कोंबडीपालन (poultry farming)
शेतकरी दादा तुम्ही करा कोंबडीपालन,
चालू राहिल तुमचे सदोदित चलन
बेरोजगारांसाठी ही नामी संधी,
सोडू नका अनुदानाची सुवर्णसंधी
करा तुम्ही कराराने ब्रॉयलर कुक्कुटपालन,
याने होईल सर्व घराचे पालन-पोषण
जात लक्षात असू द्या सातपुडा देशी,
लावाल नुसत्या पैशांच्या राशी
परसातील लक्ष्मी म्हणजे राधाराणी,
खिशात तुमच्या खुळखुळतील नाणी
असू द्यावी लक्षात गिरीराज वनराज,
त्याने चढेल तुमच्या कुक्कुटपालनाला साज
परसातील कोंबडीपालन आहे सहज आणि स्वस्त,
याने होतील विनाशकारी अळ्या फस्त
देशी,ब्रॉयलर कोंबडीपालन आहे फायदेशीर,
या जोडधंद्याद्वारे मारा संसाराचा तीर
कुक्कुटपालनात आहे विविध कंपन्याचे योगदान,
त्यांच्यामुळे आहे या उद्योगाची जान आणि शान
अंड्यांसाठी करा तुम्ही कुक्कुटपालन,
यामुळे मिळेल जगा प्रथिनयुक्त अन्नसधन
मांसासाठीही करा तुम्ही हा उद्योग,
याने चढेल तुमच्या प्रगतीचा वेग
उष्माघातापासून करा कोंबड्यांचे संरक्षण,
त्यांच्या पाण्यात टाका बर्फ विरघळून
कुक्कुटपालनासाठी घ्या शास्त्रोक्त प्रशिक्षण,
प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात आहे हे शिक्षण
कुक्कुटखाद्यासाठी वापरा सोयाबीन, मका,
स्वच्छ पाणी देण्यासाठी अंग चोरू नका
कोंबडीखतात आहे दर्जेदार गुण,
याने वाजेल दर्जेदार शेतीउत्पन्नाची धून
कुक्कुटपालनातून अनेक झाले लखपती,
लावा गावागावात ह्या धंद्याच्या वाती
होतो आहे आता पोल्ट्री कंपन्याचा विस्तार,
तुम्हीही करा आता या धंद्याचा विचार
या दशकात वाढेल कुक्कुटउद्योगाने विकासदर,
म्हणून दिपू सांगतो कुक्कुटपालनाचा रस्ता धर
© दीपक केदू अहिरे, नाशिक
#कोंबडीपालन
#poultryarming
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा