असे उपक्रमशील उद्योजकSuch enterprising entrepreneurs
पुस्तक परिचय Book introduction
"असे उपक्रमशील उद्योजक" हे पुस्तक पत्रकार व सामग्री लेखक श्री. दीपक केदू अहिरे यांनी लिहिले आहे. या पुस्तकाला सुप्रसिद्ध लेखक आणि उद्योजक श्री. विठ्ठल कामत यांनी प्रस्तावना दिली आहे.
"असे उपक्रमशील उद्योजक" या पुस्तकात बहुगुणी मेट्रेसेसची कल्पक निर्मिती करणाऱ्या सौ. सुजाता सुनिल पवार, ढासळणाऱ्या गडाला वैभव देणारी जिगरबाज ! असणाऱ्या सौ. विजया विनायक पाटील, बालपणीच्या संस्कारानी प्रेरणा दिली आणि उद्योजक झालेल्या सौ. निलीमा अजीत पाटील, ज्यांचे बहरले शेत फुलांचे! अशा सौ. मेघा संजीव बोरसे, अख्खे दुकान ग्राहकाच्या दारात नेणाऱ्या सौ. दीपाली पुष्कराज अकोलकर,गृह उद्योगातून अर्थार्जन करणाऱ्या सौ. प्रतिभा पिंपळवाडकर, वनौषधीची वाढती मागणी, वाढती संधी हेरणाऱ्या डॉ. सौ. अरूणाताई पगार, कलासक्त दृष्टीचा अविष्कार 'साईबन'ची निर्मिती करणाऱ्या डॉ. सौ. सुधा प्रकाश कांकरिया, शुध्द दर्जेदार उत्पादनांची हमी, ग्राहकांची नाही कमी असे तत्व अंगिकारणारे श्री. विशाल राजकुमार चोरडिया, ऑटोमोबाईल बॉडी बिल्डींग क्षेत्रातील एक नाव ! श्री. दिलीप पिंगळे,
संगणकावरील बोलका शब्दकोष निर्मिती करणारे श्री. सुनिल शिवाजी खांडबहाले, शेती उपयोगी सायकलीचे निर्माते श्री.गोपाळ मल्हारी भिसे, टाकाऊतून टिकाऊ उत्पादन देणारा उद्योजक श्री. योगराज सुकदेव सोनवणे, ग्राहकांचे समाधान हेच ध्येय ठेवणारे श्री. वामन त्र्यंबक आहिरे, सहकारातून दुग्धप्रकल्प साकारणारे श्री. विलास शिंदे, कृषीपूरक उद्योगातील एक नवे पर्व साकारणारे श्री. महेंद्र भामरे, लायब्ररीतून स्वयंरोजगार निर्माण करणारे श्री. संजय कराळे, सायकस शेतीचा प्रेरणादायी प्रयोग करणारे श्री. मुकेश छेडा, डाळिंबापासून शीतपेय निर्मितीचा प्रकल्प साकारणारे श्री. रविंद्र अहिरे, मत्स्यपालन, कोरफड शेती करणारे वकिल अॅड. एस.टी. सानप, उद्योगात प्रखर निश्चय महत्वाचा मानणारे श्री. सुधीर मुतालिक, अपारंपरिक ऊर्जेचे संशोधन आणि वापर करणारे उद्योजक डॉ. रवींद्र देव, श्री. किशोर कंठीकर, 'टेलीमॅन' : प्रशिक्षण सेवेचे एक आगळेवेगळे दालन उभारणारे श्री. विक्रम गायकवाड, इमू तेलापासून विविध उत्पादनांची निर्मिती करणारे श्री. हरीश दीक्षित इ. उद्योजकांच्या यशोगाथा या पुस्तकात वाचायला मिळतील.
"असे उपक्रमशील उद्योजक" या पुस्तकाला सुप्रसिद्ध लेखक आणि उद्योजक श्री. विठ्ठल व्यंकटेश कामत यांनी प्रस्तावना दिली आहे. प्रस्तावना म्हटली की विषयाचा, लिखाणाचा सखोल अभ्यास करूनच लिहिण्यासाठी मी होकार देत असतो. श्रीमती नीला सत्यनारायण यांच्या 'एक पूर्ण एक अपूर्ण' या पुस्तकाचा विषय आणि 'असे उपक्रमशील उद्योजक' यातील विषय हे दोन्हीही माझ्या अतिशय जिव्हाळ्याचे असल्यामुळे मी प्रस्तावना लिहिण्याचे अहिरे साहेबांना कबूल केले असल्याचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि लेखक श्री. विठ्ठल कामत यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे.
ते पुढे प्रस्तावनेत म्हणतात की भारत-माझा देश जगात अग्रेसर व्हायचा असेल (आणि तो होईलच...) तर शेतकरी व उद्योजक अधिकाधिक निर्माण झाले पाहिजेत आणि या निर्मितीसाठी पोषक वातावरण उभारण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे असे मी मानतो.
यशस्वी उद्योजक हे समाजाची गरज ओळखून ती योग्य वेळी, योग्य स्थळी व योग्य मोबदला घेऊन, स्वार्थाची तमा न बाळगता पूर्णत्वाला नेण्याची पराकाष्ठा करतात. प्रसुतीच्या वेदना व त्यांचा अनुभव हा शब्दात व्यक्त होत नाही, पण सुदैवाने उद्योजकांच्या वेदना व अनुभव अशा प्रकारच्या पुस्तकातून मांडता येत असल्याने भावी पिढीमध्ये या पुस्तकाचा उपयोग होऊन अनेक यशस्वी उद्योजक तयार होतील हा माझा विश्वास असल्याचे श्री. विठ्ठल कामत यांनी प्रस्तावनेत सांगितले आहे.
दुर्दम्य इच्छाशक्ती हे उद्योजकाचे खरे भांडवल! याचबरोबर 'अथक परीश्रम; 'चिकाटी', आणि 'माणसे हाताळण्याची कला' हे गुण उद्योजकाला आत्मसात करावेच लागतात; आणि याच गोष्टीचा, इच्छाशक्तीचा प्रत्यय या पुस्तकातील सौ. बोरसे, पवार, सौ.पाटील, सौ.पगार, श्री. भिसे आणि श्री. सोनवणे (टाकाऊतून टिकाऊ उत्पादन) या आणि अशा इतर सर्वच उद्योजकांच्या कृतींमधून पुस्तक वाचतांना कणाकणातून येत असल्याचे श्री. विठ्ठल कामत यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे.
"असे उपक्रमशील उद्योजक" हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवते. या पुस्तकातील उद्योजक आपल्या अडचणीतून मार्ग काढत कसे यशोशिखरावर पोहचले आहेत. हे सर्व उद्योजक तळागाळातील असून उपक्रमशील आहेत. याचा प्रत्यय पुस्तक वाचताना ठायी ठायी येतो. या पुस्तकाच्या लेखकाला लेखनसेवा हा प्रतिष्ठेचा पुरस्कारही मिळाला आहे. हे पुस्तक विक्रीसाठी सर्वत्र उपलब्ध आहे.
असे उपक्रमशील उद्योजक
लेखक : श्री. दीपक के.अहिरे
प्रस्तावना : श्री. विठ्ठल कामत
प्रकाशक : दीपयोग प्रकाशन
पाने : ११० मूल्य : ११०
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com
******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram :
******************************************
YouTube :
******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :
******************************************
No comments:
Post a Comment