बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्यपालन (Aquaculture by biofloc method)
नाशिकच्या महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मीगचे संचालक श्री. सागर राउत व जयश्री राऊत यांनी उपलब्ध करून दिली आहे. प्रत्यक्ष बायोफ्लॉक (biofloc)मत्स्यपालन, प्रशिक्षण व या क्षेत्रातील मटेरियल होलसेलर म्हणून त्यांची ओळख आहे.
महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फर्मचे संचालक सागर राऊत |
आय. टी इंजिनियर, एम.बी. ए. असे श्री. सागर राऊत यांचे शिक्षण झाले असून त्यांची पत्नीही उच्चशिक्षित आहे. सागर राउत यांनी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये 10 वर्ष नोकरी केली. परंतु ते शेतकरी असल्यामुळे काहीतरी शेतीला जोडधंदा करावा. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तसेच बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार करता येईल, यादृष्टीने त्यांनी स्वतः मत्स्यपालन सुरू केले. मग प्रशिक्षण दिले आणि हा व्यवसाय विकसित केला.
पारंपारिक व बायोफ्लॉक मत्स्यशेती
बायोफ्लॉक मत्स्यशेती |
पारंपारिक मत्स्यशेती आणि बायोफ्लॉक मत्स्यशेती यात फरक काय या माझ्या प्रश्नाचे उत्तर देताना श्री. सागर यांनी सांगितले की, पारंपारिक मत्स्यशेती येथून मागे केली जात होती.
ज्यात जमिनीवर शेततळे खोदले जात होते.त्यात चुना,शेण, टाकून त्यात पाणी टाकले जायचे. वारंवार पाणी बदलावे लागत होते.
त्यात बाहेरून ऑक्सीजन दिला जात नव्हता. मत्स्यबीज कमी सोडले जायचे त्यामुळे उत्पादनही कमी होत होते.
आधुनिक मत्स्यशेतीची पद्धती
"बायोफ्लॉक" व "सेमिबायोफ्लॉक" या आधुनिक मत्स्यशेतीची पद्धती आहेत.
यामध्ये कमी जागेत, कमी पाण्यामध्ये, कमी खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेऊ शकतो.
जसे छोट्या जागेत स्टीलच्या जाळ्या वापरून गोल ट्याँक बनवल्या जातात त्यात पी.व्ही.सी. कोटेड ताडपत्रीच्या टाकून त्यात पाणी भरले जाते व पाण्यात प्रोबायोटिक -हेटेरोट्रोपिक्स बॅक्टेरीया, नाइंत्रीफाईग बॅक्टरीया (प्रोबायोटीक्स) च्या माध्यमातून आपण बॅक्टरियाचे पाणी तयार करतो व त्यांनतर मत्स्यबीज सोडतो.
त्यामुळे माश्याच्या मलमुत्राचे रूपांतर खाद्यात होते व मासे वाढवले जातात असे श्री. सागर राऊत यांनी स्पष्ट केले.
बायोफ्लॉक(Biofloc)
तंत्रज्ञानाचे फायदे
बायोफ्लॉक मत्स्यशेती तंत्रज्ञानाचे फायदे काय असून या तंत्रज्ञानामुळे मत्स्यशेती फायदेशीर झाली आहे काय? या माझ्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की,
बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचे अनेक फायदे असून अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे तंत्रज्ञान आहे.
उत्तम दर्जा व चांगल्या गुणवत्तेचे मत्स्य उत्पादन मिळते. कमी जागेत, कमी कालावधीत व कमी पाण्यामध्ये, कमी मनुष्यबळ वापरून बायोफ्लॉक तंत्रज्ञान जास्त उत्पन्न देते.
शेतीला शाश्वत उत्पादन देणारा एक पूरक व्यवसाय म्हणून या बायोफ्लॉक पद्धतीकडे बघितले जाते.
या व्यवसायात एकदाच गुंतवणूक आहे. परंतु वर्षातून दोन वेळेस उत्पन्न मिळते.
कमी श्रमात, कमी मजुरीत किफायतशीर हा व्यवसाय असल्याचे श्री. सागर राऊत यांनी सांगितले.
प्रभावी उत्पन्न देणारे तंत्रज्ञान
मत्स्यपालनात बायोफ्लॉक तंत्रज्ञान (बी.एफ.टी.) हे प्रभावी उत्पन्न देणारे ठरले आहे.
या तंत्रज्ञानामुळे मत्स्यपालनात निळक्रांती आली असल्याचे ते म्हणाले.
पर्यावरणास अनुकूल हे मत्स्यपालन विकसित करण्यासाठी आपल्याला भरपूर वाव आहे.
बायोफ्लॉक तंत्रज्ञान हे इस्राईलमधून आलेले आहे.
भारतामध्ये मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धती ही नवीन आहे.
पूर्व आशियातील इस्राईल, इंडोनेशिया, जपान व चीन या देशांमध्ये आधुनिक बायोफ्लॉक पद्धतीचा वापर अनेक वर्षापासून केला जात असल्याचे श्री. सागर राऊत यांनी सांगितले.
उत्पादन खर्चात बचत
बायोफ्लॉक पद्धतीमुळे मत्स्यपालन हे फायदेशीर राहण्यास मदत झाली आहे. या पद्धतीत खाद्याचे, रोगांचे नियंत्रण व उपचार करणे सोपे झाले आहे.
बायोफ्लॉक पद्धतीत सूक्ष्मजीवांचा वापर करून उर्वरित अन्न, माशांची विष्ठा व अन्य घटकांचेही माशांच्या नैसर्गिक खाद्यात रूपांतरण केले जाते.
बायोफ्लॉक पद्धतीत सातत्याने बनणारे पोषक अन्न माशांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरते.
खाद्याचा खर्च पर्यायाने उत्पादन खर्चात बचत होते. सूक्ष्मजीवामुळे पोषक घटक व सूक्ष्म वातावरण तयार होऊन माशांना होणारी रोगराई व सामान्य आजार यांचे प्रमाण अत्यंत कमी राहते.
माशांची वाढ उत्तम होत असल्याचे श्री. सागर राऊत यांनी सांगितले.
एफ.सी.आर.कमी पर्यायाने खाद्यात बचत
यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे आपण बॅक्टरियाचे पाणी बनवले जाते ज्यास बायोफ्लॉक म्हटले जाते.
फ्लॉक जो आपण डेव्हलप करतो त्या फ्लॉकला आपण ड्रेन करत नाही. आहे त्या पाण्यामध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आहे त्या पाण्यात तो मासा वाढतो.
फक्त जे काही हार्ड पार्टीकल असतात ते काढण्यासाठी आपण 50 ते 100 लिटर पाणी बदलतो.
यात माशांची जी काही विष्ठा, मलमुत्र असते. त्या विष्टेला बॅक्टेरीया हे प्रोटीन सेलमध्ये रूपांतरीत केले जातात. व ते खाद्य तयार होते.
ज्याला मासा परत खातो. त्यामुळे एफ.सी.आर. (food conversion ratio) कमी येतो म्हणजे खाद्य कमी लागते श्री. राऊत यांनी सांगितले.
जसे पारंपारिक मत्स्यशेती १२०० ते १३०० ग्रॅम खाद्य खाल्यानंतर मासा एक किलोचा होतो.
तसे बायोफ्लॉक पद्धतीत ८०० ते ९०० ग्रॅम खाद्य खाल्यानंतर तो एक किलोचा होतो. बायोफ्लॉक पद्धतीचा सर्वात महत्वाचा फायदा असल्याचे श्री. सागर राऊत यांनी सांगितले.
माशांच्या प्रजाती
बायोफ्लॉक मत्स्यपालनात कोणत्या प्रकारच्या माशांच्या प्रजाती वाढवता येतात या माझ्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की,
या पद्धतीत तिलापीया, शिंगी, व्हितनाम कोई, रुपचंदा, कॉमन कॉर्प, पंगेशीयश, मरळ , पाबदा,इ. माशांच्या प्रजाती वाढवण्यात येतात.
गोड्या पाण्यातील मासे तसेच खाऱ्या पाण्यातील मासे असे दोन प्रकारचे मासे असतात. हे तंत्रज्ञान गोड्या पाण्यातील आहे.
या माशांच्या जाती हाय डेन्सिटीमध्ये सरवायल करतात. मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज कमी जागेत स्टॉक करू शकतो. त्याला वाढही चांगली आहे.
जसे नदी, मोठमोठ्या तलाव, डेम मध्ये, केज कल्चरमध्ये आय.एम.सी. (इंडियन मेजर कॉर्पस) केले जाते.
ज्यात रोहू, कटला, म्रिगल या जाती मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात.
परंतु बायोफ्लॉक मत्स्यपालनात तिलापिया, रुपचंद, शिंगी, पंगास, कोई, या जाती पहिल्यांदा टाकाव्यात.
ही स्वस्त मासे आहेत. या माशांची चवही चांगली असून वाढही चांगली आहे भावही चांगला मिळतो. 200 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत हे मासे होलसेल व रिटेल मधे विकले जातात.
आजकाल अनेक दुकानदार जिवंत मासे विक्रीला प्राधान्य देत आहेत, व ग्राहकही ताजा मासा मिळावा यासाठी आग्रही असतात.
बायोफ्लॉक पद्धतीचा खर्च
बायोफ्लॉक पद्धतीच्या मत्स्य पालनासाठी किती खर्च येतो याला शासनाचे अनुदान आहे काय? या माझ्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले की,
या व्यवसायाला खूप जास्त जागेची गरज नाही. 2 ते 3 गुंठयापासून सुरुवात करू शकतात.
खूप छोट्या गुंतवणुकीपासून हा धंदा करता येतो. अगदी पन्नास हजारापासून हा व्यवसाय सुरू करता येईल.
सुरुवातीला दोन टाक्या १० हजार लिटरच्या मिनिमम कॅपासिटीच्या दोन टाक्या घेऊन या व्यवसायाला सुरुवात करता येईल.
जमिनीत ५-६ फूट खोली असलेले शेततळे तयार करूनही बायोफ्लॉक करता येते.
पाणी आवश्यक आहे. परंतु जास्त पाण्याचीही गरज नाही.
फक्त एक महत्वाचा मुद्दा म्हणजे येथे वीजपुरवठा आवश्यक तास पाहिजे. काही क्याटफिश जातीच्या माश्यांची कमी ऑक्सिजन असला तरी चालते त्यांना कायम वीजपुरवठयाचीही गरज नसते.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेद्वारे अनुदान
सोलर पॅनलच्या किंवा गरजेपुरते जनरेटरच्या माध्यमातून वीजपुरवठा करता येणे सहज शक्य आहे.
कारण कायम वीजपुरवठा असल्यास कृत्रिमपणे पाण्यात ऑक्सीजनची गरज असते.
एका एकरातले मत्स्यपालन आपण २ गुंठ्यांत करतो आहे. मोठ्या तलावात जास्त पाणी असते. तेथे ऑक्सीजनची कमतरता पडत नाही. कारण हवेतला ऑक्सीजन पाण्यासोबत मिसळत असतो.
पण बायोफ्लॉक मधे कमी जागेत जास्त मासे असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा गरजेचा असतो
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेद्वारे ६० टक्केपर्यंत अनुदान मिळते.
महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फारमिंग या त्यांच्या कंपनीमध्ये सर्व प्रकारचे मत्स्यपालनासाठी तसेच बायोफ्लॉक सेटअपला लागणारे साहित्य होलसेल दरात उपलब्ध आहे.
यात प्रोजेक्ट सेटअप व सबसिडीसाठी मोफत मार्गदर्शन मिळणार असल्याचे श्री.राऊत यांनी सांगितले.
७ ट्यांकसाठी ४.५० लाख रुपये अनुदान, २५ ट्यांकसाठी १५ लाख रुपये अनुदान, ५० ट्यांकसाठी ३० लाख रुपये अनुदान मिळेल.
भुजलाशयीन बायोफ्लॉक पौंडसाठी १६ लाख रुपये अनुदान मिळत असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले.
मत्स्यपालन व्यवसायासाठी सातत्यपुर्ण चिकाटीची गरज असते.
योग्य प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय केल्यास निश्चितच आपण मत्स्यपालनात यशस्वी होऊ शकू असा विश्वास त्यांनी दर्शविला.
त्यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन अनेक शेतकरीबंधूंनी हा व्यवसाय सुरू केला असून यशस्वी मत्स्यपालक झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
© दीपक केदू अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा