घाव
wound
तू दिलेला घाव
वर्मी मला लागला,
तुला असे वाटले
कसा भरला टाेला...
किती दिले तू
मरणासन्न घाव,
जगण्यास आता
मिळाले अनेक वाव...
काळानुसार घाव
आता ताे बसला,
व्रणाची जखम
साेडून ताे गेला...
तू कितीही देशील
गुप्तपणे हे घाव,
उलटणार तुझ्यावर
नक्की हे तुझे डाव...
@ दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment