name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): अभियंता ते आंतरराष्ट्रीय सेंद्रिय निरीक्षक : श्री. हर्षल जैन (From Engineer to International Organic Inspector: Mr. Harshal Jain)

अभियंता ते आंतरराष्ट्रीय सेंद्रिय निरीक्षक : श्री. हर्षल जैन (From Engineer to International Organic Inspector: Mr. Harshal Jain)

अभियंता ते आंतरराष्ट्रीय सेंद्रिय निरीक्षक : श्री. हर्षल जैन
From Engineer to International Organic Inspector: Mr. Harshal Jain

   
    

      नांदेड येथील श्री. हर्षल शरदचंद्र जैन हे आंतरराष्ट्रीय सेंद्रिय निरीक्षक असून त्यांचा प्रवास अभियंता ते शेतीतज्ञ असा झाला असून त्यांनी आपला जीवन प्रवासात एक वेगळी वाट चोखाळली आहे. आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व त्यांनी समजावले असून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अस्सल सेंद्रिय मालाचे प्रमाणीकरणाविषयी त्यांनी जनजागृती केली आहे त्यासाठी त्यांनी "जी नेक्स्ट ऑरगॅनिक सेल्स व सर्व्हिसेस" या सेवा केंद्राची स्थापनाही केली आहे त्यांच्या या जीवनप्रवास व कार्याबद्दल वाचकांना माहिती व्हावी म्हणून त्यांची खास मुलाखत...


          वस्त्रोद्योग क्षेत्रात अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेऊन त्या क्षेत्रात करिअर करण्याची श्री. हर्षल जैन यांना संधी असताना ते मुक्त आंतरराष्ट्रीय सेंद्रिय प्रमाणिकरण निरीक्षक का झाले? या माझ्या प्रश्नाचे उत्तर देतांना ते म्हणाले की, "माझे शालेय दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथील गुजराथी शाळेत झाले. व पुढील बारावी विज्ञानचे शिक्षण सायन्स कॉलेजमध्ये झाले. बारावीनंतर मी अमरावती विद्यापीठातून वस्त्रोद्योग विद्या शाखेतून पदवी प्राप्त केली. या पदवीनंतर त्यांनी लेबर लॉ, एमबीए तसेच सीओएफ म्हणजेच सेंद्रिय शेती प्रमाणिकरण अभ्यासक्रम पूर्ण केला. सेंद्रिय शेतीची असलेली आवड लक्षात घेता मुक्त आंतरराष्ट्रीय सेंद्रिय निरीक्षक झालो.
          माझे वडील बांधकाम विभागात सरकारी नोकरी करत होते. आई गृहिणी असून मी एका सामान्य कुटुंबातील असल्याचे श्री. जैन यांनी सांगितले. शिक्षणानंतर इतरांप्रमाणे नोकरी करण्याचा बेत आखला. पुढे त्यांनी २००१ ते २०१० या काळात आंतरराष्ट्रीय एक्सपोर्टमध्ये बॉम्बे डाईंग बिर्ला टेक्सटाईल या नावाजलेल्या कंपन्यात नोकरी केली. सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले. उच्च शिक्षणानंतर विदेशातील अनेकविध कामासाठी ऑफर येतच होत्या म्हणून नोकरी केली. पण घरची जबाबदारी म्हणून भारतात परत आलो व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तीव्र इच्छा झाली आणि त्यातून "जी नेक्स्ट ऑरगॅनिक्स सेल्स अँड सर्व्हिसेस"चा जन्म झाला. अनेक कंपन्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट करून काम करून पुढे वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.


  स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त ठरलेला, माझ्या आयुष्यात कलाटणी देणारा एक क्षण घडला. तो म्हणजे बिहार राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न जेव्हा मी पाहत होतो. तसेच आपल्या राज्यातील वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत होतो. तेव्हा माझे मन भरून आले. आपणही आपल्या लोकांसाठी, देशासाठी काहीतरी केले पाहिजे असे मी मनोमन ठरवले. आणि २०१० पासून आपले कार्यक्षेत्र बदलल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला अनेक समस्या आल्या. कोणीही सरकारची सेंद्रिय शेती योजना समजून घेत नव्हते. व्यापारी इन्वेस्टमेंटसाठी घाबरत होते. सेंद्रिय मानके कोणीही समजून घेत नव्हते. त्यामुळे मन खचत होते पण हळूहळू परिस्थिती बदलली आणि कामाचा मार्ग प्रशस्त होत गेला असे श्री. जैन यांनी आवर्जून सांगितले.

             देशात शेतीमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक शेतीला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे काम सुरू आहे यातून उत्पादनात भर पडली परंतु त्यापासून अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत. जमिनीत रसायनाचा भरपेट मारा झाला आहे. देशातील अनेक भागात जमिनी  नापीक झाल्या आहेत. तसेच रासायनिक खते व कीडनाशकाचे वापरातून मानवाला दुर्धर आजार झाले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी सेंद्रिय शेती करणे ही काळाची गरज आहे असे श्री. हर्षल जैन यांनी सांगितले अशावेळी सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित करून त्यांच्या शेतीमालाचे मूल्यवर्धन  व प्रमाणिकरण करण्यासाठी नांदेडमध्ये जी नेक्स्ट ऑरगॅनिक्स सेल्स अँड सर्व्हिसेस" या नावाने सेवा केंद्राची स्थापना २०१४ मध्ये केली असल्याचे हर्षल जैन यांनी सांगितले.


         ते पुढे म्हणाले की, या सेवाकेंद्राद्वारे हजारो शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रेरित केले असून अजूनही पुढे करणार आहे.    महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील सुमारे 3000 शेतकऱ्यांना  सेंद्रिय शेती व प्रमाणिकरणाबद्दल मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे.  सध्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव, बिलोली, अर्धापूर, हदगाव नांदेड, किनवट या तालुक्यात जोमाने काम सुरू आहे. यासोबत ते इतर जिल्हे लातूर, परभणी, हिंगोली व इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करीत आहे. आजपर्यंत १५०० शेतकऱ्यांच्या मालाचे सेंद्रिय प्रमाणिकरण केले आहेत. या शेतकऱ्याना भारत सरकारच्या पीजीएस व एनपीओपी मानांकनानुसार प्रमाणिकरणासाठी सहाय्य केले असल्याचे श्री. जैन यांनी सांगितले. जिल्ह्यात ३४ सेंद्रिय शेतीमाल उत्पादक शेतकरी गट श्री.जैन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. शेतीमालात डाळवर्गीय पिके,फळे, धान्य, ऑइल सीड्स, हळद आदी शेतीमालाचे प्रमाणिकरणाचे काम श्री. हर्षल जैन यांनी केले आहे.    

 
       भारत सरकारच्या खाद्य सुरक्षा व मानक अधिनियम फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नवीन नियमावलीनुसार सेंद्रिय उत्पादन व विक्रीसाठी प्रमाणीकरण आवश्यक राहणार आहे सध्या हर्षल जैन हे लेकॉन क्वालिटी सर्टिफिकेशन प्रा. ली. तर्फे आंतरराष्ट्रीय सेंद्रिय प्रमाणिकरण निरीक्षक म्हणून काम पाहतात.  जी नेक्स्ट ऑरगॅनिक सेल्स व सर्विसेसद्वारे जिल्ह्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय सेंद्रिय संमेलन, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, विविध कृषी मिळावे व प्रत्यक्ष सेंद्रिय शेतीच्या ठिकाणी भेट, अभ्यास दौरे अशा अनेकविध उपक्रमात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सहभागी करून घेतले आहे. 

 
      देशात सिक्कीम हे राज्य पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणून पुढे आले आहे.  या राज्यातील पश्चिम व पूर्व भागातील सहा हजार शेतकऱ्यांना सेंद्रिय मालाची तपासणी व प्रमाणीकरण करण्याचे काम श्री. हर्षल जैन यांनी केले आहे. आजपर्यंत देशातील एक लाख शेतकऱ्यांच्या मालाचे प्रमाणिकरण केले आहे. यासोबतच तीनशेहून अधिक व्यापारी, ट्रेडर्स, एक्सपोर्ट, प्रक्रिया उद्योगांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार प्रमाणित केले आहे. नांदेड सारख्या ठिकाणी सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणिकरण करण्याचे काम होत असल्याने जिल्हा तसेच परिसरातील शेतकऱ्यांना कमी खर्चात व कमी वेळेत शेतीमालाचे प्रमाणीकरण होत असल्याने यातून शेतकऱ्यांची वेळ व पैशांची बचत होत असल्याचे श्री. हर्षल जैन यांनी सांगितले.  

 
  श्री. हर्षल जैन हे सेंद्रिय शेतीमालाच्या प्रमाणीकरणाच्या कामात मिळणाऱ्या मिळकतीचा ७० टक्के हिस्सा शेतकऱ्यांना मार्गदर्शन, अडचणी असणाऱ्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सहाय्य करण्याचे काम करतात. त्यांनी अनेक गरजू लोकांना व युवकांना कुशलरीत्या प्रशिक्षित करून त्यांना सेंद्रिय शेतीत रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अनेकांना प्रशिक्षित करून विविध कंपन्यांमध्ये रोजगारनिर्मिती केली. पर्यावरण व जैवविविधता जोपासणे, अनेकांना प्रशिक्षित करून कुशल बनवणे जेणेकरून ते स्वावलंबी होतील हे ध्येय समोर ठेवून त्यांनी अनेकांना प्रेरित केले आहे.


        शेतकऱ्यांनी शेती टिकवण्यासाठी सेंद्रिय शेती करणे गरजेचे असल्याचे सांगतात उत्पादन खर्च कमी करून उत्पादित मालाचे प्रमाणिकरण केल्यास त्या शेतीमालाचे मूल्यवर्धन होईल यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी असे हर्षल जैन आवर्जून सांगतात त्यांनी आफ्रिकेतील मोझांबिक,इथोपिया, केनिया, युरोपातील इटली, जर्मनी, ऑस्ट्रेलिया,आशियातील हॉंगकॉंग, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर व इतर देशातील उद्योगांची तपासणी करून सेंद्रिय मालाचा पुरवठा केला आहे. भारतातील एकूण २० राज्यांमध्ये त्यांनी सेंद्रिय तपासणी केली आहे.

 
         श्री. हर्षल जैन आजही स्वतःला विद्यार्थी समजतात. त्यांना आजही असे वाटते की, अजूनही नवनवीन शिकत रहावे. ते सेंद्रिय मानकाचे, कृषी विभाग अमेरिकेची परीक्षासुद्धा उत्तीर्ण आहेत. ते नवनवीन सेंद्रिय फूड ऑपरेशन्स, युरोप व इतर देशातील अपडेट्स व प्रशिक्षण पूर्ण करतात. भारतातली मल्टीनॅशनल कंपनी विरुया वेरीतास, दिल्ली येथे प्रशिक्षण कार्यही पुर्ण केले असल्याचे श्री.जैन यांनी सांगितले.

 
          श्री. हर्षल जैन यांना त्यांच्या सेंद्रिय शेती प्रचार आणि प्रसार, प्रमाणीकरण  या कामाबद्दल आजतागायत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. २०११ मध्ये केंद्र शासनाचा "जैविक इंडिया अवॉर्ड"ही त्यांना मिळाला आहे. २०१२ मध्ये बिहार सरकारकडून कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. या सोबतच कृषी व बिगर कृषी विद्यापीठाकडून अनेक वेळा श्री. जैन यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना जैविक भारत संस्थेचे तसेच अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या कार्याच्या अधिक माहितीसाठी gnextorganics@gmail.com यावर संपर्क करावा.

© दीपक केदू अहिरे

 नाशिक

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...