व्यवसाय/उद्योगासाठी उद्योगनीती !
Industrial policy for business/industry
तहान लागल्यानंतर विहीर खोदून काम उपयोग? ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. म्हणजेच भविष्यातील आपल्या गरजा ओळखून त्यासाठी योग्य तजवीज करणे आवश्यक आहे. उद्योग-व्यवसाय उभारणीपासून तो यशोशिखरावर नेण्यासाठी करावयाच्या आवश्यक सर्व बाबींची मार्मिक पद्धतीने मांडणी सदर कवितेत केली आहे. चला तर मग जाऊया या कवितेच्या गावा...
व्यवसाय-उद्योगात असावा माथा ।
नुसता नसावा नीतीचा काथा ।।
व्यवसाय-उद्योगात करावे वाचन।
मनात होते त्यामुळे 'उद्योजकीय' सिंचन ।।
व्यवसाय-उद्योगात आचरावी कुटिल नीती ।
त्याने घडेल स्वउद्योगाची दिवसेंदिवस प्रगती ।।
व्यवसाय-उद्योगात आणा सर्वसमावेशी बुध्दिमत्ता ।
तेव्हाच चौफेर येईल तुमची उद्योगात सत्ता ।।
व्यवसाय-उद्योगात नका धरू कुणाला वेठीस ।
तेव्हाच पैसे खुळखुळतील तुमच्या गाठीस ।।
व्यवसाय-उद्योगात जपा उद्योजकतेची मूल्ये ।
त्यानेच साम्राज्य होईल खुले ।।
व्यवसाय उद्योगात जुने विचार द्या टाकून ।
करावा स्वीकार आदबीने वाकून।।
व्यवसाय उद्योगात करावा नफ्याचा विचार ।
पण नफ्यासाठी करू नका भ्रष्ट आचार ।।
व्यवसाय-उद्योगात द्या चांगली सेवा ।
सेवा घेऊन ग्राहकांचा काढू नका मेवा ।।
व्यवसाय-उद्योगात ठेवा रागावर नियंत्रण ।
उद्घाटनानिमित्त पाठवा सर्वांना सस्नेह निमंत्रण ।।
व्यवसाय-उद्योगात नसावा उर्मटपणा ।
त्यासाठी सिंधी-मारवाडींचे गुण आचरणात आणा ।।
व्यवसाय-उद्योग करावा दूरदृष्टीने ।
कामगारांची काळजी घ्या नेकीने ।।
व्यवसाय-उद्योगात करा सर्व धर्माचा आदर ।
यानेच आपले नांव जाईल दूरवर ।।
व्यवसाय-उद्योगच करा, करू नका चाकरी ।
का लोटतात दूर आपल्या हक्काची भाकरी ।।
व्यवसाय उद्योगात करावे बाजारपेठ मंथन ।
हर एक ग्राहकाचे करावे स्वमनन ।।
व्यवसाय-उद्योगात आचरावी सकारात्मकता ।
हीच तरी तुमची खरी पात्रता ।।
व्यवसाय-उद्योगात करावी अपार मेहनत ।
असू द्यावी चांगल्या विचारांची दानत ।।
व्यवसाय उद्योगात करावा स्पर्धकांचा विचार ।
त्यासाठी करावा निकोप स्पर्धेचा आचार ।।
व्यवसाय-उद्योगात ठेवू नका पर्याय ।
तेव्हाच होईल मुंबईचे शांघाय ।।
व्यवसाय उद्योगात ठेवा अंतरंगी चिकाटी ।
तेव्हाच फोडू शकाल स्वउद्योगाची लाठी ।।
व्यवसाय-उद्योगात ग्राहकांवर व्हा एकाग्र ।
तेव्हाच उद्योग तुमचा बहरेल समग्र ।।
व्यवसाय-उद्योगात करा आर्थिक संचय ।
पैशांबरोबर करा समाजसेवेचा समुच्चय ।।
व्यवसाय-उद्योगात असावी ज्वलंत इच्छाशक्ती ।
त्यासाठी करावी लागते स्वकर्तृत्वावर भक्ती ।।
व्यवसाय-उद्योगात मिळवावे लागते झगडून यश ।
परंतु त्यासाठी आधी पचवावे लागते अपयश ।।
व्यवसाय उद्योगात असावे संभाषण चतुर ।
त्यासाठी करू नका ग्राहकापुढे कुरबूर ।।
व्यवसाय-उद्योगात नसावा भाऊबंदकीचा शाप ।
आटोकाट भरावे आपल्या कर्तृत्वाचे माप ।।
व्यवसाय-उद्योगात झगडावे परिस्थितीशी ।
तीच तुमची पंढरी आणि काशी।।
व्यवसाय उद्योगात गाठा सर्वोच्च शिखर ।
वेळप्रसंगी घाला नीतिमत्तेवर नांगर ।।
व्यवसाय-उद्योगात असू द्यावे प्रसंगावधान ।
तुमच्या उद्योगाचे तुम्हीच व्हावे राजा नि प्रधान ।।
व्यवसाय-उद्योगात असू द्यावे स्मित हास्य ।
तरच तुम्ही जिंकू शकतात ग्राहकाचे कास्य ।।
व्यवसाय-उद्योगात करा दैवावर मात ।
जुन्या विचारांची वेळोवेळी टाकावी कात ।।
व्यवसाय उद्योगात करू नका वेळेचा विचार ।
कधी पसरू नका हात, होऊ नका लाचार ।।
व्यवसाय-उद्योग करता म्हणून वाटू देऊ नका कमीपणा ।
सोडू नका तुमच्या मनाचा सरळपणा ।।
व्यवसाय-उद्योगात वेळप्रसंगी घ्यावे कठोर निर्णय ।
पण कामाची बिघडू देऊ नका लय ।।
व्यवसाय उद्योगात चांगली माणसं सतत जोडा ।
तेव्हाच नीट चालेल आपल्या उद्योगाचा गाडा ।।
व्यवसाय उद्योगात स्वभाव ठेवा मनमिळावू ।
प्रसंगी उद्योग कर्तृत्वाचेच गाणी गाऊ ।।
व्यवसाय उद्योगात केव्हाही पडते अघटित ।
तेव्हाच अनुभव मिळतो अनेक पटीत ।।
व्यवसाय उद्योगात प्रत्येक असतो असमाधानी ।
हिच खरी ओळख असते उद्योजकाच्या मनी ।।
व्यवसाय उद्योगात असतात अमर्याद संधी ।
या लाटेवर आरुढ होतो उद्योजकाचा नंदी ।।
व्यवसाय उद्योगात स्वतःच करा स्वमूल्यमापन ।
कशाला हवे दुसऱ्या कुणाचे ज्ञापन ।।
व्यवसाय उद्योगात हस्तगत करावे व्यवहार ज्ञान ।
त्याशिवाय आपल्याला मिळणार नाही मान ।।
व्यवसाय उद्योगात होत असते चारित्र्याचे मुल्यमापन ।
तेव्हाच ग्राहक ठरवतो तुमचे 'शहाणपण' ।।
व्यवसाय-उद्योगात करावे मनाचे व्यवस्थापन ।
तेव्हाच सुधारेल आपले 'अर्थकारण' ।।
व्यवसाय-उद्योगात द्या इतरांना प्रेरणा ।
त्यानेही मिळेल आपल्या उद्योगाला चालना ।।
महाराष्ट्रात आहे भौगोलिक संपत्तीचे सडे ।
म्हणूनच आपण आहोत औद्योगिकीकरणात पुढे ।।
व्यवसाय उद्योगासाठी मी खूप काही सांगितलं ।
माफ करा मला जेवढं कराल तेवढं चांगलं ।।
व्यवसाय-उद्योग करणाऱ्यांवर मी करतो प्रेम ।
जेवढं जमेल तेवढे करा माझेच मला सप्रेम ।।
व्यवसाय-उद्योजकांना जावो दिवस आनंदाचा ।
घेतो रजा आता सोशल मीडियाच्या वाचकांचा ।।
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com
******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram :
******************************************
YouTube :
******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :
******************************************
No comments:
Post a Comment