श्रवणशक्ती
Hearing
उत्तमपणे जे ऐकतात,
तेच उत्तमपणे बोलतात,
नीट ऐकण्याची शक्ती,
यशाचं पीक उगवतात...
उत्तम कानसेन झाल्याशिवाय,
तानसेन नाही होता येत,
श्रवणशक्तीच्या बळावर माणसं,
बदलतात परिपक्वतेत...
चांगलं ऐकणं हे,
मन घडवतं,
चुकीचं ऐकणं हे,
सारं बिघडवतं...
मोजक बोलून पुष्कळ ऐकणं,
हे सूत्र सर्वोत्तम यशाचे,
इतरांना बोलू न देता स्वतःबोलणे,
हे बोलणे अहंकाराचे...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment