चाळीतील कांदा नुकसान टाळण्यासाठी
To prevent onion damageगोदाम इनोव्हेशन्स यंत्र
Warehouse Innovations Machine
भारत हा कृषीप्रधान देश आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ नाशिकमध्ये आहे. चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याचे प्रमाण खूप आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होते. ते टाळण्यासाठी नाशिक येथील कल्याणी शिंदे हिने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'गोदाम इनोव्हेशन्स' हे यंत्र तयार केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चाळीतील खराब कांद्याची माहिती मिळणार आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी वापरले तर त्यांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल.
नाशिकला आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखले
जाते. भारतात होणाऱ्या कांदा उत्पादनापैकी ४० टक्के
कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकतो. देशासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो टन
कांदा येथून निर्यात केला जातो. बाजारात भाव नसेल तर शेतकरी आपला कांदा चाळीमध्ये
साठवून ठेवतो. वातावरणातील बदलांमुळे चाळीत साठवलेला ४० टक्के कांदा खराब होतो.
शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक फटका बसतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून शेतकरी
कुटुंबातील कल्याणी शिंदे हिने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'गोदाम इनोव्हेशन्स' हे तंत्र विकसित केले आहे.
इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला असताना तिची निवड टाटा कन्सल्टन्सी
सर्व्हिसेसच्या नाशिक येथील 'डिजिटल
इम्पॅक्ट स्वेअर' नावाच्या
इनक्युबेशन सेंटरमध्ये झाली. याच काळात तिचे लक्ष
'कांदा' या
विषयाकडे वळले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याला मोठी मागणी असूनसुद्धा शेतकरी
त्रस्त का हा प्रश्न तिला पडला? याबाबत
संशोधन करण्यास तिने सुरुवात केली. नाशिक जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे या महिन्यात मोठ्या
प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उत्पादन होते. चांगला भाव मिळाल्यास कांदा बाजारात
विकला जातो. भाव चांगला नसल्यास हा कांदा चाळीत साठवून ठेवला जातो. यातील बहुतांशी
कांदा हवेतील आर्द्रता आणि योग्य तापमान न मिळाल्याने खराब होण्याची प्रक्रिया
सुरू होते.
कांदा खराब होण्याची सुरुवात झाल्याचे शेतकऱ्यांना खूप उशीरा समजते. तोपर्यंत मोठ्या प्रमाणत कांदा सडून खराब झालेला असतो. कांदा सडण्याची प्रक्रिया सुरू होताच शेतकऱ्यांना कळाले तर नुकसान वीस टक्क्यावरच थांबवता येईल असा विचार करून नेमक्या याच प्रश्नावर कल्याणी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशोधन केले. कल्याणीने शोधलेल्या 'अरली स्टेज स्टार्टअप लेवरीजेस इंटरनेट ऑफ टिंग टेकनॉलॉजी' या तंत्रज्ञानामुळे सडलेल्या कांद्यातून बाहेर पडणारा विशिष्ट वायू शोधून त्याची पूर्वकल्पना देऊन शेतकऱ्यांना सावध केले जाते. ही पूर्वकल्पना मिळाल्यानंतर शेतकरी सडलेला कांदा चाळीतून बाहेर काढतात. त्यामुळे उर्वरित कांदा चांगला राहतो. याशिवाय कांदा चाळीतील तापमान, आद्रतेची माहिती रियल टाईम डाटा सिस्टीमद्वारे कंपनीच्या मुख्य केंद्रात एकत्र केली जाते. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून शेतकऱ्यांना सावध केले जाते. त्यानंतर शेतकरी तापमान, आद्रता कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी तात्काळ विविध उपाययोजना करू शकतात. ज्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टाळता येते. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाशिक परिसरातील शेतकरी चाळीतील कांदा सुरक्षित ठेवत आहेत. साधारणपणे सात ते आठ टनाच्या चाळीसाठी एक डीव्हाईस पुरेसे आहे.
साधारण
शेतकऱ्याने १० टन कांदा
चाळीत साठवला तर त्यातील ३० ते ४० टक्के कांदा वातावरणामुळे
खराब होतो. ही बाब डोळ्यासमोर ठेऊन कल्याणी शिंदे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 'गोदाम इनोव्हेशन्स' हे यंत्र विकसित केले आहे.
हे डिव्हाईस कांदा चाळीत लावल्यानंतर कांदा खराब होण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास
त्यातून निघणारा वायू डिटेक्ट करतो. शेतकऱ्याला तत्काळ याबाबत अलर्ट मिळतो. चाळीत
साठवलेला कांदा तापमानातील बदल आणि पाऊस, थंडी आणि
हवेतील आद्रता वाढल्यामुळे सडतो. कुजतो आजवर शेतकऱ्यांना चाळीतील कांदा सडतो आहे.
हे केवळ वासावरून कळायचे पण कांद्याचा वास आला आणि तात्काळ उपायोजना केली तरी
किमान ३० टक्केपर्यंत कांदा वाया
गेलेला असतो. काही शेतकऱ्यांना कांदा चाळी बसल्यानंतर म्हणजेच कांदा सडून
कांद्याचा ढीग कमी होणे. कांदा सडून नुकसान झाल्याचे कळते. या परिस्थितीत तर तब्बल ६० ते ७० टक्के कांदा वाया जातो. या
नुकसानीत कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होतो.
कल्याणी
सध्या या पायाभूत संशोधनाच्या पुढच्या टप्प्यावर काम करीत असून त्यांनी टाटा स्टील
आणि सह्याद्री फार्मच्या सहकार्याने 'कम्युनिटी
क्लायमेट कंट्रोल वेअर हाऊस' या
संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. या संकल्पनेतून सह्याद्री फार्मच्या
मालेगाव तालुक्यातील वडनेर, मध्यप्रदेशातील
जबलपूर आणि उत्तर प्रदेशातील संभल या ठिकाणी तीन गोदामाची रचना आणि पर्यवेक्षणाचे
काम केले जात आहे. या तीन ठिकाणी सुमारे ५०० टन कांद्याचे साठवणूक केली आहे.
भविष्यात शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी
गटांनी सामूहिक तत्त्वावर कम्युनिटी क्लायमेट कंट्रोल वेअर हाऊसची उभारणी करावी.
जेणेकरून कमी खर्चात कांद्याचे अत्याधुनिक पद्धतीने साठवणूक कशी करता येईल यावर
लक्ष केंद्रित करून त्या काम करीत आहेत. कल्याणी शिंदे यांनी कांद्याचे मोठ्या
प्रमाणावर होणारे नुकसान टाळण्यासाठी शोधलेले हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना निश्चितच
फायदेशीर ठरत आहे.
२०१८
मध्ये 'गोदाम इनोव्हेशन्स'ची कल्पना मांडल्यानंतर
कल्याणीला 'डायरेक्टर ऑफ ओनीयन अँड
गार्लिक रिसर्च सेंटर'कडून ३
लाख रुपयांचा निधी मिळाला. 'अनलिमिटेड
इंडिया'कडूनही तिला २ लाख रुपयांचा
निधी प्राप्त झाला. यातून तिने काही ठिकाणी यशस्वीरित्या गोदाम इनोव्हेशन्सची
संकल्पना प्रत्यक्षात साकारली. पुढील वर्षात ३५ कांदा चाळींमध्ये गोदाम
इनोव्हेशन्सचे युनिट बसवणार असल्याचे कल्याणीने सांगितले. अधिक
माहितीसाठी kalyani@godaminnovations.com या इमेल वर संपर्क करावा.
© दीपक केदू अहिरे,नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com
******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram :
******************************************
YouTube :
******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :
******************************************
No comments:
Post a Comment