name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): May 2023

अळिंबी लागवड Alimbi (mushroom) cultivation

अळिंबी लागवड 
Alimbi (mushroom) cultivation

  अळिंबीला इंग्रजीमध्ये मशरूम म्हणतात. अळिंबीचे आहारात अनन्यसाधारण महत्व आहे.


Alimbi lagvad
धिंगरी अळिंबी

औषधी गुणधर्म

  • सर्वसामान्य लोकांना शेतीपूरक किंवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून अळिंबी लागवड करता येईल.यातील पौष्टिक तसेच औषधी गुणधर्म यामुळे अळिंबी खाण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. 

  • अळिंबीच्या सेवनामुळे अनेक अजारापासून किंवा ताणतणावापासून सुटका करून घेता येईल. म्हणून अळिंबी लागवड हा चांगला व्यवसाय होऊ शकतो. 

  • भारतामध्ये प्रामुख्याने बटन आणि ऑयस्टर (धिंगरी) या अळिंबीची लागवड होते. 

धिंगरी अळिंबी उत्पादन

Alimbi lagvad
सुककेली धिंगरी अळिंबी


  • प्रथमतः धिंगरी अळिंबीची आपल्याला हव्या असलेल्या जातीची निवड करावी. 

  • यासाठी प्लुरोटस साजर काजू. प्लुरोटस ईओस, प्लुरोटस फ्लोरिडा आणि प्लुरोटस ऑस्ट्रीटस या जातींची निवड करावी. 

  • अळिंबी लागवडीसाठी उन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी खोली,शेडची आवश्यकता असते. 

  • या जागेत खेळती हवा गरजेची आहे. भाताचे तूस किंवा गव्हाचे काड इ. घटकांची आवश्यकता असते. 

  • काडाचे २ ते ३ से.मी. लांबीचे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरून थंड पाण्यात ८ ते १० तास बुडवून भिजत घालावे. 

  • काडाचे पोते थंड पाण्यातून काढून त्यातील जादा पाण्याचा निचरा करावा. 

काडाचे निर्जंतुकीकरण 

Alimbi lagvad
निर्जंतुक बेडद्वारे उगवलेली धिंगरी अळिंबी


  • अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान २२ ते ३० अंश से. हवेतील आर्द्रता ६५ ते ९० टक्के असावी. 

  • तापमान व आर्द्रता यांचे  ठेवण्यासाठी जमिनीवर हवेत तसेच चोहोबाजूंनी गोणपाटाचे आवरण लावून त्यावर स्प्रे पंपाने पाणी फवारण्याची व्यवस्था करावी.

  • मशरूम उत्पादन प्रकल्पाचे यश किंवा अपयश हे प्रामुख्याने काडाच्या निर्जंतुक करण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असते तेव्हा ही प्रक्रिया काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे

बेड भरणे 

  • निर्जंतुक केलेले काड प्लास्टिक पिशव्यांमध्ये थर पद्धतीने भरावे. 

  • काड भरताना प्रथम ८ ते १० से.मी.जाडीचा काडाचा थर द्यावा. त्यावर अळिंबीचे बियाणे (स्पॉन)पसरावे. 

  • स्पॉनचे प्रमाण ओल्या काडाच्या वजनाच्या २ टक्के असावे. 

  • पिशवी भरल्यावर दोऱ्याने पिशवीचे तोंड घट्ट बांधावे. पिशवीच्या पृष्ठभागावर सुई किंवा टाचणीच्या सहाय्याने छिद्रे पाडावीत. व ती पिशवी मांडणीवर ठेवावी. 

  • बुरशीची वाढ होण्यास १५ ते २०  दिवस लागतात. बुरशीच्या धाग्यानी काड घट्ट चिकटून त्यास ढेपेचा आकार प्राप्त होतो त्यास बेड म्हणतात. 

  • बेडवर २ ते ३ वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी

काढणी 

Alimbi lagvad
धिंगरी अळिंबीची काढणी


  • काढणीपूर्वी अळिंबीवर एक दिवस अगोदर पाणी फवारू नये. यामुळे अळिंबी कोरडी व तजेलदार राहते. 

  • पहिली काढणी पिशवी भरल्यापासून २० ते २५ दिवसात करावी. 

  • लहान मोठी अळिंबी एकाच वेळी काढून घ्यावी. 

ताजी अळिंबी अल्पकाळ टिकणारी व नाशवंत आहे. वाळलेली अळिंबी प्लास्टिक पिशवीत सीलबंद करून ठेवल्यास सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकते. 

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती उद्योग Perfume industry from flowers

फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती उद्योग 
Perfume industry from flowers


      अनेक प्रकारच्या शोभिवंत फुलांचा उपयोग फुलदाणीत ठेवण्यासाठी, धार्मिक विधीसाठी, हार-तुरे, लग्न मंडपी डेकोरेशन करण्यासाठी होतो. परंतु याव्यतिरिक्त या फुलांपासून सुगंधी द्रव्यांची निर्मिती केली जाते. अशा प्रकारची निर्मिती प्रामुख्याने गुलाब, निशिगंध, जाईवर्गीय फुले, कमळ आदी फुलांपासून होते. 

Sungadhi dravya nirmiti udyog

) गुलाब - 

  • गुलाबाच्या फुलांचा उपयोग हा प्राचीन काळापासून सुगंधी द्रव्ये तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी काही सुवासिक जातींचाच उपयोग सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी केला जातो. 

  • आधुनिक गुलाबाच्या जातींमध्ये हायब्रीड टी या प्रकारातील अव्होन, ऑक्लोहोमा, क्रिमसन, ग्लोरी, अमेकिन होम, मि.लिंकन, क्रायस्लर, एअर फेस, फेंन्टासिया, रॉयल हायनेस इ. जातीच्या फुलांपासून गुलाब पाणी तयार करता येते.

गुलाबापासून विविध द्रव्ये बनवण्यासाठी स्टिम डिस्टीलेशन
  • गुलाबापासून गुलाब पाणी आणि तेल, अत्तर तयार करण्यासाठी स्टिम डिस्टीलेशन पद्धतीचा वापर केला जातो. 
  • या पद्धतीमध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून त्यात गुलाब फुले टाकतात. चांगल्या प्रतीचे गुलाबपाणी तयार करण्यासाठी पाण्याचे वजन फुलांच्या वजनाच्या दुप्पट असावे. या भांड्याच्या तोंडाला वाकडी व निमुळत्या आकाराची नळी बसवली असते. तसेच या नळीभोवती थंड पाणी फिरवून वाफेचे द्रवात रूपांतर करण्याची सोय केलेली असते. 
  • भांड्यातील पाण्याचे वाफेत रूपांतर करून ती वाफ पुन्हा थंड करून नळीच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या एका काचेच्या भांड्यामध्ये द्रवरूपात गोळा करतात. यास गुलाबपाणी अथवा गुलाबजल असे म्हणतात. 
  • हे गुलाबपाणी नंतर एका मातीच्या किंवा धातूच्या पसरट भांड्यात भरतात. आणि भांडे मलमलच्या कापडाने झाकून थंड हवेत ठेवतात. थंडाव्यामुळे गुलाब तेल घट्ट होते. आणि पाण्यावर तरंगणारे तेल नंतर अलगद काढून काचेच्या बाटल्यात साठवले जाते. 
  • काही वेळा गुलाब फुलातील सुगंधी द्रवयुक्त अशी वाफ चंदनाच्या तेलामध्ये शोषून घेऊन गुलाबाचे अत्तर तयार केले जाते. 
  • एक किलो गुलाबाचे तेल मिळवण्यासाठी  ७ ते ८००० किलो गुलाबाची फुले लागतात. 
गुलाब तेलाचा उपयोग 
  • गुलाब तेलाचा उपयोग पेय, खाद्यपदार्थ, केश तेलामध्ये तसेच फेस पावडर, अगरबत्ती इत्यादींना सुगंध आणण्यासाठी करतात.
  • चांगल्या प्रतीच्या गुलाब तेलाच्या निर्मितीसाठी गुलाब फुलांची सकाळी भल्या पहाटे सूर्यदयापूर्वी काढणी करावी. 
  • गुलाब तेलामध्ये मुख्यत्वे एल- सिट्रीनेऑल (४० ते ६५ टक्के), जिरेनिओल,नेरोल, एल- बिनालुल, फिनाईन इथाईल, अल्कोहोल, अल्प प्रमाणात ईस्टर्स, नोनील, अलडीहाईड, सिट्रोल, उजेनोल, सेस्वीपिर्टिन आणि स्ट्रेरोप्टेनचे मेणवर्गीय घटक इ. सुगंधीत द्रव्ये असतात. 
Sugandhi dravya nirmiti udyog


गुलकंद
  • गुलाब पाकळ्या आणि सफेद साखर वजनाने सारख्या प्रमाणात चांगल्या प्रकारे मिसळून गुलकंद तयार करता येतो. 
  • गुलकंद चांगला मुरल्यानंतर त्याचा आस्वाद घ्यावा. गुलकंद हा पौष्टिक पदार्थ असून तो पाचकही आहे.
  • गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या म्हणजे पंखुरी. या पाकळ्याचा उपयोग उन्हाळ्यात थंड रुचकर पेय तयार करण्यासाठी केला जातो. 
गुलरोधन हेअर ऑईल
  • गुलाबापासून गुलरोधन हेअर ऑईल हा पदार्थ सुधारित एन्लुरोज पद्धतीने केला जातो. 
  • या पद्धतीने गुलाबाच्या पाकळ्या आणि सफेद तीळ यांचे थर दिले जातात. त्यामुळे तिळामध्ये गुलाब पाकळ्यातील सुगंधीत द्रव्ये शोषली जातात. 
  • प्रत्येक दिवशी वापरलेल्या पाकळ्या काढून नवीन पाकळ्या वापरतात. गुलाबाच्या सुगंधीत द्रव्यांने तीळ संपृक्त झालेल्या तिळापासून घाणीच्या साह्याने तेल काढतात. या तेलाला "गुलरोधन हेअर ऑईल" असेही म्हणतात. 

२) चाफा व सुरंगी - 

  • पिवळ्या चाफ्याच्या फुलांपासून देखील सुगंधी द्रव्य निर्मिती होते. फुलांमध्ये ०.६ ते ०.७ टक्के सुगंधी तेल असते. 

  • कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरंगीची झाडे आढळतात. सुरंगीच्या फिकट पिवळसर, सुवासिक फुलांपासून सुगंधी तेल तयार करतात. 

३) निशिगंध- 

  • निशिगंधापासून सुगंधी तेल काढण्यासाठी सोलव्हंट एक्स्ट्रक्सन पद्धतीचा वापर करतात. 

  • यासाठी प्रामुख्याने निशिगंधाच्या अधिक सुवासिक सिंगल जातीची निवड केली जाते. तर डबल जातीच्या फुलदांड्याचा कट फ्लावर म्हणून उपयोग केला जातो.

  • निशिगंधापासून साधारणपणे हेक्टरी ५० ते ६५ क्विंटल ताजी फुले मिळतात आणि त्यापासून सुमारे ५ ते ७ ट्युबरोझ काँक्रिट मिळू शकते. 

Sugandgi dravya nirmiti udyog

४) कमळ- 

  • कमळ हे शोभिवंत फुल आहे. त्यापासून कमळ पुष्प आणि त्याच्या झाडापासून आणि खाद्यपदार्थ तयार केले जातात.  

  • कमळाची कोवळी पाने, पानांचे देठ व फुले यांच्यापासून भाजी करतात.

  • कमळ पानाच्या देठाचा उपयोग मिश्रण लोणच्यात करतात. तसेच देठापासून पिवळसर सफेद तंतूंची (धाग्यांची) निर्मिती करण्यात येते.

  • कमळ फुलांपासून अत्तराची निर्मिती करण्यात येते. 

५) कॅनांगा/ प्लांग प्लांग- 

  • कॅनंगा ओडोरांटा नावाच्या वृक्षाच्या फुलांपासून कॅनंगा तेल अथवा प्लांग प्लांग तेल तयार करतात. 

  • या वृक्षाचे मुळस्थान फिलीपाईन्स असून त्यास प्लांग प्लांग असे संबोधले जाते. तर जावामध्ये या वृक्षास कॅनंगा म्हणून ओळखले जाते. 

  • प्लांग प्लांग तेलास चांगली मागणी असून उच्च प्रतीच्या सुगंधात या तेलाचा वापर करतात. 

Sugandhi dravya nirmiti udyog

६) झेंडू

  • झेंडूच्या फुलात सुगंधीत तेल असते. त्याचा उपयोग अत्तर तयार करण्यासाठी करतात. 

  • झेंडूच्या झाडाच्या सर्वच भागात सुगंधित तेल असते. ते वाफेवर चालणाऱ्या उर्ध्वपातीत यंत्राच्या साह्याने काढले जाते. 

  • हे तेल अतिशय सुगंधित असते. टॅगेसेस सिग्नटा या झेंडू स्पेसीजच्या फुलांमध्ये सुगंधीत तेलाचे प्रमाण जास्त म्हणजे ४.५ टक्के असते. याचा उपयोग अत्तर तयार करण्यासाठी करतात. 

७) जाई/जुई/मोगरा- 

  • जाई,जुई,मोगरा या फुलांना विशिष्ट असा सुगंध आहे. या सुगंधाचे वेगळेपण म्हणजे कोणत्याही अन्य कृत्रिम सुगंध किंवा नैसर्गिक सुगंधाने जाई,जुई, मोगरा यांचा सुगंध निर्माण करता येत नाही.

  • जाई,जुई,मोगरा यांच्या फुलांपासून अत्तर तयार करतात. त्यासाठी जस्मिनम ग्रंडीफ्लोरा (स्पॅनिश जस्मिन) या स्पेशिजमध्ये पुष्प पाकळ्यांच्या खालच्या बाजूला तांबूस रेषा असलेल्या जातीची फुले अत्तरे तयार करण्यासाठी वापरतात.

 अशा प्रकारे तरुणांना फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी भरपूर वाव आहे आणि हा उद्योग ग्रामीण भागात भरपूर जोर धरेल यात शंका नाही.

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


हळद उत्पादक शेतकरी ते आनंद शेती उद्योग I Turmeric farmer to Anand farm industry l success story l

यशोगाथा l हळद उत्पादक शेतकरी ते आनंद शेती उद्योग I Turmeric farmer to Anand farm industry l success story l

     सातारा जिल्हा, वाई तालुक्यातील बेलमाई गावाचे शेतकरी श्री. राहुल निंबाळकर यांची वडिलोपार्जित शेती आहे. ते मोठ्या प्रमाणात हळद पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. 

Turmeric farmer to Anand farm industry l success story l
हळद उत्पादक शेतकरी: श्री. राहूल निंबाळकर 

लॉकडाऊनच्या काळात श्री. निंबाळकर शेतातील हळद मार्केटमध्ये विकण्यासाठी गेले तेव्हा व्यापाऱ्यांनी त्यांना सांगितले की, लॉकडाऊनमुळे हळदीला बाजारभावापेक्षा कमी किंमत मिळेल आणि पैसेही तीन महिन्यानंतर मिळतील. त्यांना हळदीची १ नंबर, २ नंबर आणि ३ नंबर अशी प्रतवारी करून आणायला लावली. 

आनंद शेती उद्योग कंपनीची स्थापना 

    श्री. निंबाळकर यांना व्यापारी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करीत असल्याचे लक्षात आले. तेव्हा हळद पिकावर आपणच प्रक्रिया करून शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवावा. यामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळेल. व शेतकऱ्यांना फायदा होईल. यावर त्यांनी विचार करायला सुरुवात केली. पुर्ण विचारांती श्री. राहुल निंबाळकरांनी "आनंद शेती उद्योग" या नावाने कंपनी सुरू केली. 

शेतातून ग्राहकांच्या दारात…

         श्री. राहुल निंबाळकर यांचा पुण्यामध्ये "निंबाळकर कन्स्ट्रक्शन" या नावाने स्वतःचा बांधकाम व्यवसाय असून त्यांच्याकडे शंभरपेक्षा जास्त कामगार काम करीत आहेत. या उद्योगाबरोबरच त्यांनी आनंद हळद पावडर थेट शेतातून ग्राहकांच्या दारात पोहोचविण्याचा विडा उचलला आणि यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले. ग्राहकांनाही घरपोच होम डिलिव्हरी मिळत असून ताजी आणि सर्वोत्कृष्ट प्रतीची हळद मिळत असल्यामुळे ग्राहकवर्गही खुश आहे. श्री. निंबाळकर यांनी सेलम जातीच्या सर्वोत्कृष्ट हळद पिकापासून हळद पावडर व्यवसायाची सुरूवात केली. 

हळदीची डबाबंद पॅकिंग 

ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद

      सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरुवातीला हळद पावडर विक्री व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या श्री. राहुल निंबाळकर यांना अगदी सातासमुद्रापार अमेरिकेहूनही हळद पावडरसाठी ऑर्डर आल्या असून त्यांनी अल्पावधीतच संपूर्ण देशात आणि परदेशातही हळद पावडर विक्री व्यवसायाची सुरुवात केली. बेलमाचीसारख्या छोट्याश्या खेडेगावातून सुरू करण्यात आलेल्या हळद पावडर विक्री व्यवसायाला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्यामुळे श्री. राहुल निंबाळकर यांनी कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर ही नवी उत्पादनेही बाजारपेठेत आणली.  त्या उत्पादनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. श्री. राहूल निंबाळकर यांच्या या उद्योगाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली. असून त्यांच्या कार्यावर स्तुतीसुमने उधळली. बातम्या, लेख, ब्लॉगच्या माध्यमातून या खेडेगावातील उद्योगाला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळाली. याचा श्री.राहुल निंबाळकर यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

दर्जेदार गुणवत्ता असलेली हळद पावडर 

हळदीची उत्कृष्ट गुणवत्ता

   श्री. राहुल निंबाळकर यांनी सुरुवातीला २५ पेक्षा जास्त औषधी गुणधर्म असलेल्या हळदीची १ नंबर, २ नंबर आणि ३ नंबर अशी प्रतवारी का करण्यात येते या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला. हळदीचा वापर करणाऱ्या सुमारे ३२ कंपन्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, पहिली प्रत औषध निर्मितीसाठी, दुसरी प्रत सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी आणि तिसरी प्रत असलेली हळद स्वयंपाकघरात वापरण्यात येते. १०० टक्के नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती  वाढविणारी  हळदीची उत्कृष्ट गुणवत्ता ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा विडा श्री. राहुल निंबाळकर यांनी उचलला. आणि आनंद शेती उद्योग या व्यवसायाची स्थापना केली. आनंद हळद पावडर या नावाने शेतकऱ्यांच्या शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहचवून दर्जेदार आणि ताजी हळद त्यांनी ग्राहकांना पुरविली आहे. 

  श्री. राहुल निंबाळकर यांनी सुरुवातीला आय.एस.ओ. सर्टीफाईड लॅबमध्ये चाचणीसाठी हळद पाठवली. आणि विविध प्रकारच्या १६ चाचण्या पूर्ण झाल्यानंतर अपेक्षेपेक्षा जास्त चांगला रिझल्ट या चाचण्यांमधून सिद्ध झाला. आपली गावरान हळद आपल्या लोकांसाठी आनंद हळद पावडर या नावाने ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा निर्णय श्री. राहुल निंबाळकर यांनी घेतला. 

श्री. राहूल निंबाळकर आणि परिवार

हळदीची डबाबंद पॅकिंग 

    शेतातील काढलेली हळद स्वच्छ करून ६० डिग्री तापमानामध्ये शिजवून १५ दिवस वाळविण्यात येते. मशिनमध्ये पॉलिश करून दगडी जात्यावर प्रत्येकी आठ दिवसाला ताजी हळद दळून वस्त्र गाळण करण्यात येते. पॉलिश आणि वस्त्र गाळणमुळे हळद एकसारखी बारीक होते. आणि हळदीचा रंगही उत्कृष्ट येतो. स्पेशल सायंटिफिक डिझाईन केलेल्या बॉटलमध्ये हळद भरून डबाबंद करण्यात येते. 

     सेलम जातीच्या तीनही प्रती एकत्र दळल्यामुळे हळदीचा क्वालिटी रिपोर्ट ३.५ ते ४.५ टक्के एवढा उच्च आढळून आला. बॉटल इंटरनॅशनल कुरिअर कंपनीतर्फे पुणे, पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण महाराष्ट्रात पाच पद्धतीने सॅनिटाईज करून बॉक्स पॅकिंग करून ३००० पेक्षा जास्त बॉटल्स घरोघरी पोहोचवल्या आहेत.  श्री. राहुल निंबाळकर हे महाराष्ट्राच्या सर्व भागात हळद पाठवतात. घरगुती पद्धतीच्या सेलम जातीच्या हळदीला पुणे व इतर शहरात अल्पावधीत खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ही हळद एक किलोच्या बरणीमध्ये उपलब्ध आहे. 

हळद पावडरची पॅकिंग 

हळद पावडरची होम डिलीव्हरी

    आनंद हळद पावडरची होम डिलीव्हरी करीत असताना स्वच्छतेचीही काळजी घेण्यात येते. पाच प्रकारे हळद डबाबंद करीत असताना सॅनीटाईज करण्यात येत असून कामगारांसाठी मास्क आणि हॅण्डग्लोव्हचा कटाक्षाने वापर करण्यात येतो. ग्राहकांना कुरिअर करतांना सॅनीटाईज करूनच पार्सल पाठवण्यात येते. 

     प्रत्येक शनिवारी नवीन हळदीची बॅच तयार करण्यात येत असल्यामुळे ग्राहकांना ८ दिवसात तयार झालेली ताजी हळद पावडर मिळते. आणि हळदीची गुणवत्ताही इतर हळद पावडरपेक्षा अधिक दर्जेदार आहेत. सध्यस्थितीत कोरोनासारख्या महामारीच्या काळात आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे खूपच गरजेचे असताना आनंद हळद पावडर लोकांसाठी वरदान ठरत आहे. 

    कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर ही इतर उत्पादनेही ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून आनंद शेती उद्योगाच्या सर्वच उत्पादनांना ग्राहकाकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्यपालन (Aquaculture by biofloc method)

बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्यपालन  

Aquaculture by biofloc method

       नाशिकच्या महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मीगचे संचालक श्री. सागर राउत व जयश्री राऊत यांनी उपलब्ध करून दिली आहे. प्रत्यक्ष बायोफ्लॉक (biofloc) मत्स्यपालन, प्रशिक्षण व या क्षेत्रातील मटेरियल होलसेलर म्हणून त्यांची ओळख आहे.

 

Matsyapalan
महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फर्मचे संचालक सागर राऊत

     आय. टी इंजिनियर, एम.बी. ए. असे श्री. सागर राऊत यांचे शिक्षण झाले असून त्यांची पत्नीही उच्चशिक्षित आहे. सागर राउत यांनी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये 10 वर्ष नोकरी केली. परंतु ते शेतकरी असल्यामुळे काहीतरी शेतीला जोडधंदा करावा. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तसेच बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार करता येईल, यादृष्टीने त्यांनी स्वतः मत्स्यपालन सुरू केले. मग प्रशिक्षण दिले आणि हा व्यवसाय विकसित केला. 

पारंपारिक व बायोफ्लॉक मत्स्यशेती

Aquaculture by biofloc method
बायोफ्लॉक मत्स्यशेती

  • पारंपारिक मत्स्यशेती आणि बायोफ्लॉक मत्स्यशेती यात फरक काय या माझ्या प्रश्नाचे उत्तर देताना श्री. सागर यांनी सांगितले की, पारंपारिक मत्स्यशेती येथून मागे केली जात होती. 

  • ज्यात जमिनीवर शेततळे खोदले जात होते.त्यात चुना,शेण, टाकून त्यात पाणी टाकले जायचे. वारंवार पाणी बदलावे लागत होते. 

  • त्यात बाहेरून ऑक्सीजन दिला जात नव्हता. मत्स्यबीज कमी सोडले जायचे त्यामुळे उत्पादनही कमी होत होते. 

आधुनिक मत्स्यशेतीची पद्धती

  • "बायोफ्लॉक" व "सेमिबायोफ्लॉक" या आधुनिक मत्स्यशेतीची पद्धती आहेत. 

  • यामध्ये कमी जागेत, कमी पाण्यामध्ये, कमी खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेऊ शकतो. 

  • जसे छोट्या जागेत स्टीलच्या जाळ्या वापरून गोल ट्याँक  बनवल्या जातात त्यात पी.व्ही.सी. कोटेड ताडपत्रीच्या टाकून त्यात पाणी भरले जाते व पाण्यात प्रोबायोटिक -हेटेरोट्रोपिक्स बॅक्टेरीया, नाइंत्रीफाईग बॅक्टरीया (प्रोबायोटीक्स) च्या माध्यमातून आपण  बॅक्टरियाचे पाणी तयार करतो व त्यांनतर मत्स्यबीज सोडतो.  

  • त्यामुळे माश्याच्या मलमुत्राचे रूपांतर खाद्यात होते व मासे वाढवले जातात असे श्री. सागर राऊत यांनी स्पष्ट केले. 

बायोफ्लॉक(Biofloc)
तंत्रज्ञानाचे फायदे 

  • बायोफ्लॉक मत्स्यशेती तंत्रज्ञानाचे फायदे काय असून या तंत्रज्ञानामुळे मत्स्यशेती फायदेशीर झाली आहे काय? या माझ्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, 

  • बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचे अनेक फायदे असून अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे तंत्रज्ञान आहे.

  • उत्तम दर्जा व चांगल्या गुणवत्तेचे मत्स्य उत्पादन मिळते. कमी जागेत, कमी कालावधीत व  कमी पाण्यामध्ये, कमी मनुष्यबळ वापरून बायोफ्लॉक तंत्रज्ञान जास्त उत्पन्न देते.

  • शेतीला शाश्वत उत्पादन देणारा एक पूरक व्यवसाय म्हणून या बायोफ्लॉक पद्धतीकडे बघितले जाते.

  • या व्यवसायात एकदाच गुंतवणूक आहे. परंतु वर्षातून दोन वेळेस उत्पन्न मिळते. 

  • कमी श्रमात, कमी मजुरीत किफायतशीर हा व्यवसाय असल्याचे श्री. सागर राऊत यांनी सांगितले. 

प्रभावी उत्पन्न देणारे तंत्रज्ञान

  • मत्स्यपालनात बायोफ्लॉक तंत्रज्ञान (बी.एफ.टी.) हे प्रभावी उत्पन्न देणारे ठरले आहे. 

  • या तंत्रज्ञानामुळे मत्स्यपालनात निळक्रांती आली असल्याचे ते म्हणाले.

  • पर्यावरणास अनुकूल हे मत्स्यपालन विकसित करण्यासाठी आपल्याला भरपूर वाव आहे.

  • बायोफ्लॉक तंत्रज्ञान हे इस्राईलमधून आलेले आहे.

  • भारतामध्ये मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धती ही नवीन आहे. 

  • पूर्व आशियातील इस्राईल, इंडोनेशिया, जपान व चीन या देशांमध्ये आधुनिक बायोफ्लॉक पद्धतीचा वापर अनेक वर्षापासून केला जात असल्याचे श्री. सागर राऊत यांनी सांगितले. 

उत्पादन खर्चात बचत 

  • बायोफ्लॉक पद्धतीमुळे मत्स्यपालन हे फायदेशीर राहण्यास मदत झाली आहे. या पद्धतीत खाद्याचे, रोगांचे नियंत्रण व उपचार करणे सोपे झाले आहे.

  • बायोफ्लॉक पद्धतीत सूक्ष्मजीवांचा वापर करून उर्वरित अन्न, माशांची विष्ठा व अन्य घटकांचेही माशांच्या नैसर्गिक खाद्यात रूपांतरण केले जाते. 

  • बायोफ्लॉक पद्धतीत सातत्याने बनणारे पोषक अन्न माशांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरते.

  • खाद्याचा खर्च पर्यायाने उत्पादन खर्चात बचत होते. सूक्ष्मजीवामुळे पोषक घटक व सूक्ष्म वातावरण तयार होऊन माशांना होणारी रोगराई व सामान्य आजार यांचे प्रमाण अत्यंत कमी राहते. 

  • माशांची वाढ उत्तम होत असल्याचे श्री. सागर राऊत यांनी सांगितले. 

एफ.सी.आर.कमी पर्यायाने खाद्यात बचत 

  • यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे आपण बॅक्टरियाचे पाणी बनवले जाते ज्यास बायोफ्लॉक म्हटले जाते. 

  • फ्लॉक जो आपण डेव्हलप करतो त्या फ्लॉकला आपण ड्रेन करत नाही. आहे त्या पाण्यामध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आहे त्या पाण्यात तो मासा वाढतो.

  • फक्त जे काही हार्ड पार्टीकल असतात ते काढण्यासाठी आपण 50 ते 100 लिटर पाणी बदलतो.

  • यात माशांची जी काही विष्ठा, मलमुत्र असते. त्या विष्टेला बॅक्टेरीया हे प्रोटीन सेलमध्ये रूपांतरीत केले जातात. व ते खाद्य तयार होते. 

  • ज्याला मासा परत खातो. त्यामुळे एफ.सी.आर. (food conversion ratio) कमी येतो म्हणजे खाद्य कमी लागते श्री. राऊत यांनी सांगितले.

  • जसे पारंपारिक मत्स्यशेती १२०० ते १३०० ग्रॅम खाद्य खाल्यानंतर मासा एक किलोचा होतो. 

  • तसे बायोफ्लॉक पद्धतीत ८०० ते ९०० ग्रॅम खाद्य खाल्यानंतर तो एक किलोचा होतो. बायोफ्लॉक पद्धतीचा सर्वात महत्वाचा फायदा असल्याचे श्री. सागर राऊत यांनी सांगितले. 

माशांच्या प्रजाती

Aquaculture by biofloc method
माशांच्या प्रजाती 

  • बायोफ्लॉक मत्स्यपालनात कोणत्या प्रकारच्या माशांच्या प्रजाती वाढवता येतात या माझ्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, 

  • या पद्धतीत तिलापीया, शिंगी, व्हितनाम कोई, रुपचंदा, कॉमन कॉर्प, पंगेशीयश, मरळ , पाबदा,इ. माशांच्या प्रजाती वाढवण्यात येतात. 

  • गोड्या पाण्यातील मासे तसेच खाऱ्या पाण्यातील मासे असे दोन प्रकारचे मासे असतात. हे तंत्रज्ञान गोड्या पाण्यातील आहे. 

  • या माशांच्या जाती हाय डेन्सिटीमध्ये सरवायल करतात. मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज कमी जागेत स्टॉक करू शकतो. त्याला वाढही चांगली आहे. 

  • जसे नदी, मोठमोठ्या तलाव, डेम मध्ये, केज कल्चरमध्ये आय.एम.सी. (इंडियन मेजर कॉर्पस) केले जाते. 

  • ज्यात रोहू, कटला, म्रिगल या जाती मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. 

  • परंतु बायोफ्लॉक मत्स्यपालनात तिलापिया, रुपचंद, शिंगी, पंगास, कोई, या जाती पहिल्यांदा टाकाव्यात. 

  • ही स्वस्त मासे आहेत. या माशांची चवही चांगली असून वाढही चांगली आहे भावही चांगला मिळतो. 200 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत हे मासे होलसेल व रिटेल मधे विकले जातात.

  • आजकाल अनेक दुकानदार जिवंत मासे विक्रीला प्राधान्य देत आहेत, व ग्राहकही ताजा मासा मिळावा यासाठी आग्रही असतात.

बायोफ्लॉक पद्धतीचा खर्च 

  • बायोफ्लॉक पद्धतीच्या मत्स्य पालनासाठी किती खर्च येतो याला शासनाचे अनुदान आहे काय? या माझ्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले की, 

  • या व्यवसायाला खूप जास्त जागेची गरज नाही. 2 ते 3 गुंठयापासून सुरुवात करू शकतात. 

  • खूप छोट्या गुंतवणुकीपासून हा धंदा करता येतो. अगदी पन्नास हजारापासून हा व्यवसाय सुरू करता येईल.

  • सुरुवातीला दोन टाक्या १० हजार लिटरच्या मिनिमम कॅपासिटीच्या दोन टाक्या घेऊन या व्यवसायाला सुरुवात करता येईल.

  • जमिनीत ५-६ फूट खोली असलेले शेततळे तयार करूनही बायोफ्लॉक करता येते. 

  • पाणी आवश्यक आहे. परंतु जास्त पाण्याचीही गरज नाही.  

  • फक्त एक महत्वाचा मुद्दा म्हणजे येथे वीजपुरवठा  आवश्यक तास पाहिजे. काही क्याटफिश जातीच्या माश्यांची कमी ऑक्सिजन असला तरी चालते त्यांना कायम वीजपुरवठयाचीही गरज नसते.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेद्वारे अनुदान

  • सोलर पॅनलच्या किंवा गरजेपुरते जनरेटरच्या माध्यमातून वीजपुरवठा करता येणे सहज शक्य आहे. 

  • कारण कायम वीजपुरवठा असल्यास कृत्रिमपणे पाण्यात ऑक्सीजनची गरज असते. 

  • एका एकरातले मत्स्यपालन आपण २ गुंठ्यांत करतो आहे. मोठ्या तलावात जास्त पाणी असते. तेथे ऑक्सीजनची कमतरता पडत नाही. कारण हवेतला ऑक्सीजन  पाण्यासोबत मिसळत असतो. 

  • पण बायोफ्लॉक मधे कमी जागेत जास्त मासे असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा गरजेचा असतो

  • प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेद्वारे ६० टक्केपर्यंत अनुदान मिळते. 

  • महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फारमिंग या त्यांच्या कंपनीमध्ये सर्व प्रकारचे मत्स्यपालनासाठी तसेच बायोफ्लॉक सेटअपला लागणारे साहित्य होलसेल दरात उपलब्ध आहे. 

  • यात प्रोजेक्ट सेटअप व सबसिडीसाठी मोफत मार्गदर्शन मिळणार असल्याचे श्री.राऊत यांनी सांगितले. 

  • ७  ट्यांकसाठी ४.५० लाख रुपये अनुदान, २५ ट्यांकसाठी १५ लाख रुपये अनुदान, ५० ट्यांकसाठी ३० लाख रुपये अनुदान मिळेल. 

  • भुजलाशयीन बायोफ्लॉक पौंडसाठी १६ लाख रुपये अनुदान मिळत असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले.

  • मत्स्यपालन व्यवसायासाठी सातत्यपुर्ण चिकाटीची गरज असते.  

  • योग्य प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय केल्यास निश्चितच आपण मत्स्यपालनात यशस्वी होऊ शकू असा विश्वास त्यांनी दर्शविला.

  • त्यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन अनेक शेतकरीबंधूंनी हा व्यवसाय सुरू केला असून यशस्वी मत्स्यपालक झाले असल्याचे त्यांनी सांगितले

#BioflocTechnology #Bioflocfishfarming #Bioflocfishculture #BioflocfishfarmingTechnology
#HowtosatartBioflocfarming
#Bioflocfishfarminginindia
#Bioflocfishfarminginnashik
#बायोफ्लॉकमछलीपालन
#मत्स्यपालनाचीबायोफ्लॉकपद्धत
#बायोफ्लॉकपद्धतीनेमत्स्यपालन
#बायोफ्लॉकमत्स्यशेती
#fishfarming
#बायोफ्लॉकमत्स्यपालनाचीयशोगाथा

© दीपक केदू अहिरे, 

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :
*******************************************
Facebook :
*******************************************
Instagram : 
*******************************************
YouTube :

*******************************************
Quora :
*******************************************
Koo :
*******************************************
Pintrest:
*******************************************
Share chat :
*******************************************
Twitter :
@DeepakA86854129
*******************************************
Website :

******************************************

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...