क्षमता
Capacity
क्षमतेला ओळखा
असते प्रत्येकाच्या अंगी,
पात्रतेत करा रूपांतर
होईल जीवनाची सुगी...
आपल्यातील क्षमता
ओळखण्याचा घ्यावा बोध,
सामर्थ्य आणि शक्तिस्थानांचा
घ्यावा तुम्ही शोध...
वापर करा क्षमतांचा
तेव्हा टिकेल अस्तित्व,
क्षमता करा प्रबळ
वाढेल आपले प्रभुत्व...
आपण काय करू शकतो
याची जाणिव व्हावी,
क्षमतेच्या कसोटीवर
सत्यात ती गोष्ट उतरावी...
© दीपक केदू अहिरे
नाशिक
No comments:
Post a Comment