डॉ.पंजाबराव देशमुख जयंती
Birth Anniversary of Dr. Panjabrao Deshmukh
देशाचे पहिले कृषिमंत्री
डॉ.पंजाबराव देशमुख यांची जयंती,
कृषिक्षेत्राबरोबर शैक्षणिक क्षेत्रात
भाऊसाहेबांची आहे खूप महती...
अमरावतीत शिवाजी शिक्षणसंस्था
त्यांच्या सहकार्याने स्थापन झाली,
सरकारने त्यांच्या नावाने
कृषी विद्यापीठाची स्थापना केली...
भाऊसाहेबांनी केली
शेतकरी संघाची स्थापना,
प्रचारासाठी वर्तमानपत्र
"महाराष्ट्र केसरी" चालवलेना...
अंबाबाई मंदिर केले
बहुजनांसाठी खुले,
शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता
कर्ज लवाद कायदे केले...
भाऊसाहेब होते हिंदुस्थानच्या
कृषक क्रांतीचे जनक,
भारत कृषक समाजाची स्थापना
हे त्यांच्या कृषी कार्याचे मानक...
देवस्थानाची संपत्ती घ्यावी ताब्यात
त्यातून विधायक कार्य केले,
१९३२ मध्ये हिंदू देवस्थान
संपत्ती बिल कायद्यातून मांडले...
१९६० साली दिल्ली येथे
जागतिक कृषी प्रदर्शन भरवले,
वैदिक वाड्:मयातील धर्माचा विकास
या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट मिळवले...
गरिबांचे दुःख दूर करण्यासाठी
भाऊसाहेब बनले "डॉक्टर",
गरीब आणि पीडितांच्या हक्कासाठी
केम्ब्रिज विद्यापीठातून मिळवली "बॅरिस्टर"
© दीपक केदू अहिरे, नासिक
deepakahire1973@gmail.com
No comments:
Post a Comment