळीपालन,
प्रसंगी द्या कर्जासाठी
जमीन तारण
नियोजनाने करा
व्यवसायात प्रगती,
कामाप्रसंगी विसरा
आता तुम्ही नातीगोती
'हाजीर तो वजीर'
असा आहे हा धंदा,
नाहितर तुमचा
अर्ध्यातच करेल वांदा
© दीपक केदू अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा