शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे Farmers should take advantage of various government schemes to improve their standard of living: Agriculture Minister Manikrao Kokate
शेतकरी हा विविध समस्यांना सामोरे जात आहे. शासन आपल्या स्तरावर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप सलादे बाबा प्रतिष्ठान सारख्या स्वयंसेवी संस्थांनी दिल्यास शेतकरी करीत असलेल्या कार्याबद्दल अजूनच प्रोत्साहन मिळेल. असे मत राज्याचे कृषीमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले ते छत्रपती शिवाजी महाराज बळीराजा कृषी सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम बापू पाटील हे होते
वडनेरभैरव येथील सलादे बाबा प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक जिल्हास्तरीय छत्रपती शिवाजी महाराज बळीराजा कृषी सन्मान सोहळ्याचे आयोजन १२ जुलैला हॉटेल दौलत शिरवाडे वणी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कृषिमंत्र्यांच्या हस्ते आयोजित केले होते. यावेळी स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर नाना पाटोळे व ॲड पोपटराव पवार यांनी केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व नाथउपदेशी सलादे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खा.भास्करराव भगरे, आ. दिलीप काका बनकर, आ.डॉ. राहुल आहेर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, मविप्र शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास बापू मोरे, जिल्हा शिवसेना प्रमुख नितीन आहेर, स्वाभिमानी प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, कादवा कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिवाजी दादा बस्ते , राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, संचालक भाऊसाहेब देवराम भालेराव, दिलीप धारराव, रामभाऊ भालेराव, दत्ता शिंदे, बाळासाहेब माळी, शिवसेना तालुकाप्रमुख विलास पवार, भाजपा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष भवर, एन.डी दादा माळी, साहेबराव तात्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
गौरव सोहळ्याचे प्रास्ताविक ट्रस्टचे संस्थापक सुरेश सलादे यांनी केले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सत्कार अध्यक्ष नाना पाटोळे, उपाध्यक्ष रामचंद्र आप्पा मोरे, सरचिटणीस राहुल पाचोरकर, विश्वस्त दीपक पाचोरकर यांनी केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम बापू पाटील व आदर्श सरपंच हा सन्मान मिळाल्याबद्दल सरपंच रावसाहेब भालेराव यांचा सत्कार कृषिमंत्री कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
ग्रामपालिकेच्या वतीने सरपंच यांनी वडनेरभैरवला वेदर स्टेशन व्हावं म्हणून निवेदन दिले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीन याप्रमाणे ४५ शेतकऱ्यांचा सन्मान मंत्री कोकाटे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ.डॉ. राहुल आहेर, आ. दिलीप काका बनकर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, ॲड. पोपटराव पवार यांची भाषणे झाली यावेळी गौरव स्वीकारणाऱ्यांच्या वतीने अनिल पुंजाराम कड पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कृषिमंत्री ना.माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवत असून शेतकरी हा राज्यातील एक महत्त्वाचा घटक असून या बळीराजाला प्रत्येकाने योग्य तो मानसन्मान दिला पाहिजे असा सन्मान स्वयंसेवी संस्था सलादे बाबा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येत असल्याने नक्कीच स्वागतार्ह बाब असून त्यांचे याबद्दल अभिनंदन करावेसे वाटते.
आसमानी आणि सुलतानी संकटे बळीराजाला येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील शेतकरी यांचे जीवनमान उंचवण्यासाठी तसेच शेतकऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवण्यात येतात. या योजनेचा प्रचार आणि प्रसार जागृत शेतकऱ्यांनी करून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टचे अनिल पवार उत्तम भोसले मंगेश पवार, किशोर शिरसाठ महेंद्रसिंग परदेशी, नवनाथ पाटील, दत्तात्रय निखाडे यांनी परिश्रम घेतले. आभार सुरेश तात्या उशीर यांनी मानले.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment