name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): ओंजळभर शब्द..

ओंजळभर शब्द..

ओंजळभर शब्द 
आपल्यासाठी आणतो
हा शब्द फुलांचा कसा 
सुवास दरवळतो.

ओंजळभर शब्द
शब्दाने देव पुजतात
तुमच्यासाठीच माझ्या 
कविता कशा सजतात 

ओंजळभर शब्द 
असतात लाख मोलाचे, 
तुमचे आशीर्वाद असू द्या 
कौतुक शब्दांच्या बोलाचे 

ओंजळभर शब्दाने 
पसरते शब्दांचे चांदणे 
शब्दाशब्दांनीच करतो
मी आपणास ओळखणे 

@ दीपक केदू अहिरे, नाशिक  


No comments:

Post a Comment

मायक्रोग्रीन शेती व्यवसाय | Microgreen Farming Business : कमी गुंतवणुकीत घरातून जास्त नफा

  🌱 मायक्रोग्रीन शेती व्यवसाय: कमी जागेत जास्त नफा देणारा आधुनिक उद्योग Microgreens Business in Marathi | कमी गुंतवणुकीत जास्त कमाई      ...