अल्पावधीत भरघोस उत्पन्न देणारा 'शेवगा'
'Shevga' that gives huge income in a short period of time
शेतीमालाचे अनिश्चित उत्पादन आणि बाजारभावातील चढउतार यामुळे पारंपरिक पिकांना पर्यायी पीकपद्धती विकसित करणे आवश्यक असल्याने शेवग्यासारख्या अपारंपरिक पिकांची लागवड त्याला पर्याय होऊ शकेल. शेवगा हे कमीत कमी पाण्यावर येणारे, कोरडवाहू पीक असून, जास्त पावसाच्या प्रदेशातदेखील उत्तम प्रकारे येते, हे सिद्ध झाले आहे. अशा या शेवगा पिकाविषयी...
फळबागेत शेवगा आंतरपीक Shevga intercropping in orchards
महाराष्ट्रात फळबागाखालील क्षेत्र वाढत आहे. फळबागेत शेवगा हे आंतरपीक म्हणू घेण्यास भरपूर वाव आहे. नाशिक येथील अॅग्रोफॉरेस्ट्री फेडरेशन आणि मुक्त विद्यापीठाच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांतून नाशिक जिल्ह्यातील शेवगा पिकाखालील क्षेत्र २०० एकराच्या वर गेले असून, दरवर्षी या क्षेत्रात पन्नास एकरांनी वाढ होत आहे. फळबागेत शेवगा हे आंतरपीक म्हणून घेण्यास भरपूर वाव आहे.
शेवग्याचे अनेक औषधी उपयोग
Many medicinal uses of Drumstick
शेवग्याची भाजी आहाराच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक असते. शेवग्याच्या शेंगामध्ये 'अ', 'ब' आणि 'क' जीवनसत्त्वे व लोह आणि चुना हो खनिजद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. शेंगांचा भाजी म्हणून प्रामुख्याने उपयोग होतो, तसेच पानांची भाजी व फुलांची कोशिंबीरही करतात. शेवग्याच्या बियांपासून तेल काढता येते, त्याला 'बेन ऑईल' म्हणतात. हे घड्याळातील 'गिअर वंगण' म्हणून वापरतात. शेवग्याचे अनेक औषधी उपयोगही आहेत म्हणून शेवगा लागवड मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे.
शेवग्याच्या वाणाची निवड
Selection of the final variety
आपल्याकडे रूढ असलेल्या जातींची लागवड करून उत्पादन मिळते. परंतु वर्षातून एकदाच उत्पादन मिळत असल्यामुळे बाजारामध्ये सर्व शेंगा एकाच वेळी येतात. त्यामुळे शेवग्याच्या शेंगाना पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन अल्पमुदतीत उत्पादन देणाऱ्या, तसेच पारंपरिक शेवग्याच्या जातींचा प्रसार व्हावा, अशी इच्छा शेतकऱ्यांनी प्रगट केल्यामुळे वरील संस्थांनी कोइमतूर येथील व्ही. के. एम - २ या शेवग्याच्या वाणाची निवड करून लागवड करण्याचे ठरविले.
शेवगा : बारमाही उत्पन्न देणारे पीक
Shevga: A perennial crop
शेवगा हे बारमाही उत्पन्न देणारे पीक असून, ते कमी पावसाच्या भागात उत्तम वाढते. कोरड्या व उष्ण हवामानात शेवग्याला भरपूर फुले आणि शेंगा लागतात. शेवग्याची लागवड करताना प्रामुख्याने पी. के. एम-१ या जातीची लागवड करावी. ही जात तमिळनाडू कृषी विद्यापीठ, कोइमतूर येथून प्रसारित केली आहे. ही जात १० ते १२ फूट उंच वाढते. एका झाडाला सरासरी ७० ग्रॅम वजनाच्या एक इंच जाडीच्या १.५ ते २ फूट लांबीच्या शेंगा लागतात. या जातीच्या शेंगा लागवडीपासून सहा महिन्यांमध्ये काढणीस तयार होतात. बागाईत शेतातील एका झाडाला २५० ते ३०० शेंगा आणि कोरड्या शेतातील झाडाला १०० ते १५० शेंगा येतात. अशा प्रकारे एका झाडापासून वर्षाला सरासरी १० ते १५ किलो शेंगा मिळतात. एका किलोमागे सरासरी १५ शेंगा बसतात. याशिवाय कोकण रुचिरा, कोइमतूर-२, जी. के. व्ही. के. १, जी. के. व्ही. के. २ आदी सुधारित जाती आहेत.
शेवग्याची लागवड
Cultivation of the shevaga
शेवग्याची लागवड बियांपासून रोपे तयार करून किवा फाटे कलमे लावून करता येते. एका किलोमागे सरासरी ३००० बिया असतात. या बिया पॉलिबॅगमध्ये टोकल्यास सरासरी २५०० लागवडीयोग्य रोपे मिळतात. फाटे कलमासाठी १ ते १.२५ मोटर लांब व ५ ते ६ सें. मी. जाडीची फांदा वापरावी. फाटे कलमे पावसाळ्यापूर्वी मुख्य शेतात लावली तरी चालते. रोपे पावसाळ्यापूर्वी तयार करावीत, २ ते ३ महिन्यांचे रोपे लागवडीस तयार होते. बागाईत शेवग्याची लागवड १२ बाय ८ फूट अंतरावर केल्यास एकरी ४५० झाडे बसतात, तर जिराईत शेवग्याची लागवड १२ बाय ६ फट अंतरावर केल्यास एकरी ६०० झाडे बसतात. आणखी लागवड फाटे कलमे वापरून करावयाची असल्यास छाट कलमे पावसाळ्यापूर्वी शेतात लावावीत त्यासाठी ४ बाय ४ मीटर किंवा ५ बाय ५ मीटर अंतरावर ६० बाय ६० बाय ६० सें.मी. आकाराचे खड्डे खोदून त्यात एक घमेले चांगले कुजलेले शेणखत २५० ग्रॅम क्लोरोडेन पावडर टाकून खड्डे भरून घ्यावेत. लागवडीपूर्वी छाटकलमाच्या खालच्या टोकास तिरका काप घ्यावा. प्रत्येक खड्ड्यात मध्यभागी योग्य आकाराचे छाट कलम लावावे. कलमाच्या चोहोबाजूंची माती घट्ट दाबून घ्यावी. कलमाच्या वरच्या भागावर शेणमातीचा गोळा किंवा मेण लावावे. यामुळे जगण्याचे प्रमाण वाढते.
शेवग्यासाठी पाणी व खत व्यवस्थापन Water and fertilizer management for the final harvest
सुरवातीला पाऊस नसेल, तर पाणी देण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते. जमीन खोल आणि भुसभुशीत असल्यास शेवग्याची लागवड खड्डा न घेताही करता येते.शेवग्याच्या झाडाला प्रतिवर्षी प्रत्येकी १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ७५ ग्रॅम स्फुरद (४५५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट) व ७५ ग्रॅम पालांश (१२० ग्रॅम म्यूरेट ऑफ पोटॅश) द्यावे. शेवग्याचे झाड मोठे झाल्यावर पाणी नाही दिले तरी चालते. परंतु पाणी दिल्यास अधिक उत्पादन मिळते. जास्तीत जास्त सेंद्रिय खते वापरावीत. गरजेनुसार अल्पप्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा. जिरायत भागामध्ये शेवग्याचे पीक घेताना जास्तीत जास्त शेणखत, तसेच इतर सेंद्रिय पदार्थांचा वापर करून रासायनिक खतांचा वापर टाळल्यास पीकाच्या हवामान व वाणी परिस्थितीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो. शेवगा पिकाला अत्यंत कमी पाणी लागते. पाण्याची जास्तच कमतरता असेल, तर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा, तसेच शक्य असेल, तर मडका पद्धतीने पाणी देता येते; तसेच पाण्याची उपलब्धता कमी असल्यास झाडांच्या खोडाजवळ सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.
शेवग्याची काढणी Harvesting of shevga
शेवग्याच्या लागवडीनंतर सरासरी ६ महिन्यात फुले येतात. ८ महिन्यांत शेंगा येतात आणि पुढील ४ महिन्यात जशा शेंगा पक्व होतील, तशी काढणी चालू राहते. शेवग्याच्या शेंगावरील रेखांकित पीळ पूर्ण सुटल्यास आणि शेंगेची जाडी एक इंच झाल्यास शेंगा काढणीस योग्य झाल्या असे समजावे. शेंगा कोवळ्या अवस्थेत काढल्यास उत्पादनात घट येते, तर शेंगा अतिपक्व झाल्यावर काढल्यास बाजारभावात घट येते. म्हणून पक्वता लक्षणे ओळखून शेंगाची काढणी करावी. रोपे लागवडीनंतर ७५ ते १०० सें.मी. उंचीची झाल्यावर वरचा शेंडा खोडावा. त्यामुळे फांद्या येण्यास मदत होते. बहुवर्षीय जातीच्या झाडांची छाटणी वर्षाआड किंवा दोन वर्षांनी करावी छाटणी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी. छाटणी करतांना मुख्य फांद्या छाटाव्यात, यामुळे नवीन फूट येऊन फांद्याचे प्रमाण वाढते. बुटक्या जातींची काढणी सहा महिन्यात करता येते.
लागवडीनंतर ८ ते १० महिन्यांची शेवग्याच्या शेंगा तयार होतात. शेंगाची काढणी काठीला किंवा बांबूला आकडी बांधून करावी. हंगामात आठ-दहा दिवसांच्या अंतराने ३० ते ४० किलो शेंगा मिळतात. झाडांची व्यवस्थित देखभाल केल्यास झाडाच्या वाढीनुसार उत्पादनात वाढ होते.
किडी व रोग नियत्रंण Pest and disease control
शेवगा शेंगाचे उत्पादनProduction of legume
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment