पुन्हा श्वास थांबलाBreathing stopped again
हाता तोंडाशी येणारे पीक
ढगफुटी झाली गावाला,
ऐकून शेतमजुराचा निरोप
पुन्हा माझा श्वास थांबला....
पोटच्या पोरावानी जपतो
शेतकरीदादा आपल्या पिकाला,
ओल्या दुष्काळाने भरला नाला
ऐकून माझा श्वास थांबला....
पीक कापून करणार होतो दिवाळी
पावसात सारे पीक वाहिले,
स्वप्नांची झाली राख रांगोळी
कवितेतून दुःख आता मांडले....
मायबाप सरकारबरोबर मेघराजा रुसला
काढणीला आलेल्या पिकात कोसळला,
नुकताच लागवड केलेला कांदा बघून
श्वास माझा मधल्या मध्ये अडकला...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा