आयुष्य सुंदरच आहे
Life is beautiful
आयुष्य सुंदरच आहे
जन्म तू मला दिला,
तूच केली माझी सुरक्षा
प्रणाम त्या मातेला...
आयुष्य सुंदरच आहे
साहल्या तू प्रसूतीकळा,
जन्म मला दिल्यावर
अश्रू आले तुला घळघळा...
आयुष्य सुंदरच आहे
तूच वेचली आयुष्याची वीण,
रोजच मी तुला आठवतो
आज राष्ट्रीय माता सुरक्षा दिन...
आयुष्य सुंदरच आहे
हे नेहमीच ठसवलं तू मला,
सुखासीन आयुष्याचा
आज अर्थ मला उमगला...
© दीपक सरला केदू अहिरे
नाशिक
No comments:
Post a Comment