name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): कृषीप्रदर्शनाची गरज (Need for agricultural exhibition)

कृषीप्रदर्शनाची गरज (Need for agricultural exhibition)

कृषीप्रदर्शनाची गरज 
(Need for agricultural exhibition)

       कृषीप्रदर्शनाची गरज काय असा प्रश्न अनेकांना पडतो. पण कृषी प्रदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. कारण ज्या कृषीप्रधान देशात ८० टक्के लोक शेती व शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय करताना आढळतात. अशा देशात कृषी प्रदर्शन नियमितपणे वारंवार होणे गरजेचे ठरते.


     कृषीप्रदर्शनांचा प्रसार 

       भारतात कृषी प्रदर्शन  केव्हापासून भरवायला सुरुवात झाली याचा निश्चितपणे इतिहास माहीत नसला तरी परंतु गेल्या २० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात कृषीप्रदर्शनाची सुरुवात झाली. पूर्वी छोट-छोट्या प्रमाणात कृषी परिसंवाद, कार्यशाळा, चर्चासत्र व्हायची परंतु मोठे आणि जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन भरत नव्हती परंतु वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात खाजगी प्रदर्शन आयोजकांकडून तसेच शासनाकडून कृषीप्रदर्शन घेणे चालू झाले. खाजगी आयोजक शासनाच्या सहकार्याने कृषी प्रदर्शने भरवू लागले. त्याला मिळाला प्रतिसाद बघता अशा आयोजकांनी दरवर्षीं न चुकता कृषी प्रदर्शन घेऊ लागले. त्यांनी व्यापारी पद्धतीने स्टॉल बुक करून परंतु शेतकरी विकास केंद्रीभूत मानून कृषी प्रदर्शने घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळत होता परंतु ग्रामीण भागात प्रसिद्धी व प्रचार यंत्रणा राबवल्याने मोठ्या प्रमाणात कृषीप्रदर्शनांचा प्रसार झाला. आज तर कृषी प्रदर्शने कृषी विकासाचा अविभाज्य अंग बनले आहे. त्याची गरज प्रकर्षाने जाणवते. कृषी प्रदर्शन न चुकता भरवली गेली पाहिजे अशी आवश्यकता आज बनली आहे.

कृषीप्रदर्शन ज्ञानाचे व तंत्रज्ञानाचे केंद्रबिंदू
 
 कृषी प्रदर्शन यशस्वी होण्याचा सध्याचा काळ खूप पोषक असल्याने आशादायी चित्र आहे. कारण कृषीप्रदर्शन हेतूचा चांगला प्रचार आणि प्रसार शेतकरी वर्गात झाला आहे. आज रोजी महाराष्ट्रात विविध जिल्हा, तालुक्यात ५० ते ५५ कृषी प्रदर्शने आयोजित केली जातात. त्याला मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता कृषीप्रदर्शन दिवसेंदिवस यशस्वी होत असल्याचे चित्र आहे.  कृषीप्रदर्शनाचे यश हे प्रसिद्धी व प्रसार योजनेत आहे. कृषीप्रदर्शन ज्ञानाचे व तंत्रज्ञानाचे केंद्रबिंदू ठरल्याने शेतकरी आवर्जून अशा कृषीप्रदर्शनाला भेट देतात यावरून कृषीप्रदर्शनाची गरज मोठ्या प्रमाणात आहे असे मला वाटते.


माहिती प्रसारणाचे साधन
  
 कृषीप्रदर्शन हे माहिती प्रसारणाचे प्रमुख साधन आहे. कृषीप्रदर्शनातून कृषी ज्ञानाचा विस्तार झाला पाहिजे. विस्तार म्हणजे स्वतःला असलेले ज्ञान किंवा माहिती दुसऱ्याला देणे म्हणजेच विस्तार होय. विस्तार म्हणजे लोकांच्या जीवनाच्या दर्जात शाश्वत सुधारणा घडवून आणण्यासाठी, त्यांच्या क्षमतांचा विकास घडवून आणणारे शास्त्र आहे. विस्तार हे एक शिक्षण आहे. आणि त्याचा उद्देश लोकांबरोबर काम केले जात आहे. त्यांच्या दृष्टिकोनात बदल घडवणे हेच आहे. कृषीप्रदर्शनातून या बाबी साध्य होतात. म्हणून कृषी प्रदर्शनातून कृषी ज्ञानाचा विस्तार होण्याची गरज आहे. प्रदर्शनामध्ये ग्राहकांना आवश्यक असलेल्या वस्तूंचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येते. त्याचबरोबर कधीकधी प्रात्यक्षिकदेखील बघता येते. त्यामुळे ग्राहकाला त्या वस्तूच्या खरेदीबाबत त्वरित निर्णय घेता येतो. डोळ्यांनी बघितलेल्या घटनांवर चटकन विश्वास ठेवण्याची सर्वसामान्य व्यक्तीची मानसिकता असते. त्यामुळे प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या वस्तूबद्दल विश्वासाहर्ता वाटते. यादृष्टीने माहितीचे प्रसारण होण्याचे प्रदर्शन हे एक महत्त्वाचे साधन समजले जाते.

 
        
 उत्पादनाची यथायोग्य माहिती
   
   कृषी प्रदर्शनात वस्तू व सेवा यांना चांगल्या प्रकारे जाणून घेता येते. ही उत्पादने हाताळताही येत असल्याने ग्राहकाला तो वापरत असलेल्या उत्पादनाची यथायोग्य माहिती या माध्यमातून प्राप्त होते. शेत,घर व सामुदायिक संस्था सुधारण्याच्या पद्धती शिकून त्याद्वारे जास्त चांगल्या तऱ्हेने जगायचे कसे हे ग्रामीण लोकांना, शेतकऱ्यांना शिकविणारी प्रक्रिया कृषीप्रदर्शनात पार पाडली जाते. लोकांना पटतील अशा पद्धतीने त्यांना सुधारित पद्धतीचे ज्ञान देणारी व त्यांच्या विशिष्ट स्थानिक परिस्थितीनुसार त्यांना निर्णय घ्यायला मदत करणारी शैक्षणिक प्रक्रिया कृषीप्रदर्शनात होते. जास्त चांगल्या तऱ्हेने जीवन जगण्यासाठी लोकांना त्यांचा व्यवसाय, उपक्रम व संस्था सुधारण्याच्या पद्धती शिकवून त्याद्वारे लोकांच्या वर्तणुकीत नियोजित बद्दल घडवून आणणाऱ्या ज्ञानाची निर्मिती कृषीप्रदर्शनामुळे होते. कृषीज्ञानाचे विस्तार शिक्षण हे एक उपयोजित वर्तणूकशास्त्र आहे. ज्याच्या ज्ञानाचा वापर मनुष्याच्या स्वभावमध्ये केला जातो. कृषी प्रदर्शनाद्वारे शेतकरी ग्रामीण लोकांच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास साधणे शक्य होते.

 
वस्तू व सेवांचे प्रदर्शन
       
   कृषीप्रदर्शनात कमी जागेत अनेक वस्तू व सेवांचे प्रदर्शन असते. ज्याची गरज शेतकऱ्याला खूप असते. उपलब्ध वस्तू, सेवांची रचना योग्य प्रकारे करून प्रदर्शनामध्ये मांडल्यास प्रदर्शन काळामध्ये अनेक व्यक्ती त्यांचे निरीक्षण करू शकतात. हाताळू शकतात व प्रात्यक्षिक पाहू शकतात. योग्य प्रकारे रचना केल्याने थोड्या जागेत अनेक महत्त्वांच्या गोष्टींची प्रभावीपणे मांडणी करता येते. ते वापरत असलेले उत्पादन कंपनी कशाप्रकारे तयार करते याची जाणीव त्यांना या कृषीप्रदर्शनातून होते. तसेच हे उत्पादन कोणत्या पिकावर कशा रीतीने वापरायचे याचे तांत्रिक ज्ञान कंपनीकडून त्यांना प्राप्त होऊ शकते. प्रदर्शन हे माध्यम प्रामुख्याने उत्पादन व सेवांच्या प्रसिद्धी व जाहिरातीसाठी वापरले जाते. उत्पादक आणि विक्रेते यांना ग्राहकांच्या संपर्कात नेहमीच असावे लागते. जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रदर्शन हे अतिशय महत्त्वाचे माध्यम आहे. उत्पादक तसेच विक्रेते प्रदर्शनाच्या माध्यमातून नेहमीच्या ग्राहकांना तसेच नवीन ग्राहकांनादेखील आकर्षित करू शकतात. त्यातून त्यांचा जनसंपर्क वाढत जातो. आपल्या उत्पादनासाठी त्यांना नवनवीन ग्राहक मिळत असतात. त्यासाठी कृषी प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे ग्राहक व कंपनी यांचा जनसंपर्क वाढून महत्त्वाचे हितसंबंध प्रस्थापित होतात.

 
विस्तार कार्य

      कृषीप्रदर्शनाच्या विस्तार कार्यात अनेक कंपन्या माहितीपत्रके वाटतात. हे एकाच विषयाची माहिती विस्ताराने माहितीपत्रकामध्ये येते. औषध कंपन्याची माहिती, नवीन अवजाराची माहिती, रोपवाटिकेसंबंधी माहिती, पीक उत्पादन विषयक माहिती या कृषीप्रदर्शनातून शेतकऱ्याला मिळते. माहितीपत्रकात अचूक,नेमकी व कसे काय करावे याची माहिती असते. या कृषीज्ञानाचा उपयोग शेतकरी करू शकतो. यामध्ये एकच कल्पना स्पष्ट केलेली असते. उदा. हिरवळीचे खते, बीजप्रक्रिया इ. यामध्ये जी माहिती असते ती लोकांच्या गरजेची असते. माहितीपत्रकाची माहिती शेतकऱ्यांना समजेल अशी असते यात चित्रासहित माहिती दिलेली असल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यास ती समजते. आजकाल अशा कृषी ज्ञानामुळे शेतकरी सज्ञान होऊ लागला आहे. कृषी प्रदर्शन असे माध्यम आहे की निरीक्षर शेतकऱ्यालाही चांगल्या पद्धतीने ते समजू शकते. तो त्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो.

वैशिष्ट्यपूर्ण व भव्य कृषीप्रदर्शने 

   कृषीप्रदर्शनमध्ये येणाऱ्या व्यक्तींच्या गरजा अनेक प्रकारच्या असतात. त्यांच्याशी चर्चा करून अनेकांना पूरक व्यवसाय व सेवा सुरू करण्याच्या संधी उपलब्ध होतात. यामध्ये प्रामुख्याने कृषीसल्ला सेवा, कृषी प्रकल्प आखणी/ व्यवस्थापन, विशिष्ट निविष्ठांचा आयात- निर्यातविषयक व्यापार अशा काही पूरक सेवांचा समावेश होतो. त्याचबरोबर प्रदर्शनाची पूर्वतयारी, प्रदर्शन काळातील सेवा सुविधा पुरविण्याची कामे अशा प्रकारच्या लहान आणि अल्पकालीन व्यवसायाच्या संधी होतकरू तरुण-तरुणींना उपलब्ध होऊ शकतात. अशा तऱ्हेने संधीचा योग्य वापर केल्यास त्याचे रूपांतर कायमस्वरूपी व्यवसायामध्येदेखील करता येणे शक्य होते. अनेक पद्धतीची वैशिष्ट्यपूर्ण व भव्य कृषीप्रदर्शने आयोजित करणे हाच एक स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे. त्याद्वारेदेखील अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध होतो. नासिक येथे आयोजित कृषीथॉन या प्रदर्शनात स्वयंसेवक म्हणून कृषी महाविद्यालयातील कृषी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा दिवसाचा रोजगार प्राप्त झाला होता.

 
शेतीविषयक ज्ञानाची देवाणघेवाण
 कृषीप्रदर्शनामुळे शेतीविषयक ज्ञानाची व आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते. आज टेक्नोसेव्ही युगामुळे शेती तंत्रज्ञानही अपडेट करण्याची गरज पडते. म्हणून कृषीप्रदर्शन महत्त्वाची गरज आहे. कृषी प्रदर्शनामुळे कोणत्या जिल्ह्यात नवीन तंत्रज्ञान आले आहे किंवा त्याचा वापर शेतकरी कसा करतात हे कळते. यानिमित्ताने शेतीविषयक विचारांची देवाणघेवाण होते. कृषी प्रदर्शनात होणाऱ्या परिसंवादातून शेतकऱ्यांच्या यशोगाथा माहिती होतात. यामुळे कोणत्या भागात कोणते पीक तो शेतकरी यशस्वी करू शकतो याचे ज्ञान शेतकऱ्याला येते. त्यानुसार तो तंत्रज्ञान अवगत करतो. पिकांच्या नवीन जाती, आधुनिक अवजारे, कृषी विभागाच्या योजना, अनुदान आदी विषयाची माहिती शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनात एका छताखाली माहिती होते. त्यांची माहिती जाणून घेऊन त्याविषयी असणारे परिपत्रके तो घेऊन घरी जाऊन त्यावर निवांतपणे अभ्यास करू शकतो किंवा दुसऱ्याकडून जाणून घेऊ शकतो. 

  शेतीतंत्रज्ञानाचे स्टॉल

  कृषी प्रदर्शनातून 'ना नफा ना तोटा, शेतकरी राजा हे मोठा' या उक्तीप्रमाणे प्रदर्शनात विविध क्षेत्रातील शेतीतंत्रज्ञानाचे स्टॉल असल्याने कृषी प्रदर्शन व्यापारी न होता अनुभवसिद्ध होते व ते शेतकरी राजासाठी महत्त्वपूर्ण ठरते. शेतीकामाच्या सर्व गरजांसाठी उच्च गुणवत्तेच्या श्रेणीची उपकरणे कृषी प्रदर्शनात हाताळता येतात. या प्रदर्शनात आपण प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरालाही त्याचे प्रात्यक्षिक देऊ शकतो. यामुळे तो कुशल होईल. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याने व कानाने ऐकल्याने फरक पडतो तोच जिवंत अनुभव प्रदर्शनाद्वारे दिला जातो. 
 कृषी प्रदर्शनात घडीपत्रिकाही दिली जाते. ती साधारणतः माहितीपत्रका- सारखीच असते यामध्ये जो कागद वापरला जातो त्याच्या दोन ते तीन घड्या करून ती आटोपशीर आकाराची असते व यात विस्तृत माहिती, आकृती,शेतीच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती अशा विषयासंबंधी आटोपशीर  माहिती असते. ती शेतकऱ्याच्या कामाची असते. कृषी प्रदर्शनातून घडीपत्रिका बरेचसे स्टॉलधारक देत असतात. या निमित्ताने कृषी ज्ञानाचा विस्तार घडतो. 

  माहितीपत्रकांचे वाटप 

  बऱ्याच कृषी प्रदर्शनातून कृषीविषयक माहिती पत्रिकाही दिली जाते. यामध्ये शेतीविषयाशी निगडित माहिती दिलेली असते. एकापेक्षा जास्त विषय हाताळलेले असतात. साहजिकपणे यांची पृष्ठसंख्या जास्त असते. शिक्षित शेतकरी व तांत्रिक कर्मचारी यांच्यासाठी विशेषतः ही माहितीपत्रके काढली जातात. कृषीप्रदर्शनातून अशा प्रकारची माहितीपत्रके वाटली जातात. शासनाच्या कृषी विभागाकडून तसेच काही कृषी प्रकाशन संस्थेकडूनही पुस्तिका वाटल्या जातात. कृषी प्रदर्शन कालावधीत स्थानिक वर्तमानपत्रेही कृषी विषयावरची विशेष पुरवणी काढून मोफत प्रदर्शनात वाटप करते.

 

अभिनव व्यासपीठ

 कृषी प्रदर्शनानिमित्त आयोजक संस्था भाज्या, द्राक्ष, फळे व फुले यांच्या स्पर्धा आयोजित करते. यावरून शेतकऱ्यांना चालना मिळून तो अधिकाधिक उत्पादन घेण्यास उद्युक्त होतो. कृषी प्रदर्शनात पशू प्रदर्शन व डॉग शोही आयोजित होतात. यामुळे शेतकऱ्यांना गाई,म्हशी व शेळीच्या जाती व इतर पाळीव प्राण्यांच्या जाती पाहता येतात. त्यांच्या उत्पादनाची खात्री करून घेता येते. कृषी प्रदर्शनात पिकावर पडणारे रोग व कीडी, प्राण्यांना होणारे आजार यासंबंधी सविस्तर उपायोजना चर्चासत्राद्वारे सांगितल्या जातात त्यामुळे कृषीप्रदर्शने माहितीपूर्ण ठरते. तरुण पिढीने शेतीवर लक्ष केंद्रित करून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्या तंत्रज्ञानाचे दर्शन कृषीप्रदर्शनातून त्यांना मिळत असल्याचे अनेक शेतकऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. यावरून कृषी प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित होते.

अभिनव व्यासपीठ

      कृषी प्रदर्शनात थेट भाजीपाला,धान्य विक्रीचा पर्याय उपलब्ध होत असल्याने  प्रदर्शनात दलालविरहित शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकाला उपलब्ध होत असल्याने कृषीप्रदर्शनाची गरज अधोरेखीत झाली आहे.  निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन व काढणीपश्चात तंत्रज्ञान,वाहतूक, प्रक्रिया, मार्केटिंगवर आधारीत भव्य कृषी प्रदर्शनामुळे कृषीक्षेत्राला चालना मिळते. कृषी प्रदर्शनात डेअरी तसेच जोडधंदेविषयी स्वतंत्र दालन असते. यात गुणवत्तापूर्वक दुग्ध उत्पादनापासून ते यशस्वी दुग्धव्यवसाय वाढीचे तंत्रज्ञान देण्यात येते. भारतीय कृषी उद्योगातील युवकांचे स्थान, युवकांना कृषीक्षेत्रातील संधी व प्रेरित करणारे अभिनव व्यासपीठ कृषी प्रदर्शनामुळे प्राप्त होते.

नेटवर्किंग मिटिंग्ज  

  चर्चासत्र, परिसंवाद व इतरही तांत्रिक ज्ञानाची माहिती उपलब्ध होते. कृषी क्षेत्रातील रोजगाराची संधी व कृषी क्षेत्रात शिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता होण्यासाठीचा विशेष उपक्रम कृषीप्रदर्शनात घेतला जातो. यात कृषी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगार तथा ज्या कृषी संस्थेकडे रोजगार उपलब्ध आहे अशा कंपनी, संस्था यासाठीचे व्यासपीठ कृषी प्रदर्शनात असल्याने रोजगाराची चांगली संधी यानिमित्ताने कळते. कृषीप्रदर्शनात फळ व भाजीपाला उत्पादक तथा निर्यातदार यांच्याकरिता नेटवर्किंग मिटिंग्ज आयोजित केल्या जातात. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आयातदार, निर्यातदार, शेतकरी व या क्षेत्रातील व्यावसायिक यांना यथायोग्य मार्गदर्शन लाभते.
कृषी ज्ञानाचा विस्तार
   कृषी क्षेत्रात जे काही नवनवीन पुस्तके येतात त्यांचे दर्शन शेतकऱ्याला घडते यातून कोणते प्रकाशन त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे व उपयोगी पडेल अशा सर्व पुस्तकांची मासिकांची खरेदी या निमित्ताने शेतकरी बंधू करतो या दृष्टीनेही कृषीप्रदर्शन गरजेचे ठरते. कृषी प्रदर्शनात मुख्य म्हणजे शेती व उद्योगविषयक पुस्तके,मासिके, दैनिके यांचा स्टॉल असतो. अशावेळी शेतीयोजना, कायदा, लागवड, शेती जोडधंदे, सेंद्रिय शेती, फळबाग, भाजीपाला, सहकार, शेती संबंधित अवजारे आदी विषयावरील पुस्तकांना भरपूर प्रमाणात मागणी असते. अशावेळी सवलतीत पुस्तके दिली जातात. त्यामुळे शेतकरी भरपूर खरेदी करतो. एखाद्या विषयाची सांगोपांग माहिती देणारी अनेक पुस्तके, मासिके एका छताखाली उपलब्ध झाल्याने शेतकरी ती खरेदी करतो. अशा पद्धतीने कृषी प्रदर्शनातून कृषी ज्ञानाचा विस्तार करण्याची पर्वणी कृषीप्रदर्शनातून मिळते. दरवर्षी कृषीप्रदर्शन भरत असल्यामुळे लोक याची वाट पाहत असतात. अनेक लोक यातून ज्ञान घेण्याची पर्वणी म्हणून बघतात.हाच कृषी प्रदर्शनाचा मुख्य हेतू सफल झाल्यासारखे वाटते. 
शंका समाधानाची सोय
      कृषी प्रदर्शनामुळे रोपवाटिका तंत्रज्ञान विकसित झाले. कारण रोपांचे प्रदर्शन या प्रदर्शनात भरते. बियांपासून रोपे कसे करावे, रोपे सतेज ठेवून वाढ कशी करावी याचे ज्ञान कृषीप्रदर्शनामुळे होत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे रोपवाटिका व्यवसायही जोमदारपणे त्या त्या परिसरात होऊ लागला आहे. याला कृषीप्रदर्शन गरजेचे ठरत असल्याचे दिसून आले. शासनाचा शेततळी कार्यक्रम कृषी प्रदर्शनामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती झाला यातून त्यांनी अनुदान घेवून मोठ्या प्रमाणात शेततळी निर्माण केली. या प्रदर्शनात शेततळी निर्मितीसाठी असलेला कागद, जेसीबी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व शंका समाधानाची सोय येथे झाली. त्यामुळे शेततळी कार्यक्रम प्रभावीपणे राबवता आला आहे.
कृषीप्रदर्शनामुळे 
कृषीविकास
       कृषीप्रदर्शनामुळे फलोत्पादनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. फळझाडांच्या लागवडीमुळे जमिनीवर वनस्पतीचे आच्छादन तयार होते व पावसाच्या माऱ्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबते हा संदेश आपण कृषी प्रदर्शनातून देऊन फलोत्पादनाचे महत्त्व ठसवू शकतो यासाठी कृषीप्रदर्शनाचे माध्यम महत्त्वाचे ठरत असल्याचे लक्षात येते. गरीबी निर्मूलनाचा एकमेव मार्ग म्हणजे कृषीविकास आणि हाच कृषीविकास कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून दर्शवला गेला तर तळागाळातल्या लोकांना विकासाच्या प्रवाहात येणे सहज सोपे होईल यासाठी कृषी प्रदर्शन भरवण्याची गरज आहे. 



 कृषीमाल निर्यातीस चालना
 
 भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. मुक्तअर्थव्यवस्थेत निर्यातीस मोठे महत्त्व आहे. त्यादृष्टीने आपल्या देशातील कृषीमाल निर्यातीस चालना कृषी प्रदर्शनातून मिळते. यावेळी आयातदार, निर्यातदार यांचे स्टॉल्स असतात. त्यांच्याशी थेट भेट घेऊन आपण आपला शेतमाल निर्यात करून परकीय चलन मिळवू शकतो. अशा पद्धतीने कृषीप्रदर्शनाची गरज असल्याचे जाणवते. कृषीप्रदर्शन नुसते बघण्याचे माध्यम नसून समजावून अनुभव घेण्याचे एक सशक्त माध्यम म्हणून पुढे येत आहे. तंत्रज्ञानातून कृषीविकास व कृषीविकासातून देशाचा विकास ही संकल्पना घेऊन कृषीप्रदर्शन ठिकठिकाणी आयोजित होत आहे. अशा आधुनिक शेतीज्ञानाची गरज आताही आहे आणि पुढेही राहणार.  शेती व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी कृषीप्रदर्शनाची  नितांत गरज आहे.



कृषी प्रदर्शन

कृषीप्रधान देशात
गरज कृषी प्रदर्शनाची,
परिसंवाद,कार्यशाळा, चर्चासत्र
भूमिका निभवावी सहभागाची....

कृषिविकास केंद्रीभूत मानून
व्हावे नियमित कृषिप्रदर्शन,
यानिमित्ताने मिळते ज्ञानाची पर्वणी
अनुभवाची होते देवाणघेवाण...

कृषीप्रदर्शनात स्टॉलमध्ये
भरते अनेक वस्तू, सेवांचे प्रदर्शन,
प्रत्यक्ष पाहिलेले तंत्रज्ञान
अनुभवाच्या वृध्दीने होते मूल्यवर्धन...

कृषी प्रदर्शन असते ज्ञानाचे
अभिनव असे व्यासपीठ,
कृषिप्रदर्शनातून मिळते ज्ञान
असे ते चालते बोलते विद्यापीठ...

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

#कृषिप्रदर्शन#Agriexhibition#कृषिप्रदर्शनाचीगरज#विस्तारकार्य#krishithon#अभिनवव्यासपीठ#agriculture #farmer #agro #farmers #agri #agriculturelife #nature #food #farmerlife #harvest #global #agribusiness #rural #rurallife #hydroponics #aeroponics #instagram #horticulture #green #tractor #agricultureworld #agriculturereview #agriculturegk #garden #homegarden #cattle #livestock #instagood #agronomy #fish#fisheries #farmlife #instafarmer #instaram #agriproducts #environment #kisan #kheti #silage #cow #buffalo #dairy #amul #milk #gdp #village #garden #plants #leaves #wheat #rice #mango #agronomia #country #agriculturebio #botany #agriculturevideo #vedicagriculture #agriculturereview#organicfarming#agriculturereview #plants #rose #flower #petunia #hibiscus #potato #tomato #follow #instafarmer #composting #vermicompost #icar #agripedia #gardenup #leaf #fruit #cutting #gardenblog #tree #crop #kharif #rabi #beekeeping #bellpepper #pumpkins #myfarm #seeds #hormones #npk#शेतकरी

No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...