परोपजीवी मित्र किटक : ट्रायकोग्रामा
Parasitic friendly insect: Trichogramma
परोपजिवी मित्रकिटकांपैकी "ट्रायकोग्रामा" हा एक महत्वाचा अळीवर्गीय किडींच्या अंड्यावर उपजिविका करणारा मित्रकिटक आहे. जैविक किड नियंत्रणामुळे या किटकाचा सर्वांत प्रथम वापर १९२५ सालापासून सुरु झाला.
जैविक किड नियंत्रणामध्ये महत्व
Importance in biological pest control
परोपजिवी मित्रकिटकांपैकी "ट्रायकोग्रामा" हा एक महत्वाचा अळीवर्गीय किटकांच्या अंड्याचा नाश करतो. त्यामुळे पिकाचे होणारे नुकसान प्राथमिक अवस्थेत टाळणे शक्य होते म्हणूनच या किटकाला जैविक किड नियंत्रणामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे.
ट्रायकोग्रामाच्या जाती
Species of Trichograma
ट्रायकोग्रामाच्या भारतामध्ये एकूण २६ जाती आढळतात. त्यापैकी ट्रायकोग्रामा चिलानीस, ट्रायकोग्रामा जापोनिकम, ट्रायकोग्रामा अकाई व ट्रायकोग्रामा नागरकट्टी या महत्वाच्या आहेत. त्यांचा उपयोग विविध पिकांवरील पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी होतो.
ट्रायकोग्रामाचा जीवनक्रम :
Life cycle of Trichograma :
ट्रायकोग्रामा हा सुक्ष्म किटक असून अंडी, अळी, कोष व पतंग या चार अवस्थांमध्ये त्याचा जीवनक्रम पुर्ण होतो. अंडी अवस्था १६ ते २४ तास व अळी अवस्था २-३ दिवसात पुर्ण होते. कोष पुर्ण होण्यास ४-५ दिवस लागतात. अंडी, अळी आणि कोष या तिन्ही अवस्था यजमान किडीच्या अंड्यातच पूर्ण होतात आणि त्यातून पूर्ण वाढ झालेले ट्रायकोग्रामाचे प्रौढ बाहेर पडतात. एका टाचणीच्या टोकावर ८-१० प्रौढ राहू शकतील इतके हे किटक सुक्ष्म असतात. मादी किडीच्या अंड्यामध्ये १ ते २० अंडी घालते. एक मादी प्रजातीप्रमाणे २० ते २०० अंडी घालू शकते ट्रायकोग्रामाचा प्रौढ २४ ते ४८ तास जगतो. ट्रायकोग्रामाचा जीवनक्रम उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांचा तर हिवाळ्यात १ ते १२ दिवसांचा असतो.
प्रयोगशाळेत निर्मिती : Laboratory production:
ट्रायकोग्रामाची प्रयोगशाळेत भातावरील फुलपाखरु या किडीवर मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाते. भातावरील फुलपाखरु भात, ज्वारी, बाजरी इ. पिकांच्या दाण्यावर वाढविले जाते. त्याच्यापासून अंडी मिळविली जातात. ही अंडी सर्वप्रथम साफ करुन घ्यावीत. त्यानंतर ती अति नील किरणांच्या प्रकाशाखाली ६० से.मी. अंतरावर १५ मिनिटांसाठी ठेवावीत म्हणजे त्यातून बाहेर पडणार नाहीत.
ट्रायकोकार्डवर माहिती Information on Trichocard
त्यानंतर पोस्ट कार्डच्या आकाराचे ट्रायकोकार्ड घ्यावे. ट्रायकोकार्डवर छोटेछोटे वीस चौकोन असतात याचा आकार १७×१४ सेमी असतो. ट्रायकोकार्डच्या पाठीमागील सर्व माहीती उदा. तयार केल्याची तारीख, किटक बाहेर पडण्याची तारीख इ. सर्वप्रथम भरुन घ्यावी. ट्रायकोकार्डवर गोंद लावून घ्यावा. त्यानंतर चाळणीच्या सहाय्याने भातावरील फूलपाखरांची अंडी कार्डवर पसरावी. जादा अंडी काढून घ्यावी. एका कार्डसाठी १ ते १५ सीसी अंडी पुरेशी असतात.
तयार ट्रायकोग्रामा Ready Trichograma
अंडी असलेले कार्ड साध्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवावे यामध्ये १:६ या प्रमाणात मिलन झालेल्या ट्रायकोग्रामाच्या माद्या सोडाव्यात. एक दिवसापर्यंत कार्ड प्लॅस्टिक पिशवीत ठेवावे. कार्डवरील अंडी ४ दिवसानंतर काळी दिसू लागतील. याचाच अर्थ अंड्यामध्ये ट्रायकोग्रामा तयार झालेले आहे. अशी कार्ड शेतात सोडण्यासाठी पाठवावी. ही कार्ड १० सेल्सियस तापमानात ३० दिवसांपर्यंत साठवून ठेवता येतात. एका कार्डवर १८००० ते २०००० ट्रायकोग्रामा असतात.
ट्रायकोग्रामा शेतात सोडण्याची पद्धत :
How to release the Trichogramma field:
सहा ते आठ दिवसांचे ट्रायकोकार्ड शेतात सोडण्यासाठी योग्य समजले जाते. ट्रायकोकार्डचे २० तुकडे करावेत आणि ते पानाच्या मागच्या बाजूस बांधावेत. अंडी असलेला भाग जमीनीकडच्या दिशेने असावा. प्रत्येक तुकडा तीन ते चार मिटर अंतरावर लावावा. ट्रायकोकार्डचे तुकडे शक्यतो सकाळच्या वेळी शेतात लावावेत. शेतात किटकनाशकांची फवारणी करु नये. आवश्यकता असल्यास ट्रायकोग्रामा सोडण्याच्या १० ते १९ दिवस अगोदर किंवा नंतर फवारणी करावी.
ट्रायकोग्रामा वापरण्याचे प्रमाण
The use of trichograms
भात व ऊस पिकाच्या खोडकिडी नियंत्रणासाठी हे. ५०,००० प्रमाण ६ वेळा सोडावेत. कापूस पिकात बोंड अळी नियंत्रणासाठी हेक्टरी १,५०,००० प्रमाण ८ ते १० वेळा सोडावेत. टोमॅटो पिकात फळ पोखरणारी अळी हेक्टरी ५०,००० प्रमाण ६ वेळा सोडावे. मका पिकात खोडकिडीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी ७५००० प्रमाण ६ वेळा सोडावेत. सूर्यफूल पिकाच्या घाटे अळी नियंत्रणासाठी हे. १,००,००० प्रमाण ४ ते ६ वेळा सोडावेत.
ट्रायकोग्रामा परोपजीवी किटक वापरण्याचे फायदे :
Benefits of using Trichogramma parasitic insects:
१) ट्रायकोग्रामा स्वतःच शेतातील हानिकारक किटकांची अंडी शोधून नष्ट करतो.
२) ट्रायकोग्रामा वापरल्यास किटकनाशकांवर होणारा खर्च कमी होतो.
३) ट्रायकोग्रामा हा मित्रकिटक किडींच्या अंडी अवस्थेत नाश करतो व पुढे किडीमुळे होणारे नुकसान टळते.
४) तीन ते चार वर्ष एकाच क्षेत्रावर ट्रायकोग्रामा सोडले असता निसर्गतः त्यांची संख्या वाढून किडींचे नियंत्रण होते.
५) ट्रायकोग्रामा वापरल्यामुळे मानवाला हानीकारक किटकनाशकांचा वापर कमी होतो व प्रदुषणविरहीत पर्यावरण साध्य होते.
६) ट्रायकोग्रामा शेतात सोडण्याची पद्धत अत्यंत साधी, सोपी व सहज शक्य आहे.
७) ट्रायकोग्रामामुळे इतर मित्र किटकांवर विपरित परिणाम होत नाही. तसेच मानवास व पाळीव प्राण्यांना हानिकारक नाही.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
digitalkrushiyog@gmail.com
******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram :
******************************************
YouTube :
******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
******************************************
Website :
******************************************
No comments:
Post a Comment