देवत्व
Divinity
सामान्य रूपातील मनुष्य,
देवत्व पदावर पोहचली,
काळाला वाकवून,संकटाशी झुंजून
जग जिंकण्या स्वार झाली...
आयतं ना कुणा मिळते,
देवांनाही ते नाही चुकले,
पराक्रम गाजवून, विजय मिळवून
भव्यदिव्य मंगल करावे लागले...
देवपदाच नित्य दर्शन,
म्हणून गावागावातील मंदिरं,
त्याच्यापासून घ्यावी प्रेरणा,
शिरावं त्यांच्यासारखं अंगात वारं...
तुमच्या प्रश्नाचे उत्तर,
नसतं दुसऱ्या कुणाकडे,
हात जोडून वेळ घालवण्यापेक्षा,
का देवाला घालतात साकडे...
No comments:
Post a Comment