अनुभवExperience
पूर्वग्रहांची जळमटं,
जिवंत असतात अनेकांच्या मनात,
जोपर्यंत येत नाही अनुभव,
ते जगत नाही वर्तमानात...
अनुभवाच्या बळावरच,
माणसं जबाबदारी घेतात,
अनुभवशून्य माणसं मात्र,
परिस्थितीलाच दोष देतात...
अनुभवासारखा दुसरा मार्गदर्शक,
नाही कोणी गुरू,
अनुभव ज्ञानाने करतं शहाणं,
त्याच्या मदतीने आपण तरू...
अनुभवाला सज्ज असणारी माणसं,
राहत नाही अवलंबून,
संकटाना तोंड देण्याची सवय,
होते अनुभव घेण्याच्या वृत्तीतून...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा