उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे हॉस्पिटल 'किम्स मानवता' रुग्ण सेवेत दाखल
North Maharashtra's largest hospital 'Kims Humanity' admitted to patient service
अत्याधुनिक आरोग्य सुविधा, सर्वांसाठी उपचाराचा संकल्प
नाशिक- सध्याच्या स्थितीत वैद्यकीय क्षेत्रात उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देतांना भविष्यात प्रभावी ठरणार्या तंत्रज्ञानाची उपलब्धता किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केली जाणार आहे. सर्वांसाठी उपचाराचा संकल्प घेतल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल कुठल्याही आर्थिक स्तरावरील रुग्णाला हमखास उपचाराची हमी उपलब्ध असेल. ३५० बेड्सचे सुसज्ज असे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे खासगी हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे, अशी घोषणा किम्स मानवता हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) डॉ.राज नगरकर यांनी केली.
मुंबई नाका परीसरातील किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये मंगळवारी (१७ डिसेंबर) झालेल्या पत्रकार परीषदेतून त्यांनी ही माहिती दिली आहे. अधिक माहिती देतांना डॉ.राज नगरकर म्हणाले, नाशिककरांना सर्वसमावेशक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात 'किम्स' आणि 'मानवता' यांनी भागिदारीतून किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली आहे. मेडिकल टुरीझमच्या क्षेत्रात प्रगती साधत असलेल्या नाशिकला या हॉस्पिटलचा मोठा हातभार लागणार आहे. हॉस्पिटलची उभारणी करतांना १० वर्षांनी कुठल्या स्वरुपाचे तंत्रज्ञानाची आवश्यकता असेल, याचा विचार करुन सर्वात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरवितांना हॉस्पिटल 'फ्युचर रेडी' झाले आहे.
हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला कुठल्याही चाचणी किंवा उपचारासाठी हॉस्पिटलबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. प्रदीर्घ अनुभव असलेली डॉक्टरांची व पॅरामेडिकल टीम रुग्ण सेवेसाठी सदैव तत्पर असणार आहे. 'ट्रिटमेंट फॉर ऑल' या संकल्पनेवर काम करतांना हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला कुठलाही रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहाणार नाही, याची खातरजमा टीम करणार आहे. त्यामुळे मेडिक्लेम, शासकीय योजनांचे लाभार्थी, राज्य व केंद्र शासनाच्या सेवेतील कर्मचारी यांना किम्स मानवताच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
या पत्रकार परीषदेप्रसंगी किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे एमडी डॉ.राज नगरकर, किम्स मानवता हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ.नीलेश सिंग, हृदयविकार तज्ज्ञ डॉ.नितीन कोचर, डॉ.प्रतिक्षित महाजन, डॉ.यतिंद्र दुबे, डॉ.प्रमोद शिंदे, डॉ.ललित लवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वात मोठा आपत्कालीन विभाग
आगामी सिंहस्थ कुंभमेळा येऊ घातला असून, लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. तसेच विविध कारणांनी नाशिकला पर्यटकांची कायम वर्दळ असते. या पार्श्वभुमीवर हॉस्पिटलमध्ये सर्वात मोठा आपत्कालीन विभाग (इमर्जन्सी वॉर्ड) उपलब्ध आहे. यातून मास कॅज्युअल्टी हाताळण्याची क्षमता असणार आहे.
मदर-चाईल्ड केअरला प्राधान्य
हॉस्पिटलमध्ये मदर-चाईल्ड केअर विभाग कार्यान्वित असणार आहे. यामध्ये महिलांना प्रसुतीपूर्व मार्गदर्शनापासून, प्रसुती व त्यापश्चात आवश्यक समुपदेशन व मार्गदर्शन सेवा प्रदान केली जाईल. तसेच 'एलडीआरपी'च्या माध्यमातून एकाच रुममध्ये महिला रुग्णांची प्रसुती व त्या पश्चातच्या सर्व सेवा पुरविल्या जाणार असल्याने त्यांना दर्जेदार आरोग्यसेवेची अनुभूती घेता येणार आहे.
किम्स मानवता हॉस्पिटलचे वैशिष्ट्ये :
- ३५० बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल, १०० आयसीयु बेड्सचा समावेश
- १५ एनआयसीयु, व १५ बीआयसीयुद्वारे शिशूंना उपचार उपलब्ध
- उत्तर महाराष्ट्रातील अत्याधुनिक कॅथलॅब असेल रुग्णसेवेत
- रोबोटिक सर्जरी, ऑर्थो, न्युरो नव्हिगेशन सर्जरी उपलब्ध
- १५ सर्जिकल ऑपरेशन थिएटर व ५ अत्याधुनिक एंडोस्कोपी युनीट
- २० डायलेसिस युनीटद्वारे रुग्णांना प्रदान केली जाईल सेवा
- सर्वात मोठी व अनुभवी कन्सल्टंटची टीम बजावणार कर्तव्य
- कुशल पॅरामेडिकल टीम घेणार रुग्णाची काळजी.
किम्स-मानवता विषयी...
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (किम्स) आणि मानवता यांच्यामध्ये मे २०२२ मध्ये सांमजस्य करार झाला होता. त्यानुसार किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली आहे. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या किम्सच्या माध्यमातून नाशिककरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने व डॉ.राज नगरकर यांच्या दुरदृष्टीकोनातून हे हॉस्पिटल नावारुपाला आले आहे. सर्वप्रकारच्या वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करुन देतांना किम्स मानवता हॉस्पिटल रुग्णसेवेत दाखल झाले आहे.