अळिंबी लागवड Alimbi (mashroom) cultivation
अळिंबी ला इंग्रजीमध्ये मशरूम म्हणतात. अळिंबीचे आहारात अनन्यसाधारण महत्व आहे.
औषधी गुणधर्म
- सर्वसामान्य लोकांना शेतीपूरक किंवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून अळिंबी लागवड करता येईल.यातील पौष्टिक तसेच औषधी गुणधर्म यामुळे अळिंबी खाण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
अळिंबीच्या सेवनामुळे अनेक अजारापासून किंवा ताणतणावापासून सुटका करून घेता येईल. म्हणून अळिंबी लागवड हा चांगला व्यवसाय होऊ शकतो.
भारतामध्ये प्रामुख्याने बटन आणि ऑयस्टर (धिंगरी) या अळिंबीची लागवड होते.
धिंगरी अळिंबी उत्पादन
प्रथमतः धिंगरी अळिंबीची आपल्याला हव्या असलेल्या जातीची निवड करावी.
यासाठी प्लुरोटस साजर काजू. प्लुरोटस ईओस, प्लुरोटस फ्लोरिडा आणि प्लुरोटस ऑस्ट्रीटस या जातींची निवड करावी.
अळिंबी लागवडीसाठी उन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी खोली,शेडची आवश्यकता असते.
या जागेत खेळती हवा गरजेची आहे. भाताचे तूस किंवा गव्हाचे काड इ. घटकांची आवश्यकता असते.
काडाचे २ ते ३ से.मी. लांबीचे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरून थंड पाण्यात ८ ते १० तास बुडवून भिजत घालावे.
काडाचे पोते थंड पाण्यातून काढून त्यातील जादा पाण्याचा निचरा करावा.
काडाचे निर्जंतुकीकरण
अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान २२ ते ३० अंश से. हवेतील आर्द्रता ६५ ते ९० टक्के असावी.
तापमान व आर्द्रता यांचे ठेवण्यासाठी जमिनीवर हवेत तसेच चोहोबाजूंनी गोणपाटाचे आवरण लावून त्यावर स्प्रे पंपाने पाणी फवारण्याची व्यवस्था करावी.
मशरूम उत्पादन प्रकल्पाचे यश किंवा अपयश हे प्रामुख्याने काडाच्या निर्जंतुक करण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असते तेव्हा ही प्रक्रिया काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे
बेड भरणे
निर्जंतुक केलेले काड प्लास्टिक पिशव्यांमध्ये थर पद्धतीने भरावे.
काड भरताना प्रथम ८ ते १० से.मी.जाडीचा काडाचा थर द्यावा. त्यावर अळिंबीचे बियाणे (स्पॉन)पसरावे.
स्पॉनचे प्रमाण ओल्या काडाच्या वजनाच्या २ टक्के असावे.
पिशवी भरल्यावर दोऱ्याने पिशवीचे तोंड घट्ट बांधावे. पिशवीच्या पृष्ठभागावर सुई किंवा टाचणीच्या सहाय्याने छिद्रे पाडावीत. व ती पिशवी मांडणीवर ठेवावी.
बुरशीची वाढ होण्यास १५ ते २० दिवस लागतात. बुरशीच्या धाग्यानी काड घट्ट चिकटून त्यास ढेपेचा आकार प्राप्त होतो त्यास बेड म्हणतात.
बेडवर २ ते ३ वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी
काढणी
काढणीपूर्वी अळिंबीवर एक दिवस अगोदर पाणी फवारू नये. यामुळे अळिंबी कोरडी व तजेलदार राहते.
पहिली काढणी पिशवी भरल्यापासून २० ते २५ दिवसात करावी.
लहान मोठी अळिंबी एकाच वेळी काढून घ्यावी.
ताजी अळिंबी अल्पकाळ टिकणारी व नाशवंत आहे. वाळलेली अळिंबी प्लास्टिक पिशवीत सीलबंद करून ठेवल्यास सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकते.
© दीपक केदू अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा