name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): गांडूळ खत निर्मिती व उत्पादनाची यशोगाथा (vermicompost project report)

गांडूळ खत निर्मिती व उत्पादनाची यशोगाथा (vermicompost project report)

गांडूळ खत निर्मिती व उत्पादनाची यशोगाथा, 
प्रकल्प अहवाल Vermicompost Project Report

प्रस्तावना

शेतीची सुपीकता टिकवण्यासाठी चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खताची आवश्यकता असते. 

अशा प्रकारची खते शेतकरी आपल्या घराजवळील कंपोस्ट खड्डयात घरातील व गोठ्यातील काडीकचरा, शेण, सांडपाणी, गोठ्यातील मूत्र भाजीपाल्याचे टाकावू अन्नपदार्थ इ.पासून तयार करतात. अर्थात हे पदार्थ चांगल्या तऱ्हेने कुजत नसल्यामुळे यापासून पिकांना पोषक असे सेंद्रिय खत तयार होत नाही. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर याचे परिणाम दिसून येत नाही. व जमिनीचा पोत सुधारण्यासही या खताची उपयुक्तता दिसून येत नाही. आज राज्याच्या सर्वच भागात दर्जेदार कंपोस्ट खताची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. वरील परिस्थितीचा विचार करता ग्रामीण भागातील युवकांनी पुढे येवून एक स्वयंरोजगाराची दिशा म्हणून गांडूळ खत व्यवसाय त्यांच्या गावातच, खेड्यातच सुरू केला तर तो अधिक फायदेशीर ठरेल.


बाजारपेठ
    सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त असणारे गांडूळ खत गावातल्या, तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष विकता येईल. किंवा शेतीमालाच्या निविदा विकणाऱ्या सहकारी किंवा खाजगी दुकानांच्या माध्यमातून विकता येतील. यामुळे उत्पादन वाढते. या मुद्द्यावर भर देऊन विक्री वाढवता येईल.

Vermi compost


निर्मिती प्रक्रिया

     फळे, भाजीपाल्याचा कचरा यंत्रातून बारीक करावा. भाजीपाल्याचा कचरा एकत्र करून त्याचा जमिनीवर गादीवाफा तयार करावा. हा वाफा १.५ मीटर रुंद व ०.९ मीटर उंचीचा असावा. प्रत्येक घनमीटरसाठी ३५० गांडूळे याप्रमाणे या गादीवाफ्यात गांडूळे सोडावीत. या वाफ्यात पाणी शिंपडून ४० ते ५० टक्के आद्रता ठेवावी. व २० ते ३० डी.से. तापमान ठेवावे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून बांबू व लाकडाच्या सहाय्याने मांडव घालावेत. १५ मीटर लांबी व ५.४ मीटर रुंदीच्या जमिनीवर ८ मांडव घालून ६० गादीवाफे तयार करता येतात. 
  गादीवाफ्यात घातलेला कचरा गांडुळे खातात व त्यांनी टाकलेली विष्ठा म्हणजेच उत्तम दर्जाचे खत होय. सर्व कचरा खाऊन झाल्यावर गांडूळे खताच्या तळाशी जातात. काळ्या रंगाचे, भुसभुशीत खत तयार झाल्यावर पुढील ३ ते ४ दिवस पाणी शिंपडू नये. चौथ्या दिवशी कोरडे झालेले खत ओंजळीने अलगद पाटित टाकावे. गांडूळ प्रकाशात राहत नसल्यामुळे ते पुन्हा खताच्या तळाशी जात राहते. व वरील खत अलगद काढणे शक्य होते. शेवटी फक्त गांडूळेच राहतील त्यानंतर पुन्हा दुसरा कचरा, शेण टाकून दुसरा गादीवाफा तयार करावा. २०० टन वार्षिक खत मिळते. तयार खत वाळवून प्लास्टिक पिशव्यात पॅक करून विक्रीसाठी पाठवावे.

 
गांडूळ खताचे होणारे फायदे

         गांडूळ खत हे विविध घटकाच्या दृष्टीने समृद्ध असते. गांडूळाच्या विस्टेतील  बॅक्टेरिया या जिवाणूंचे प्रमाण जमिनीतील जिवाणूच्या संख्येच्या तुलनेने १३ पट अधिक होते असे पानोमरेव्हा या शास्त्रज्ञास १९६२ साली आढळून आले आहे. जमिनीत हे जंतू ५.४ दशलक्ष प्रति ग्रॅम इतके होते. याशिवाय फंगस व ॲक्टिनोमायसीटस काही प्रमाणात तर अझोटोबॅक्टर हे नत्र स्थिर करणारे जिवाणू बऱ्याच मोठ्या संख्येने गांडूळ विस्टेत आढळून आले. सेंद्रिय पदार्थांचे जिवाणूंच्या सहाय्याने विघटन कार्य विष्टा बाहेर टाकल्यानंतरही बरेच दिवस बऱ्याच वेगाने चालू असते. त्यांची विष्टा त्यातील जिवाणूंचे आजूबाजूच्या जमिनीवर प्रसार करण्याचे केंद्र बनते.

    गांडूळाच्या विष्टेत असलेले नेकार्डीया ऑक्टिनो मायसिटस व स्ट्रेपटो मायसेससारखे जिवाणू अँटिबायोटिकसारखे परिणामकारक असतात. अशाप्रकारे गांडूळाची आतडी सुमारे एक हजार पटीपेक्षा अधिक संख्येने जिवाणूंची संख्या वाढवून एक प्रकारे नैसर्गिक रिॲक्टरचे (बायो रिॲक्टर) काम करतात. तर विष्टेद्वारा बाहेर पडलेले सूक्ष्म जीवाणू जमिनीची जैविक सुपीकता वाढवण्याचे प्रचार केंद्राचे कार्य करतात. जमिनीचा पोत (स्ट्रक्चर) सुधारण्याचे कार्य माती खाऊन त्यातील जाड वाळूसारख्या कणांचे आतड्यात भरडून पोयट्याचे कणात व पोयट्याच्या आकाराच्या कणांचे चिकनमातीच्या आकारमानाच्या कणात भरडून बारीक करण्याचे कार्यही गांडूळे करतात. शिवाय खालची माती वर आणून ती विष्टेच्या स्वरूपात जमिनीच्या पृष्ठभागावर टाकतात. काही वर्षांनी जमिनीचा वरचा १० ते १५ सें.मी. जाडीचा थर कणांची चांगली जडणघडण झालेल्या दाणेदार मातीचा बनतो. हे दाणे (एग्रीगेट) पाण्यातही स्थिरावस्थेत राहतात. त्यांचा व्यास १ ते २ मी.मी. असतो.


   शेतावर किंवा परिसरातील वाया जाणाऱ्या सेंद्रिय पदार्थांपासून गांडूळाच्या साह्याने प्रदूषणविरहित पद्धतीने उत्तम प्रतीचे कंपोस्ट तयार करता येते. हे खत तयार करताना दुर्गंधी येत नाही. त्यामुळे मनुष्यवस्तीजवळही ते तयार करणे शक्य आहे. गांडूळाच्या विष्टेभोवती पातळ पारदर्शक चिकट पदार्थाचे आवरण असल्यामुळे ते सहज व सुलभतेने हाताळता येते. गांडूळ कंपोस्टमध्ये शेणखतापेक्षा चारपटीने अन्नद्रव्य अधिक प्रमाणात असतात. व ती सर्व पिकांच्या मुळ्याना उपलब्ध अवस्थेत असतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे उपलब्ध अवस्थेतील प्रमाणही अधिक असते. शिवाय गांडूळखतात पीकवाढीस उत्तेजित करणारे संजीवके व संप्रेरके तसेच जीवनसत्व  एंटीबायोटिक्स व एन्झाईम्सही असतात.यामुळे जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता सुधारून पिकांची वाढ जोमाने होते. व उत्पादन अधिक मिळते. शेतीमालाचे उत्पादन तर वाढतेच पण त्यांची गुणवत्ता म्हणजे आकार,रंग,चमक,चव व प्रत सुधारते. त्याचबरोबर त्यांचा टिकावूपणाही वाढतो. त्यामुळे गांडूळखताचा उपयोग लवकर होतो. सध्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतके उत्पादन गांडूळखताचे होते. व ते खत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात वाहतूक करून वापरले जाते. त्याऐवजी प्रत्येक शेतकऱ्याने आपली गरज आपणच त्या खताचे उत्पादन स्वतःच्या शेतावर करून भागवली पाहिजे. वरील पद्धतीचा अवलंब करून ते सहज शक्य आहे.
        गांडूळखत वापरल्यामुळे रासायनिक खतावरील खर्च वाचतो. शिवाय कीटकनाशकावरील खर्चातही बचत होते. गांडूळखताबरोबर सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन म्हणून वापर केल्यामुळे तणांच्या बंदोबस्तासाठी करावा लागणारा मजुरांचा, आंतरमशागतीचा व तणनाशकांचा खर्चही कमी होतो. तण वाढलेच तर ते मुळासकट उपटून नष्ट न करता कापून त्याच जमिनीच्या पृष्ठभागावर पसरवून आच्छादनासारखा उपयोग करावा. कालांतराने ते कुजून गांडूळास खाद्य म्हणून उपयोगी पडते.

 
शाश्वत शेतीचे आधारस्तंभ
         गांडूळखतामुळे वाया जाणाऱ्या शेती उत्पादनातील पदार्थांपासून निसर्गचक्र पूर्ववत सुरळीतपणे सुरू करून कमी खर्चात दर्जेदार व अधिक उत्पादन तर घेता येतेच पण आपल्या जमिनीची उत्पादकता अखंडपणे टिकवून ठेवणे शक्य होते. रासायनिक खते ही जमिनीची गरज न भागवता पिकांची पोषणद्रव्याची गरज परस्पररित्या पूर्ण करतात. शिवाय जमिनी निर्जीव व नापीक बनवितात. गांडूळखते व जिवाणूखते ही जमिनीला सजीव बनवून त्यातील जीवसृष्टी सतत कार्यरत ठेवून भूमातेच्या उदरातील विविध प्रकारच्या पोषणद्रव्याचा खजिना पिकांना उपलब्ध करण्याचे कार्य करतात.
         थोडक्यात भूमातेची भूक सेंद्रिय खते वापरून आपण भागवली तर भूमाता (जमीन) पिकांची भूक भागवण्याचे काम असंख्य जीव-जीवाणूमार्फत करून पिके मानवाची इतर प्राण्यांची भूक भागविण्याचे कार्य अव्याहतपणे करतील. हे निसर्गचक्र हजारो वर्षापासून सुरू होते. त्यात रासायनिक खतांच्या गेल्या ४०-५० वर्षातील वापरामुळे व्यत्यय आला होता. पण लवकरच ती चूक आपल्या लक्षात आली व रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष वळू लागले आहे. भूमाता जीवित राहिली तर तिचे लेकरे जगतील नाही तर या भूतलावावरील जीवसृष्टी संपुष्टात यायला फारसा काळ लागणार नाही म्हणून रासायनिक खतांना पर्यायी सेंद्रिय खते, जिवाणू खते व गांडूळ खते हीच शाश्वत शेतीचे आधारस्तंभ आहेत.

 
 खत प्रकल्पची यशोगाथा

           सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील श्री. शहाजी भांगे यांनी समर्थ गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे. त्यांच्याकडे गांडूळ खत दहा हजार रुपये टन पोहोच मिळेल. ते स्वतः गांडूळ खताचा बेडही विकतात. गांडूळ कल्चर तीनशे रुपये किलो मिळतील. तसेच व्हर्मीवॉश पन्नास रुपये लिटर आहे. ऊस, केळी, हळद, आलं, द्राक्ष, डाळिंब, पेरू, मिरची, टोमॅटो, वांगे, लसूण, कांदे, कापूस पिकासाठी व सर्व पालेभाज्यासाठी गांडूळखत उपलब्ध आहे.       
         गांडूळखत शेतीसाठी अतिशय उत्तम असे खत आहे. गांडूळाच्या शरीराचासुद्धा खत म्हणून उपयोग होत असतो. असे श्री. भांगे यांनी सांगितले. त्याच्या मृत शरीराच्या वजनाच्या ७२ टक्के प्रोटीन्स किंवा प्रथिने असतात. त्याचे शरीर लवकर कुजते. आणि त्यातून जमिनीला नत्राचा पुरवठा होतो. सर्वसाधारणपणे मेलेल्या एका गांडूळापासून दहा मिलीग्राम नायट्रेट मिळते.

 
        गांडूळाचे खत म्हणजे प्रामुख्याने गांडूळाची विष्ठा. या विष्ठेचे विश्लेषण केले असता त्यामध्ये नत्र,पालाश आणि स्फुरद हे तर जास्त असल्याचे आढळले आहेच. परंतु त्यात इतरही काही गोष्टी आढळलेल्या आहेत. जमिनीमध्ये सर्वसाधारणतः जेवढे जिवाणू असतात. त्याच्या दहा ते पंधरा पट अधिक जिवाणू त्याच्या विष्ठेमध्ये असतात. त्याच्यामध्ये पिकांना उपयुक्त असलेली बुरशी आणि ॲक्टिनोमायसिटीज असतात. हवेतला नत्र, जमिनीत स्थिर करणारे असेटोबॅक्टरसारखे जिवाणूही गांडूळाच्या विष्ठेमध्ये मोठ्या संख्येने आढळतात. त्याच्या विष्ठेमध्ये असलेले नेकार्डीया ॲक्टिनोमायसिटीज किंवा स्ट्रेप्टोमायसेससारखे सूक्ष्म जीवाणू औषधासारखे काम करतात. आणि पिकांवर पडणाऱ्या रोगांवर इलाज करतात.
      गांडूळाचे आतडे हे एक यंत्रच आहे. त्याच्या आतड्यामध्ये मातीचे रूपांतर खतात करणारे शंभरहून अधिक जिवाणू सतत कार्यरत असतात. गांडूळाचे हे सारे गुणधर्म पहिले म्हणजे गांडूळ हा शेतकऱ्यांचा कसा मित्र आहे हे लक्षात येईल असे श्री. शहाजी भांगे यांनी सांगितले. 

गांडूळखताचा उत्पादन जमा खर्च प्रकल्प अहवाल :

(१२९ मे. टन, १ वर्ष उत्पादन)
तपशील                                                          एकूण खर्च
अ) प्राथमिक गुंतवणूक (कायमस्वरूपी)
१. गांडूळखत निर्मिती (५०x १६,८००चौ.फूट)           १३,०००
२. वजनकाटा (१०० किलो क्षमतेचा)                        ९०००
३. इलेक्ट्रिकल मोटर व पंप, स्प्रिंकलर                     ४०००
४. गांडूळे (५ वर्षातून एकदाच)संख्या:३०हजार        ९०,०००
१००० गांडूळ : रु.३००/- १० टन खतनिर्मिती
करिता ३० हजार गांडूळे लागतात. गांडूळाची
निर्मिती स्वतः केल्यास त्यांच्या उत्पादन खर्चात
५० टक्के कपात करता येते. 
५.  खत पिशवीत पॅकिंग करण्यासाठी लागणारे          ५,०००
मशीन
एकूण                                                               १२१,०००
ब) दरवर्षी लागणारे खेळते भांडवल
१. प्रतिवर्षी शेतातील वाया जाणारे पाचट इ.           ३६,०००
२४० टन, वाहतूक खर्च, रू. १५० प्रती टन
२. मजुरी- दोन मजुरांना रु. १०००/- महिना             २४,०००
३. शेतातील कचरा पाचट कुजवण्यासाठी                २४,०००
लागणारे जिवाणू खत: १ किलो/ मे. टन
(२४०/१० की.) 
४.पॅकिंग साहित्य: पिशवी रु.१३(२४००/१३)           ३१,२००
५ गांडूळखतात मिसळण्यासाठी अझोटोबॅक्टर
पी. कल्चर,४ की./ मे.टन- रू.२०/- की.
१२० मे. टनासाठी १२०/८०
६. साहित्य : हत्यारे, बादल्या, फावडे, इ.                    ४,२००
एकूण                                                             १,२९,०००
क) व्याज
१. मूळ गुंतवणुकीवरील व्याजदर १६ टक्के.          १९,३६०
१,२१,००० वरील
२. खेळते भांडवल प्रती वर्ष                                 ४१,२८०
एकूण.                                                               ६०,६४०
ड) एक मे. टन गांडूळखत निर्मितीचा खर्च :
१. मूळ/कायम गुंतवणूक                                      २४,२००
(रु.१,२१,०००/- पाच वर्षासाठी)
२. खेळते भांडवल प्रती वर्ष                                १,२९,०००
३. १+२ गुंतवणुकीवरील व्याज                             ६०,६४०
१२० मे. टन उत्पादन खर्च/ वर्ष.                           २,१३,८४०
तर १ मे. टन गांडूळ निर्मितीचा खर्च.                    २,१३८
नफातोटा पत्रक:(गांडूळ खत उत्पादनाच्या दृष्टिकोनातून)
एकूण खर्च
१. कायमस्वरूपी गुंतवणूक                              १,२१,०००
२. दरवर्षी लागणारे खेळते भांडवल.                 १,२९,०००
३. एकूण व्याज                                              ६०,०००
एकूण खर्च                                                     ३,१०६४०
एकूण उत्पादन
४. १२,००० किलो गांडूळ खत उत्पादन.            ३,६०,०००
सरासरी दर ३० रू. पकडला तर एकूण
५. एकूण खर्च - एकूण उत्पादन= नफा.                ४९,३६०
      खाली दिलेल्या माहितीत शेतीच्या दृष्टिकोनातून प्रती हेक्टरी खर्च व प्रती हेक्टरी फायदा दिलेला आहे.

तपशील                                                          एकूण खर्च
प्रति हेक्टरी खर्च ( शेतीच्या दृष्टिकोनातून)
१. ४ मे.टन/ हेक्टरी २,१३८ मे. टन प्रमाणे                ८,५६२
२. खत जमिनीत टाकण्याचा खर्च (मजुरी).              ७००
एकूण                                                                   ९२५२
प्रति हेक्टरी फायदा (शेतीच्या दृष्टिकोनातून)
१. रासायनिक खतांची बचत २५ टक्के                     १,५६५
२. आंतरमशागतीसाठी मजुरी                                 २०००
३. गांडूळ विक्री १००० गांडूळे - रू. ३००.               २२,५००
७५,००० गांडूळे/ प्रतिवर्ष
४. केक यील्ड १५ मे. टन/ हेक्टरी रू.७००.              १०,५००
एकूण                                                                  ३६,५६५
५. १. खर्च हेक्टरी :                                               ९२५२
    २. उत्पन्न :                                                        ३६,५६५
( खर्च : नफा प्रमाण)                                              ( २:९)

      गांडूळ खत उत्पादनाच्या दृष्टीकोनातून यात पहिल्या वर्षी कायमस्वरूपी तसेच दर वर्षाचे खेळते भांडवल नील होऊन साधारणत: ५० हजार रुपये नफा होईल. दुसऱ्या वर्षापासून हा नफा वाढून दिड लाखापर्यंत होऊ शकतो. शेतीच्या दृष्टिकोनातून हे प्रमाण जमीन उत्पादकता व साहित्य उपलब्धतेवर अवलंबून असते. यात कमी जास्त होऊ शकते. हा प्रकल्प अहवाल हा मार्गदर्शक म्हणून दिलेला आहे. यात कमी जास्त भावामुळे त्रुटी असू शकतात. यात स्थानपरत्वे बदल घडू शकतो याची नोंद घ्यावी.

© दीपक केदू अहिरे, नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :

*******************************************
Facebook :

*******************************************
Instagram : 

*******************************************
YouTube :


*******************************************
Quora :

*******************************************
Koo :

*******************************************
Pintrest:

*******************************************
Share chat :

*******************************************
Twitter :

@DeepakA86854129
*******************************************
Website :

******************************************

#vermicompost #गांडुळ खत निर्मिती
#Project report on vermicompost
#गांडूळ खत उत्पादन #गांडुळ खताची बाजारपेठ
#Benefits of vermicomposting

No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...