name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): नव्या वर्षाचे संकल्प (New years Resolutins)

नव्या वर्षाचे संकल्प (New years Resolutins)

नविन वर्षाचे  संकल्प...
New years Resolutins

New years resolution


नविन वर्षाचे  संकल्प,
करावे तुम्ही ठाम पक्के, 
अपयश येते वाट्याला,
बसतात संकल्पाचे धक्के

यश मिळवण्यासाठी, 
निश्चयी संकल्प महत्त्वाची, 
संकल्पाने काम पूर्ण,
शक्ती जागवा जबाबदारीची

बदल हाेतात निर्माण,
तेव्हा माणूस संकल्प करते, 
राेजच्या जगण्याचे बदल,
त्याला मुहूर्ताची गरज नसते

संकल्प छोटे छोटे असतात, 
ध्येय असते माेठे, 
माघार न घेण्याचा संकल्प, 
मिळतात यशाचे वाटे

संकल्प अवश्य करावे, 
त्याचे हाेऊ नये विस्मरण, 
संकल्पपूर्तिसाठी करा कृती, 
जगजाहीर व्हावे कारण

© दीपक अहिरे,नाशिक

No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...