name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): सेंद्रिय आणि जैविक तणनाशके Organic and biological herbicides

सेंद्रिय आणि जैविक तणनाशके Organic and biological herbicides

 सेंद्रिय आणि जैविक तणनाशके

Organic and biological herbicides

      रासायनिक तणनाशके विषारी असतात. रासायनिक तणनाशकाचे अवशेष जमिनीत राहिल्याने पुढील हंगामातील पिकाला त्याचा धोका संभवतो. सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक तणनाशके वापरता येत नाहीत. त्यामुळे तणाचे नियंत्रण करण्यासाठी सेंद्रिय व जैविक तणनाशके Organic and biological herbicides फायद्याची आहेत. 

Organic and biological herbicides
सेंद्रिय तणनाशक: उकळते पाणी 

सेंद्रिय तणनाशके

१) पाणी : 

  • साधे पाणी विषारी नाही तर उदासीन असते. उकळत्या पाण्याचा उपयोग तणांचा नायनाट करण्यासाठी करता येतो. 

  • आपण फुलझाडांची व भाज्यांची रोपे गदिवाफ्यावर किंवा नर्सरीतील सपाट वाफ्यात तयार करतो. 

  • कांदा व मिरची  या वाफ्यात तणाचे बी सुप्तावस्थेत असते. या वाफ्यात पिकांचे बी उगवले की त्यासोबत तणांचे बी देखील उगवते. आणि पिकांच्या रोपांशी स्पर्धा करते. 

  • या वाफ्यात बी पेरण्यापूर्वी किटलीत साधे पाणी उकळावे आणि वाफ्याच्या पृष्ठभागाच्या थरावर उकळते पाणी ओतून तो थर भिजवावा. 

  • त्यामुळे वाफ्यातील तणाचे बी, तणांचे अंकुर, रोगकारक सूक्ष्मजंतू व बुरशी मरते. त्यामुळे तेथे पुन्हा तण उगवत नाहीत. आणि बुरशीमुळे वाफ्यातील रोपे मरत नाहीत.

  • हा स्वस्त, सोपा व बिनविषारी उपाय आहे. 

  • अनेक ठिकाणी भिंतीवर वड व पिंपळाची रोपे उगवतात व वाढतात. त्यांच्या खोल मुळ्या भिंतीत शिरलेल्या असतात. ते मुळासह उपटता येत नाहीत. या झाडांच्या मुळांवर उकळते पाणी ओतल्याने ती करपून मरतात. 

२) मीठ :

  • आपण घरी खाण्यासाठी जे मीठ वापरतो. त्याची भुकटी तणांच्या पानावर टाकली तर पाने करपतात आणि सुकतात.

  • एक भाग मीठ दोन भाग पाण्यात विरघळून त्या द्रावणाची  तणावर फवारणी करावी. 

  • पिकांच्या पानावर द्रावण पडू देऊ नये. पडल्यास पिकांचीही पाने करपतात. 

  • मिठाच्या द्रावणाची फवारणी केल्याने गाजर गवताचे नियंत्रण  होते. 

  • मिठाच्या द्रावणाची फवारणी करताना ते जमिनीवर पडू देऊ नये. साडे चार लिटर व्हिनेगरमध्ये सव्वा कप मीठ मिसळावे. आणि द्रावणाची तणावर फवारणी केल्याने 2 ते 3 दिवसात तण वाळून मरते. 

Organic and biological herbicides
सेंद्रिय तणनाशक: लिंबाचा रस 

३) लिंबाचा रस : 

  • लिंबाच्या रसात सायट्रिक ऍसिड असते आणि त्याच्या फवारणीने तण करपून मरते.

  • पण त्यासाठी ज्या लिंबाचा रस वापरणे परवडत नाही. कागदी लिंबाच्या बागेत सतत फळगळ होत असते. आणि फळे वाया जातात. त्यांचा रस काढून तणावर फवारणी करता येते.

  • एक लिटर पांढऱ्या व्हिनेगारमध्ये १२० मी. ली. लिंबाचा रस मिसळून पाणी न मिसळता तणावर फवारणी करावी. त्यामुळे रुंद पानांच्या तणांचा नायनाट होतो. 

४) व्हिनेगर : 

  • कोणत्याही आम्लामुळे तणांची रोपे करपतात व मरतात.

  • व्हिनेगरमध्ये असेटीक असिड असते. लहान तणांच्या नियंत्रणासाठी ५ टक्के असेटीक असिड असलेल्या व्हिनेगारची फवारणी करावी.

  • ही फवारणी तणावर केल्यानंतर दोन दिवस पाऊस पडणार नाही  असा अंदाज पाहून फवारणी करावी. 

  • कोरड्या हवामानात दुपारी कडक उन्हात फवारणी केल्याने अधिक लवकर फायदा होतो.

  • दोन भाग उकळलेल्या पाण्यात एक भाग व्हिनेगार मिसळून त्या द्रावणाची तणावर फवारणी करतात. 

  • काटक तण मरण्यास पुन्हा फवारणी करावी लागते. 

५) डिटर्जंट: 

  • कपबशा व चिनी मातीची भांडी स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट वापरतात. 

  • एक भाग द्रव डिटर्जंट दहा भाग पाण्यात मिसळावे. आणि त्या द्रावणाची फवारणी करावी.

  • धुण्याच्या साबणाचे द्रावण फवारल्यानंतर रुंद पानाचे तण मरते. 

६) गोमूत्र : 

  • ताजे गोमूत्र गोळा करावे. हे ताजे गोमूत्र पाण्यात न मिसळता त्याची फवारणी तणावर केल्याने तण करपून मरते. 

७) मक्याचे पीठ : 

  • अंगणातील फरशीच्या फटीत वाढलेल्या तणावर मक्याचे पीठ टाकल्याने पिठातील ग्लूटेनमुळे तण वाढत नाहीत. 

८) मिश्रण : 

  • १.१ लिटर व्हिनेगर+ पाव कप मीठ+२ चमचे द्रव डिटर्जंट यांचे मिश्रण करावे. त्यानंतर तणावर फवारणी करावी. 

घ्यावयाची काळजी: 

  • वरील तणनाशकाच्या फवारणीने जसे तण मरते. तसेच पीकही मरण्याचा धोका असतो म्हणून शक्यतो ही फवारणी पीक शेतात नसताना करावी. 

  • पिकातील तणावर फवारणी करायची झाल्यास ही तणनाशके पिकावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.

  • पावसाचा अंदाज घेवून तणावर तणनाशकाची फवारणी करावी. कारण पावसाच्या माराने तणनाशके धुतली गेल्यास त्याचा परिणाम होत नाही.

  • तणनाशकांची फवारणी दिवसा दुपारी कोरड्या हवामानात केल्यास जास्त फायदा मिळतो.

  • ही तणनाशके जमिनीत मुरली असता शेजारच्या पिकांच्या मुळांवर त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणून काळजी घ्यावी. 

जैविक तणनाशके

१) किडीमुळे तणांचे नियंत्रण : 

Organic and biological herbicides
तण: गाजर गवत 


  • अमेरिकन गव्हामधून भारतात आयात केलेल्या बियाणापासून गाजर गवताचा संपूर्ण देशात प्रसार झाला आहे. 

  • या तणांचा नायनाट मेक्सिकन भुंगे करतात. एक अळी १० ते १५ हजार गवतांच्या झाडांची पाने खाते. त्यामुळे तणांची वाढ खुरटी होते. आणि बीजोत्पादन होत नाही.

  • निलगिरी तेलाची गाजर गवतावर फवारणी केल्यास १५ दिवसात हे तण मरते. 

  • पूर्वी नागफण या निवडुंगाची काटेरी झाडे शेताच्या कुंपणावर व रस्त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत होती. ऑस्ट्रेलियातून कोचीनील कीटक आणून त्या निवडुंगावर सोडले असता नागफणीचा संपूर्ण नायनाट झाला आहे. या किडीमुळे शेतातील पिकांचे नुकसान होत नाही. 

२) बुरशी रोगांमुळे तणांचे नियंत्रण: 

  • पक्सीनिया अंब्रप्टा या बुरशीमुळे गाजर गवताला तांबेरा रोग होतो. त्यामुळे ४२ ते ८५ टक्के  गाजर गवत मरते.

  • फोमोप्सिस या बुरशीमुळे बाथूआ व इतर अनेक महत्वाच्या तणांचा नाश होतो.

  • फायटोप्थोरा पालमीव्होरा या बुरशीने संत्र्याच्या बागेतील दुधी तणाचे नियंत्रण होते. 

  • पाठीवर ३ पट्टे असलेली खार गाजर गवताच्या फुलातील पराग खाते. त्यामुळे बीजोत्पादनास प्रतिबंध  होतो. 

  • गाजर गवताचे नियंत्रण केसिया सेरीसी या झाडामुळे होते. या झाडाच्या मुळातून पाझरणाऱ्या कावोलीनचा साठा जमिनीत होतो त्यामुळे तेथे गाजर गवत उगवत नाही. 

अशा पद्धतीने सेंद्रिय व जैविक तणनाशके वापरावीत. 


© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उद्योगस्वामिनी (Udyog swamini)

उद्योगस्वामिनी   Udyog swamini  १. सौ. श्रद्धा चैतन्य ढोरमले  sou.  Shraddha Chaitanya Dhormale     सौ. श्रद्धा चैतन्य ढोरमले यांनी दुग्ध व्...